त्याविषयी तुम्ही उल्लास करिता, तरी तुम्ही आता थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षामुळे दु:ख सोसले. (१ पेत्र १: ६)
तीव्र आणि प्रदीर्घ त्रास आणि संकटे ही काही ख्रिस्ती लोकांना निराशेच्या क्षणापर्यंत नेऊ शकतात. अशी इच्छा ईयोबाने केली, मी जन्मास येऊन न आल्यासारखा झालो असतो, मी गर्भावस्थेतूनच कबरेत गेलो असतो. (ईयोब १०: १९)
१. वाक्य'आता थोडा वेळ', याकडे लक्ष दया,
संकटे ही स्वभावतः तात्पुरती आहेत. आपल्याला सतत हे आठवण करून देण्याची गरज आहे कि, "कारण आपल्यासाठी जे गौरव प्रगट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दु:खे काहीच नाहीत असे मी मानतो." (रोम १०: १८)
तसेच, आपल्याला हे पाहण्याची सुद्धा गरज आहे, "कारण आम्हांवर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हांसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करिते." (२ करिंथ ४: १७)
२. वाक्य'भाग पडले तसे' याकडे लक्ष दया
संकटे ही केवळ आपल्याकडे येतात जर त्या आवश्यक आहेत. परमेश्वराला, त्याच्या असीमित ज्ञानामध्ये, ठाऊक आहे की कोणत्या प्रकारची संकटे ही निर्माण करावीत की आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक वाढीसाठी आवश्यक चालना दयावी.
उदाहरणार्थ, परमेश्वराने, सैतानाला परवानगी दिली की, पौलाच्या"शरीरात एक कांटा टोचावा". परंतु ते त्याच्या स्वतःच्या भल्यासाठी होते, आणि एका विशेष उद्धेशासाठी होते म्हणजे त्यास गर्व होऊ नये. (२ करिंथ १२: ७-१०)
३. वाक्य'निरनिराळ्या परीक्षा' हे लक्षात घ्या.
संकटे ही वेगवेगळ्या आकारात आणि प्रकारात येतात. कधी कधी ते आपल्या शरीराला आणि इतर वेळेला आपल्या मनाला क्लेश देतात. अनेक वेळेला ते आपल्या आरामाच्या क्षेत्राला आणि इतर वेळेला आपल्या प्रिय जनांना क्लेश देतात. याची पर्वा नाही की त्याचा उगम काय आहे, संकटे संधी पुरवितात की ईश्वरीय जीवनात प्रशिक्षित व्हावे कारण परमेश्वर त्याचा उपयोग करतो की आपल्याला ख्रिस्ता समान बनवावे. (इब्री १२: ६, ११)
ह्यासाठीकी, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करितात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावे. (१ पेत्र १: ७)
परमेश्वराने संकटे यासाठी आणली नाही की तुम्हाला अपयशात स्थिर करावे परंतु तुमच्या विश्वासाची "प्रामाणिकता" सिद्ध करावी.
सोने हे जगाच्या परिमाणानुसार एक बहुमुल्य धातू आहे असे मानले आहे. सोन्याला शुद्ध करण्यासाठी, ते त्यास अग्नीतून जाऊ देतात म्हणजे सोन्यात लपलेली अशुद्धता ही काढली जावी आणि शुद्ध सोने हे ठेवले जावे.
त्याप्रमाणे, संकटे तुमच्या विश्वासाच्या भट्टी ला तपावितात, ते देवाला संधी देतात की त्यास शुद्ध करावे आणि तुम्हाला सिद्ध करावे की तुमचा विश्वास हा "सोन्यापेक्षा मूल्यवान" असा आहे. (ईयोब २३: १०)
Bible Reading : Genesis 25 - 26
अंगीकार
मी आशीर्वादित पुरुष आहे जो संकटाच्या मध्य स्थिर उभा राहतो. मी प्रत्येक संकटातून पूर्वीपेक्षा अधिक बलवानपणे बाहेर निघेन. मी जीवनाचा मुगूट प्राप्त करेन, जे देवाने त्यांच्यासाठी आश्वासित केले आहे जेत्याजवरप्रीति करतात. (याकोब १: १२)
Join our WhatsApp Channel

Most Read
● देव महान द्वार उघडतो● गमाविलेले रहस्य
● अपराध-मुक्त जीवन जगणे
● विश्वास काय आहे?
● भटकण्याचे सोडा
● एक आदर्श व्हा
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – १
टिप्पण्या