english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. तुमच्या मनाला शिस्त लावा
डेली मन्ना

तुमच्या मनाला शिस्त लावा

Tuesday, 22nd of April 2025
20 14 222
Categories : मन शिस्त
"हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन; तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर." (स्तोत्र ८६:११)

तुम्ही कधी स्वतःला भारावून गेल्याचे आणि लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ असल्याच्या परिस्थितीत सापडलेले असे पाहिले  काय? कदाचित तुमचे मन नकारात्मक विचार आणि अडथळ्यांद्वारे गोंधळलेले वाटत असेल, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात देवाच्या शांतीचा अनुभव करण्यापासून अडथळा करीत असेन. सत्य हे आहे की देवाची आपल्यासाठी इच्छा ही आहे की तसे मन असावे जे सुस्पष्ट व शिस्तबद्ध असे असावे, कोणत्याही गोंधळापासून मुक्त जे अडथळा निर्माण करते आणि आमच्या मनात त्याच्या शांतीला स्थिरावण्यापासून रोखते.

२ तीमथ्यी १:७ मध्ये, आपण हे वाचतो की, "कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे." देवाने आपल्याला सामर्थ्य आणि प्रीति ज्याची आपल्याला गरज आहे ती दिली आहे की दृढ मन बनवावे, जे आपले डोळे, कान व हृदयाचे रक्षण करेल, जे काही निश्चित विचारांना येण्यास परवानगी देईल, तर इतरांना प्रतिबंध करील. या वचनामध्ये शब्द "सामर्थ्य" यासाठी हेल्लेणी शब्द हा ड्युनामीस आहे, जो तोच शब्द आहे जो पवित्र आत्माच्या सामर्थ्यासाठी वापरला आहे जो विश्वासणाऱ्यांना प्रेषित १:८ मध्ये दिला गेला.

"परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्ष व्हाल." (प्रेषित १:८)

जेव्हा आपण पवित्र आत्म्याचे दान प्राप्त करतो, तेव्हा आपण सामर्थ्य प्राप्त (ड्युनामीस) करतो ज्याची आपणांस गरज असते की भयाच्या आत्म्याचा प्रतिकार करावा जे नेहमी आपल्या मनाला भारावून टाकत असते. तीच शक्ती (ड्युनामीस) जी येशूच्या शरीरातून निघाली आणि मार्क ५:३० मधील रक्तस्रावी स्त्रीला बरे केले ती आज आपल्यासाठी उपलब्ध आहे जेव्हा आपण आपल्या मनाला शिस्तीत आणण्याकडे लक्ष देतो आणि देवाच्या वचनाच्या सत्यावर केंद्रित राहतो.

एक शिस्तबद्ध मन ते आहे जे जीव आणि आत्म्यामध्ये प्रवेश करते, त्यांचे संरक्षण करण्यास तत्पर असे असते. आपल्या सभोवती ज्या परिस्थिती आणि घटना होत असतात त्यांना आपण नेहमीच नियंत्रणात ठेवू शकत नाही, परंतु त्यांना कसे उत्तर दयावे यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. देवाच्या वचनाच्या सत्यावर लक्ष केंद्रित करण्याची आपण निवड करू शकतो, आणि आपल्या मनाला भय, चिंता आणि शंकेऐवजी प्रीति, आनंद आणि शांतीने भरू शकतो.

एक दृढ मन विकसित करण्यासाठी शिस्तीची आवश्यकता असते, परंतु पुरस्कार हे महत्वाचे आहे. जेव्हा आपण आपल्या मनाला शिस्तीत आणतो आणि आपल्या हृदयाचे रक्षण करतो, तेव्हा आपण देवाच्या शांतीचा अनुभव करू शकतो जे आपल्या समजेपलीकडचे असते (फिलिप्पै ४:७). यशया २६:३ म्हणते, "ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांति देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो."

आपण त्या ज्ञानामध्ये स्थिर राहू शकतो की देव सर्वावर नियंत्रण ठेवून आहे आणि त्याने आपल्याला ज्याची गरज आहे ते सामर्थ्य व प्रीति दिली आहे की कोणतेही अडथळे जे आपल्या मार्गात येतील त्यावर प्रभुत्व मिळवावे.

आपण स्वतः इतर ख्रिस्ती लोकांबरोबर राहावे जे देवावर प्रीति करतात हे शिस्तबद्ध मन विकसित करण्यासाठी देखील अविश्वसनीयरित्या साहाय्यक होऊ शकते. लोक जे आपली मुल्ये व विश्वास मानतात त्या लोकांबरोबर जेव्हा आपण आपला वेळ घालवितो, तेव्हा हे साहजिकच आहे की आपल्या विश्वासामध्ये आपल्याला प्रोत्साहन व आव्हाहन मिळू शकते. साहाय्यकारी समाजाचा हिस्सा असणे (उदाहरणार्थ, जे-१२ पुढाऱ्याच्या अधिकारात) हे आपल्याला देवावर केंद्रित व उत्तरदायी राहण्यास मदत करू शकते, जे मग आपल्या जीवनाच्या सर्व भागांमध्ये मोठया यशाकडे नेऊ शकते.

म्हणून, चला आपण ही एक दैनंदिन सवय करू की आपल्या मनास शिस्तबद्ध करावे, आपले डोळे, कान, व अंत:करणाचे रक्षण करावे, आणि देवाच्या वचनाच्या सत्यावर केंद्रित राहावे. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आपण शांति व आनंदाचा अनुभव करू शकतो तो देवाला ओळखण्यापासून येतो की आपण त्या देवाची सेवा करत आहोत जो आपणांवर प्रीति करतो आणि तो नेहमीच आपल्याबरोबर आहे, मग काहीही होवो.

Bible Reading: 1 Kings 1-2 
अंगीकार
देवाचे वचन माझ्या मनावर प्रभाव व वर्चस्व करते. ते मजमध्ये ती क्षमता निर्माण करते की सर्व समयी योग्य ते करावे. जग व त्याचा नकारात्मकपणा माझ्या विचारांवर प्रभाव करू शकतो कारण माझे जीवन हे ख्रिस्ताची सुंदरता आणि उत्तमतेचे प्रतिबिंब आहे!   मी केवळ त्या विचारांबद्दल विचार करतो जे त्यास गौरव, आदर आणि प्रशंसा आणते.


Join our WhatsApp Channel


Most Read
● दिवस १० :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● मृतामधून प्रथम जन्मलेला
● कृत्रिम बुद्धिमत्ता ख्रिस्तविरोधक आहे काय?
● दबोरा च्या जीवनाकडून शिकवण
● तुमच्या समस्या व तुमचा दृष्टीकोन
● तुम्ही आणि मी देवाची स्तुति का केली पाहिजे?
● दिवस १२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन