द्वार विषयी बायबलबरेच काही बोलते. जसे येथे स्वाभाविक स्तरातद्वारपाळ आहेत, परमेश्वराने सुद्धा आपल्याला बोलाविले आहे की आध्यात्मिक स्तरात द्वारपाळ असे व्हावे.
चला मला तुम्हाला स्वाभाविक स्तरातद्वारपाळ चे उदाहरण देऊ दया. जेव्हा तुम्ही विमानाने प्रवास करता, तुम्ही असेच केवळ विमानात जाऊ शकत नाही. तेथे अनेक द्वार आहेत ज्याद्वारे तुम्हाला जायचे असते. आणि विविध द्वारावर ते तुमचे सर्व दस्तावेज तपासत असतात आणि मग तेव्हाच तुम्ही विमानात जाऊ शकतात.
हे द्वारपाळ लोकांची तपासणी करतात म्हणजे लोक जे विमानात प्रवास करणार आहेत त्यांचा सुरक्षित प्रवास व्हावा. हे द्वारपाळ सुरक्षेची भिंत असे कार्य करतात.
द्वारपाळ हे: शल्लूम, अक्कूब, टल्मोन, अहिमान व त्यांचे भाऊबंद; शल्लूम हा त्यांचा प्रमुख होता. (१ इतिहास ९:१७)
तुम्ही पाहा बायबल द्वारपाळांची ओळख करते इतके की त्यांचा उल्लेख नावा द्वारे केला आहे. यावरून तुम्ही समजू शकता की द्वाराची रक्षा करण्यात परमेश्वर किती महत्त्वदेतो.
राजा दावीद ला द्वारचे रक्षण करण्याचे महत्त्व ठाऊक होते. दावीद ने म्हटले, "दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे मला इष्ट वाटते." (स्तोत्र ८४:१०)
आपल्यालातीन द्वार आहेत ज्याद्वारे जीवनात प्रवेश हा दिला जातो. आपल्याला डोळे द्वार, कान द्वार व तोंड द्वार आहेत.
कान द्वार व डोळे द्वार हेच केवळ आपल्या जीवनात येण्याचे दोन मुख्य प्रवेश द्वार आहेत. आपण आपल्या डोळ्यांनी काय पाहतो आणि आपल्या कानांनी काय ऐकतो तेच काय ते आपल्या अंत:करणात जाते आणि मग शेवटी आपल्या तोंडावाटे बाहेर येते.
परमेश्वर आपल्याला आपले डोळे द्वार व कान द्वार चे रक्षण करण्यास सांगत आहे, असे करण्याने आपण आपल्या अंत:करणाचे रक्षण करतो आणि मग आपल्या तोंड द्वार चे सुद्धा रक्षण करू शकतो.
असे करण्याने, तुम्ही तुमचे जग, आणि तुमच्या भोवतालच्या लोकांचे जग बदलाल.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी माझे डोळे व कान तुझ्या धार्मिकतेचे अवयव असे समर्पित करतो. हे परमेश्वरा, माझ्यामुखावर पाहारा ठेव; माझ्यावाणीचे द्वार संभाळ. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मत्सराच्या आत्म्यावर प्रभुत्व मिळविणे● दिवस १२ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● निराशेवर मात कशी करावी
● २१ दिवस उपवासः दिवस १५
● भविष्यात्मक मध्यस्थी
● लहान तडजोडी
● तुमच्या पडीक जमिनीस नांगरा
टिप्पण्या