शेवटच्या समयात, अनेक हे कठीण प्रसंगातून जात आहेत. ते काहीही असू शकते की तुम्ही कठीणपरिस्थिती विषयी किंवा तुमची कारकीर्द,तुमची नोकरी, किंवा व्यवसाय संबंधी काही अनिश्चितते विषयीप्रार्थना करत असाल. मला विश्वास आहे की आजचा संदेश हा तुमच्या परिस्थिती मध्ये एक नवीन वाट आणेल.
जसे उत्पत्ति ३२ सुरु होते, याकोब हा प्रवासामध्ये आहे. त्यास याची खात्री नाही की त्याच्या कुटुंबाला काय होईल. जसे तो अनोळखी मार्गाचा सामना करीत आहे, तो घाबरला आहे.
इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्यास भेटले. त्यांस पाहून याकोब म्हणाला, हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नांव त्याने महनाइम (दोन सैन्ये) ठेविले." (उत्पत्ति ३२: १-२)
"महनाइम". या नावाचा अर्थ, "दोन सैन्ये". याकोब आणि त्याचे कुटुंब आणि त्याची संपत्ति यांनी तेथे डेरा दिला होता आणि तसेच देवदूतांची सेना तेथे होती.
कदाचित, याकोबप्रमाणे, तुम्हीकशासाठी तरी "तुमच्या मार्गावर" आहात. किंवा हे कदाचित असे असू शकते की परमेश्वराला तुमच्या सध्याच्या परिस्थिती विषयी तुम्हाला बोलावयाचे आहे.
मी विश्वास ठेवतो की परमेश्वर तुम्हाला बोलत आहे, हे दुप्पट छावणीचे ठिकाण आहे. मी तुमच्यासाठी देवदूतांना पाठविले आहे, आणि ते तुमच्या भोवती आणि तुमच्या वतीने कार्यरत आहेत." कृपा करून तुमच्या आध्यात्मिक मनुष्यात ह्या प्रकटीकरणास घेऊन चाला.
एके दिवशी अलीशा आणि त्याच्या सेवका भोवती शत्रूच्या सेनेने घेरा घातला होता. ह्यावेळेस अलीशा ने भविष्यात्मक बोलत असे म्हटले, "त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत" (२ राजे ६: १६). त्याचवेळी अलीशा च्या सेवकाने हजारो देवदूतत्याच्याभोवती आहे असे पाहिले.
जर तुम्ही धैर्य सोडण्याच्या स्थितीत आहात, मीतुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे कीभरती ही लवकरच बदलणार आहे.
Bible Reading: lsaiah 28-30
अंगीकार
जे त्यांच्याबरोबर आहेत त्यांच्यापेक्षा ते जे माझ्याबरोबर आहेत ते अधिक आणि महान असे आहेत. (संपूर्ण दिवसभर हे बोलत राहा)
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुमच्या समस्या व तुमचा दृष्टीकोन● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● दिवस ०२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● युद्धासाठी प्रशिक्षण - २
● तुमच्या रांगेतच राहा
● उपासने साठी इंधन
● शेवटच्या समयाचे 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे # २
टिप्पण्या