डेली मन्ना
51
12
3835
२१ दिवस उपवासः दिवस ०२
Monday, 13th of December 2021
Categories :
उपास व प्रार्थना
क्षमा काय आहे?
क्षमा हे संताप, कडवटपणा व क्रोधाची भावना व विचार आणि ज्यांनी आपले, आपल्या स्वतःचे वाईट केले आहे असा जो आपला विश्वास आहे त्यांच्या प्रति बदला व सूड ठेवण्याची गरज सोडून देण्याची व्यक्तिगत, स्वेच्छेची आंतरिक प्रक्रिया आहे.
ते एक समर्पण व निवड आहे. ते विश्वास व प्रीतीचे व्यक्त करणे होय.
क्षमा काय नाही आहे?
क्षमा ही काही भावना नाही
क्षमा हे केवळ विसरणे नाही
क्षमा करण्याचे लाभ
ते आपल्याला स्वतंत्र करते व आपल्याला लाभ पोहोचविते जसे काही आपल्या छातीवरून एक मोठे ओझे हे काढून टाकले आहे. अनेक वेळेला आपल्याला आपल्या स्वतःला सुद्धा क्षमा करण्याची गरज असते, कारण ते आपल्याला आपल्या भूतकाळापासून स्वतंत्र करते कारण स्वतःला क्षमा न करणे हे तुमच्या स्वतःला शिक्षा करण्यासारखे आहे. जर आपण क्षमा करीत नाही तर आपल्यातील हिस्सा हा कशा प्रकारच्या तरी संताप, क्रोध व पीडा किंवा त्रासात अडकलेला राहतो. क्षमाहीनता आपल्याला मर्यादित करते.
जेव्हा तुम्ही क्षमा करता, तेव्हा तुम्हाला जे सर्व काही तुम्ही करता त्यामध्ये एक सकारात्मक आचरण असते. ते तुमचे नातेसंबंध सुधारेल. तुम्ही एक उत्तम जोडीदार, एक उत्तम कामगार, एक उत्तम आई-वडील, एक उत्तम लेकरू, एक उत्तम विद्यार्थी व्हाल. तेथे तुमच्या पावलांमध्ये वाढ असेल. देवाचा पवित्र आत्मा तुमच्या प्रत्येक सत्वा मधून मुक्त पणे प्रवाहित होईल. त्याच्या परिणामामुळे आपल्या आरोग्यात सुद्धा सुधार होईल.
मला हे कसे कळेल की मी कोणाला क्षमा केली आहे किंवा नाही?
तुम्ही हे ओळखाल की तुम्ही पूर्णपणे क्षमा केली आहे जेव्हा जेव्हाकेव्हा ते विचार पुन्हा येतात, तुम्हाला कोणतीही पीडा, दु:खित होणे किंवा क्रोध वाटणार नाही. तुम्हाला तुमच्यात ख्रिस्ताच्या प्रीतीचा अभास वाटेल जो तुम्ही त्या व्यक्तीसह व्यक्त कराल.
मनन करण्यासाठी पवित्र वचन
कलस्सै ३:१३
मत्तय ६:१४-१५
लूक १७:३-४
इफिस ४:३१-३२
मार्क ११:२५
४० दिवसांची बायबल वाचन योजना
१ करिंथ ५-१०
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र जोपर्यंत तुमच्या अंत:करणातून येत नाही तोपर्यंत ते वारंवार म्हणा. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा, प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासह कमीत कमी १ मिनीट साठी असे करा.)
१. धन्यवादीत पवित्र आत्म्या ये, तुझे सामर्थ्य व कृपेने मला भर. मला क्षमा (त्या व्यक्तीचे/व्यक्तींचे नांव) करण्यास साहाय्य कर. मी हे तुझ्याशिवाय करू शकत नाही.
२. येशूच्या नांवात, मी (त्या व्यक्तीचे/व्यक्तींचे नांव घ्या) मोकळे करतो.
[वरील दोन पायऱ्या त्या लोकांसाठी वारंवार करा ज्यांनी तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना गहन दु:ख दिले आहे]
३. स्वर्गातील पित्या, मला प्रीति करण्यास शिकीव ---जसे तूं करतो व येशूच्या नांवात त्यांना आशीर्वादित कर.
४. पित्या, येशूच्या नांवात, माझे डोळे उघड की जसे तूं त्याला/तिला पाहतो (त्या व्यक्तीचे नांव घ्या) तसे पहावे कारण मी तुझे लेकरू आहे. माझ्यावर दया कर.
५. मी (त्या व्यक्तीचे नांव) क्षमा करतो, कारण मी विश्वासाने चालतो, भावने द्वारे नाही. यासाठी परमेश्वर खात्रीने माझा आदर करेल.
६. क्षमाहिनतेच्या कारणामुळे देवाची दया व कृपे पासून मला हिरावून ठेवणारी प्रत्येक शक्ति ने मला आता सोडावे व आत्ताच निघून जावे येशूच्या नांवात.
७. माझे आई-वडील/पूर्वजांकडून प्राप्त केलेला कडवटपणा व संतापाचा प्रत्येक ओघ हा आत्ता नष्ट केला जावो येशूच्या नांवात.
८. महान प्रगट करणाऱ्या, माझ्या समस्यांच्या मूळ कारणांस मला दाखव येशूच्या नांवात.
९. माझ्या पित्या, मी येथे माझ्या चारित्र्याच्या पूर्ण परिवर्तन साठी आहे. मला मोड व मला पुन्हा निर्माण कर येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel

Most Read
● देवाच्या प्रकारची प्रीति● देव पुरस्कार देणारा आहे
● संपन्नतेसाठी विसरलेली किल्ली
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● जीवनाच्या वादळांमध्ये विश्वास ठेवणे
● स्वतःची फसवणूक म्हणजे काय?-२
● चालण्यास शिकणे
टिप्पण्या