योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांस सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यांस म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. (उत्पत्ति ३७:५-६)
आपल्या सर्वांना जीवनात काही गोष्टी करून घेण्यासाठी स्वप्ने व योजना आहेत. आपल्यापैंकी काही उत्तमे जे आहे ते त्यानुसार विचार करण्याद्वारे पाऊलो पावले सिद्धपणे तसे करतात. जशी परिस्थिती आहे त्यामध्ये इतर वाहवत जात ते त्याबद्दल विचार करण्याच्या प्रक्रीये मध्ये असतात.
महान वाटचाली ह्या नेहमी स्वप्ना द्वारे सुरुवात होतात. योसेफाला स्वप्न पडले की तो एके दिवशी सामर्थ्यशाली पुढारी होईल.
तुमच्या संपूर्ण जीवनभर हे लक्षात ठेवा. एक दैवी स्वप्न नेहमीच विरोधास आकर्षित करेल. त्यामुळेच मी म्हणतो, स्वप्ने ही धोकादायक होऊ शकतात. योसेफाच्या स्वप्नाने त्याच्या स्वतःच्या भावांमध्ये द्वेष निर्माण केला. योसेफा पुढे नतमस्तक होण्याची कल्पना त्यांना आवडली नाही. त्याच्या स्वप्नाचा त्याचे बंधु हे बोलण्यात परिणाम झाला,
"त्यांनी त्याला दुरून पाहिले तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहंचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकांस म्हणाले, पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे. तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खाड्यात टाकून देऊ आणि माग सांगू की कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकिले; मग पाहू त्याच्या स्वप्नाचे काय होते ते." (उत्पत्ति ३७:१८-२०)
कधीकधी, ती स्वप्ने निराशा व रोजच्या जीवनाच्या नित्याच्या गोष्टींद्वारे इतकी कुचरली जातात की मग तेथून पुढे आपल्याला त्या पूर्ण करण्यासाठी शक्ति उरत नाही.
जेव्हा ते घडते, तेव्हा आपल्याला निवड आहे. वाईट वागणूक दिल्यामुळे आपण कट्टर होतो व रागात येऊ शकतो किंवा जे आपल्याला दु:ख देतात त्यांना आपण क्षमा करू शकतो आणि आपले पूर्ण करण्यापासून अडथळा करू शकतो.
योसेफाने पाहिले की देवाचा हात त्याच्या जीवनात कार्यरत आहे. अनेक वर्षांनंतर, जेव्हा तो त्याच्या भावांना भेटला, त्याने म्हटले, "तुम्ही माझे वाईट योजिले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजिले होते." (उत्पत्ति ५०:२०)
पीडा व यातनेच्या मध्य, परमेश्वराने त्या दृश्याच्या मागे अद्भुतरीतीने कार्य केले की योसेफाचे रक्षण करावे व त्यास मिसर मध्ये उच्च पदावर आरूढ करावे.
योसेफाच्या स्वप्नाने अनेक लोकांच्या जीवनात आशीर्वाद आणला. योसेफाच्या जीवनाने भविष्यात्मकदृष्टया जो महान सोडविणारा येणार आहे त्याकडे निर्देश दिले होते-प्रभु येशू ख्रिस्त.
तुम्ही जेव्हा तुमचे स्वप्न प्रभुपुढे अर्पण करता आणि त्याच्या वचनाला तुमच्या जीवनात कार्य करू देता, तुमचे स्वप्न खात्रीने पूर्ण होईल. त्याच्यावर भरंवसा ठेवा आणि तुम्ही खात्रीने ते पूर्ण कराल.
४० दिवसांची बायबल वाचन योजना
मत्तय २०-२६
प्रार्थना
पित्या, तूं जे स्वप्न मला दिले आहे त्यासाठी तुझा धन्यवाद. जरी जेव्हा माझ्याभोवती जे होत आहे त्याचा अर्थ मी समजू शकत नाही, मी विश्वास ठेवतो की सर्व गोष्टी माझ्या वतीने कार्य करीत आहे कारण तुझा हात माझ्यावर आहे. येशूच्या नांवात, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०६: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
● त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे
● यहूदाच्या पतनापासून ३ शिकवणी
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
● तुमचा गुरु कोण आहे - I
टिप्पण्या