मी त्याला पाहिलेतेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, 'भिऊ नको; जो पहिला व शेवटला, आणि जो जिवंत 'तो मी आहे;' मी मेलो होतो तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे, आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत. (प्रकटीकरण १: १७-१८)
सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो; कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो. (नीतिसूत्रे २६: २०)
माझ्या प्रार्थनेच्या वेळी, मला पवित्र आत्म्याने हळुवार म्हटले की मी केवळ काही वेळ परमेश्वराची स्तुती करावी आणि त्यावर प्रीति करीत वेळ घालवावा. अनेक वेळेला, आपली उपासना वेळ ही केवळ एक परिषद, भक्ती किंवा एक अनुभव वगैरे असे होऊ शकते. एकदाकी परिषद संपली; एकदाकी भक्ती संपली; ज्वाला आणि व आवेग हे मंद होतात.
मी पूर्णपणे जाणून आहे की अनेक वेळेला असेच घडते कारण आपण अग्नीला इंधन पुरविण्यात चुकतो. जर आपली भक्ती ही फार सहज विझविली गेली तर ती ह्या कारणासाठी की त्यात इंधनाचा तुटवडा आहे.
भक्ती साठी इंधन काय आहे?
प्रेषित योहानाच्या भक्ती कडे जवळून पाहिले तर त्यास कशाने प्रेरित आणि पेटविले होते ते रहस्य आपल्याला प्रकट होईल.
आपल्या भक्ती साठी इंधन हे परमेश्वराचे प्रकटीकरण आहे! हे आधुनिक, नवीनअनुभव किंवा परिषद, एक निश्चित उपासना पुढारी किंवा मैफिल, उत्तम प्रचारक किंवा उपासना नाही! हे सर्व चांगले आहे आणि मी निश्चितच ह्याच्या विरोधात नाही! तथापि, खरी उपासना तेव्हाच होते जेव्हा आपण देवाला पाहतो की तो प्रत्यक्ष कोण आहे!
येथे काही थोडे आहेत ज्यांनी परमेश्वराला पाहिले जो प्रत्यक्षात कोण आहे. मोशेउपडा पडला आणि त्याने उपासना केली (निर्गम ३४: ५-८). यहोशवा उपडा पडला आणि उपासना केली (यहोशवा ५: १३-१५). सर्व लोक गुडघ्यावर येतील आणि उपासना करतील (फिलिप्पै २: १०-११). जर आपण भक्ती मध्ये परमेश्वरास प्रत्युत्तर देत नाही तर येथे एक कारण आहे;
तुम्ही त्यास पाहत नाही की तो प्रत्यक्षात कोण आहे. देवाला पाहणे हे त्याची उपासना करणे आहे.
मैट रेडमैन, एक उपासना पुढारी आणि लेखक लिहितो, "अनेक वेळेला जेव्हा माझी भक्ती ही नीरस होते हे ह्याकारणासाठी की मी स्वतःला देवाच्या प्रकटीकरणा खाली बुडविलेले नाही."
ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो; परस्परांस सर्व ज्ञानाने शिकवण दया व बोध करा; आपल्या अंत:करणात देवाला स्त्रोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. (कलस्सै ३: १६)
जेव्हा आपण देवाच्या वचनास वाव देतो आणि आपल्या रोजच्या जीवनावर त्यास प्रभाव करू देतो, तर परमेश्वर प्रत्यक्षात कोण आहे त्याचे प्रकटीकरण ते आणेल. हे मग पुढे, आपल्याला धन्यवादी अंत:करणाने व पवित्र आत्म्या द्वारे एकापाठोपाठ कधीकधी दिलेल्या भविष्यात्मक गीता सह आपल्याला मार्गदर्शन करेल.
प्रार्थना
स्वर्गातील पित्या, मी तुझा आभारी आहे की तूं माझाप्रभु आहेस. तूं माझीस्तुती आणि उपासनेस पात्र आहेस. तूं कोण आहेस त्यासाठी मी तुझी उपासना करतो. येशूच्या नांवात. आमेन(त्याची उपासना करीत काही वेळ घालवा.)
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वयं-गौरवाचा सापळा● केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?
● परिवर्तनासाठी सक्षम
● आदर्श होऊन पुढारीपण करा
● दार बंद करा
● दिवस ०६ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● वातावरणावर महत्वाची समज - २
टिप्पण्या