अनेक वेळेला लोक त्यांच्या समस्या त्यांची ओळख, त्यांचे जीवन असे होऊ देतात. ते जे काही विचार करतात, बोलतात व करतात ते त्यास स्पष्ट करीत असते.
आपल्या समस्यांना आपल्या ओळखी बरोबर जोडणे हे जीवनात अनेक समस्यांना निर्माण करू शकते.
१. ते व्यक्तीला अत्यंत निराश करू शकते.
२. एकव्यक्ति पूर्णपणे आशा सोडून देऊ शकतो की तेथून पुन्हा परतू नये.
मी नम्रपणे तुम्हाला विनंती करू इच्छितो की तुमच्या परिस्थितीला बळी पडू नका.
आज, परमेश्वराला पाहिजे की तुमच्या संघर्षामध्ये तुम्हाला विजय दयावा.तुमच्या लज्जेच्या ठिकाणी तुम्हाला दुप्पट सन्मान दयावा असे त्यास पाहिजे. त्यांस पाहिजे की तुम्हीं त्याच्यावर भरवंसा ठेवावा आणि त्याच्याबरोबर सहकार्य करावे जेव्हा तो तुम्हाला त्या संघर्षावर एकावेळी एक पायरी विजय देण्यास मार्गदर्शन करतो. तुमच्या विजयाच्या मार्गावर काही पायऱ्या तुम्हाला मला सांगू दया.
१. तुमच्या समस्या लक्ष वेधून घेणे किंवा सहानुभूती किंवा दया मिळविण्याचे माध्यम म्हणून वापरण्याचा प्रयत्न करू नका.
२. तुमच्या समस्या प्रत्येकाला किंवा कोणालाही सांगण्याचे थांबा. परमेश्वराला विनंती करा की योग्य व्यक्तींच्या संपर्कात तुम्हाला आणावे ज्यांना तुम्ही ते सांगू शकता.
३. तुम्हाला काय वाटत आहे किंवा ज्यामधून तुम्ही जात आहात ते सामाजिक माध्यमावर टाकू नका.
४. लोकांना तुमच्या परिस्थिती विषयी प्रार्थना करण्यास सांगा आणि होय, तुम्ही सुद्धा प्रार्थना करा. येथे काही लोक आहेत जे सर्वांना त्यांच्या प्रार्थनेच्या विनंत्या पाठवीत असतात परंतु ते स्वतः कधी प्रार्थना करीत नाहीत.
५. रोम १२:२ नुसार तुमच्या मनाचे नवीकरण करा.
तुमच्या सभोवतालच्या संस्कृतीचे आदर्श व मतानुसार चालण्याचे सोडा परंतु तुम्ही संपूर्णसुधारणे द्वारे कसा विचार करता त्याद्वारे पवित्र आत्म्याने अंतस्थ रुपांतरीत व्हा. हे तुम्हाला समर्थ करेलकी देवाची इच्छा ओळखावी जेव्हा तुम्ही एक सुंदर जीवन जगता, जे त्याच्या नजरेत समाधानी व सिद्ध असे आहे. (रोम १२:२)
२ करिंथ मध्ये पौल त्याच्या एका संघर्षा बद्दल बोलत आहे जो निघून जात नाही. तो त्यास "त्याच्या शरीरात काटा" असे म्हणत आहे.
प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक कांटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली; परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. (२ करिंथ १२: ७-१०)
कोणालाही ठाऊक नाही की पौलाचा'शरीरातील कांटा' काय होता. काही विचार करतात की तो शारीरिक आजार असेन. इतर विचार करतात की तो एक नैतिक विषय असेन. मला हे प्रत्यक्षात आवडते की बायबल हे सांगत नाही की ते काय होते, कारण आपल्यातील प्रत्येकजण त्याशी संबंध जोडू शकतो.
आपले संघर्ष हे वेगवेगळे आहेत, परंतु सत्य हे आहे की आपण सर्व जण कशाविषयी तरी संघर्षात असतो.
परंतु, पौलाने त्याची समस्या त्याची ओळख असे होऊ दिलेनाही. त्याने त्याच्या संघर्षाला तो कोण आहे ते स्पष्ट करू दिले नाही.परमेश्वराने ज्यासाठी त्यास बोलाविले होते त्याने त्याच्या संघर्षाला ते करण्यापासून अडथळा असे होऊ दिले नाही. आणि तुम्ही सुद्धा तसे होऊ देऊ नका.
Bible Reading: Daniel 6-7
अंगीकार
परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर स्थिर राहो. त्याची कृपा माझ्यासाठी पुरेशी आहे. माझे संघर्ष, माझ्या पीडा मला स्पष्ट करणार नाहीत-परमेश्वर करेल. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● येशूचे नांव● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
● तुमच्या नियतीचा विनाश करू नका!
● उत्तमतेच्या मागे लागणे
● देवाचे ७ आत्मे: समज चा आत्मा
● शांततेसाठी दृष्टी
● दिवस ३२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या