आणि विश्वासावाचून त्याला 'संतोषाविणे' अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. (इब्री ११:६)
जे सर्व काही आपण देवापासून प्राप्त करतो ते विश्वासाने येते. आज, मला तीन सामर्थ्यशाली किल्ल्या सांगावयाच्या आहेत की देवाकडून विश्वासाद्वारे प्राप्त करावे.
किल्ली# १
१. आपण प्रामाणिकपणे व मनापासून विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वात आहे. आज आपल्या सभोवतालचे जग देवाचा सतत नकार करते. आपण ते खोटे विकत घेऊ नये. बायबल स्पष्टपणे सांगते की, "आकाश देवाचा महिमा वर्णिते; अंतरीक्ष त्याची हस्तकृती दर्शविते." (स्तोत्र १९:१)
दुसरे, आपण पाहिले आहे जगभरातील पुरुष व स्त्रियांच्या जीवनात व आपल्या सभोवतालच्या लोकांच्या जीवनात परमेश्वर त्याची चमत्कारिक मध्यस्थी दर्शवितो.
रुथ ही मवाबी विधवा होती. सुरुवातीला तिने इस्राएल च्या देवावर भरवसा ठेवला नाही. तथापि, तिचेमोठेनुकसान व क्लेश झाल्यावरही तिने देवावर भरवसा ठेवला व त्याला तीचा परमेश्वर मानले(रुथ १:१६). तुम्ही मोठे नुकसान व क्लेश मधून गेला असाल. सैतानास तुम्हाला हे खोटे बोलू देऊ नका की परमेश्वर अस्तित्वात नाही. त्या नुकसान व क्लेश ला तुम्हाला परमेश्वरापासून दूर नेऊ देऊ नका. त्याऐवजी त्यास अधिक जडून राहा.
किल्ली# २
२. परमेश्वर त्यास पुरस्कार देतो जे त्यास परिश्रमाने शोधतात
रुथ परिश्रमपूर्वक परमेश्वराच्या मागे चालली. ती मवाब कडून बेथलेहम (याचा अर्थ अन्नाचे घर)-देवाचे घर, कडे वळली.
परमेश्वर रुथ च्या विश्वासाने प्रसन्न झाला जरी ती एक परराष्ट्रीय स्त्री होती जिने सर्वकाही गमाविले होते की त्याने केवळतिला तिच्या जीवनात आशीर्वाद दिला नाही परंतु त्याने त्याचा पुत्र, प्रभु येशू ख्रिस्ताच्या वंशावळी मध्ये सुद्धा तिलाजोडले. तेच तुमच्यासाठी सुद्धा होऊ शकते.
किल्ली# ३
पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. (याकोब १:६-७)
मला ह्या वाक्प्रचार कडे पाहावयाचे आहे: "काही मिळेल" काही मध्ये आरोग्य, सुटका, संपन्नता वगैरे सामाविलेले आहे. दुसऱ्या शब्दात, काही मध्ये सर्व गोष्टी सामाविलेल्या आहेत.
परमेश्वराकडून सरळपणे प्राप्त करण्यासाठी किल्ली ही "विश्वासा मध्ये मागणे" आहे.
आता प्रथम, तुम्ही कदाचित काहीही ताबडतोब परिणाम पाहणार नाही परंतु मागण्या द्वारे तुम्ही वचन आचरणात आणता, तुमचे आध्यात्मिक स्नायू हे विकसित होतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात "काही" हे प्रगट होत आहे हे पाहाल.
अशा प्रकारे विश्वासाच्या महान पुरुष व स्त्रियांनी त्यांचा विश्वास विकसित केला आणि म्हणून तुम्ही व मी ते करू शकतो.
अनेक वर्षांपूर्वी, मीदेवाच्या एक महान मनुष्य डॉ. डी. जी. एस. दिनाकरण चे ऐकले ज्यांनी ऐम्पलीफाईड बायबल मधून संदर्भ दिला होता. सतत मागत राहा आणि ते तुम्हाला देण्यात येईल;
सतत शोधत राहा आणि तुम्हाला ते सापडेल, व सतत ठोकत राहा [आदराने] आणि[दरवाजा] तुमच्यासाठीउघडले जाईल. (मत्तय ७:७)
जर तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेतले, मूळ भाषांतर म्हणते, "सतत मागत राहा व ते तुम्हाला देण्यात येईल." अनेक जण एक किंवा दोन दिवस मागतात आणि मग मागणे सोडून देतात.
मागा व सतत मागत राहा, ते खात्रीने तुम्हाला देण्यात येईल.
प्रार्थना
स्वर्गातील पित्या, माझा अविश्वास क्षमा कर. मला तुझी कृपा व सामर्थ्य पुरीव की माझ्या आयुष्याच्या सर्व दिवसात परिश्रमपूर्वक तुझा धावा करू. तूं माझे पुरस्कार आहे. मी तुझी उपासना करतो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आध्यात्मिक आहार जो तुमचे भवितव्य ठरवतो● कृपेचे प्रगट होणे
● चालढकल करण्याच्या बलाढ्यला मारणे
● नम्रता हे कमकुवतपणा समान नाही
● चालण्यास शिकणे
● २१ दिवस उपवासः दिवस ०१
● सापडलेल्या मेंढराचा आनंद
टिप्पण्या
