बंधुंनो, तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्यात आम्ही नेहमीच प्रतिबद्ध असे आहोत, तुमच्या विश्वासाच्या वाढण्यामुळे ते योग्यच असे आहे, आणि तुमच्या प्रत्येकाची प्रीति एकमेकांप्रती अत्यंत विपुल अशी आहे. (१ थेस्सलनी १:३)
तुमचा विश्वास हा वाढू शकतो याविषयी तुम्ही अवगत आहात काय? तुम्ही हे जाणू शकता काय तुम्ही अत्यंत वाढणाऱ्या विश्वासासह जगू शकता जेथे तुम्ही जीवनाच्या समस्यांविषयी फारच कमी चिंतेत राहता व म्हणून देवावर लक्ष केंद्रित राहता?जेथे तुमचा आनंद हा साधनसंपत्ति वरून येत नाही परंतु पवित्र आत्म्याने.
बायबल अशा निश्चित प्रकारच्या लोकांविषयी बोलते जे कधीही अपयशी न ठरणारे सामर्थ्य व अमर्यादित शक्यतेचा अनुभव करतील, यशया ४०:३१ मध्ये, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. हे वचन प्रगट करते की येथे ख्रिस्ती जीवन जगण्याची शक्यता आहे जेथे तुम्ही कधीही, थकत, दमत नाही, किंवा पुढे जाण्याच्या सामर्थ्यात कमी पडत नाही! मन हेलावून सोडणारे- हो की नाही.
ज्याप्रमाणे प्रत्येक वाढ ही जिवंत आहे याचे चिन्ह आहे, देवामधील वाढता विश्वास व भरंवसा हे देवा मधील जिवंत असण्याचीआशा आहे. विश्वासात अत्यंत वाढण्यासाठी, तुमचे मूळ हे अपयशी न ठरणाऱ्या परमेश्वरा मध्ये अति सखोलतेमध्ये गेले पाहिजे. तुम्ही पाहा, देवाच्या वचनानुसार चालणे हे विश्वासाचे मोठे समर्थक आहे! देवाच्या वचनाशिवाय जगणे, हे तुमच्या
विश्वासाच्या-जीवनाला मृत्यू येणे अवश्य आहे. येथे आणखी एक गोष्ट आहे; प्रार्थना ही तुमची दररोजची जीवनशैली असली पाहिजे. प्रार्थना हा एक सर्वात उत्तम मार्ग आहे की तुमच्या विश्वासाला बळकट करण्यासाठी देवाच्या योग्यतेसाठी मागणी करणे. (यहूदा २०)
विश्वासाचा मनुष्य हा मनुष्य आहे ज्याचे जिवंत राहणे हे देवा मध्ये मुळावलेले आहे. आपला पिता अब्राहाम, इसहाक, एलीया, दावीद, प्रभु येशू आणि बायबल मधील अनेक चरित्रांमध्ये हे गुण सापडतात. तारणाच्या वेळी विश्वासाचे बीज जे प्राप्त केले आहे. हे सहसा वचन व प्रार्थने द्वारे पाणी घातले पाहिजे जर पीक उत्पन्न करावयाचे आहे.
एक मार्ग की विश्वासाचे मोजमाप करावे ते प्रीति आहे. ... तुमच्या प्रत्येकाची प्रीति एकमेकांप्रती अत्यंत विपुल अशी आहे. तुमच्या प्रीतीचे जीवन कसे आहे? तुम्ही देवाला किती प्रेम करता? तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर किती प्रीति करता? विश्वासात वाढणे हे प्रीति मध्ये वाढणे आहे. विश्वास असण्यासाठी, तुमच्याकडे प्रथम प्रीति असली पाहिजे; हे गलती ५:२२ मध्ये स्पष्ट केले आहे.
विश्वासात वाढणे म्हणजे आध्यात्मिक ज्ञान, सत्यता, व प्रत्यक्षते मध्ये वाढणे होय. वचना विषयी तुम्हाला किती ठाऊक आहे? त्यापैकी किती गोष्टीनी तुमच्या जीवनाला परिवर्तीत केले आहे? वचनाचे तुम्ही काय सोडून दिले आहे? बायबल मधील प्रत्येक पुरुष व स्त्री हे सर्व परिवर्तनाच्या प्रक्रीयेमधून गेले आहेत. ते शुद्ध केलेल्या सोन्यासारखे होते की त्याचा सर्वात चांगला भाग पुढे आणावा.
अत्यंत वाढणाऱ्या विश्वासाचे जीवन हे समर्पण व त्यागाचे जीवन आहे. देवाला देण्यासाठी काहीही एवढे मोठे राहत नाही, आणि देवाकडून कोणतेही वचन कार्य करण्यात तोकडे राहत नाही. ख्रिस्ती म्हणून, आपल्याला विश्वासात अत्यंत वाढावयाचे आहे, थेस्सलनी येथील लोकांसारखे. आपला विश्वास हा लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत व कारण असले पाहिजे की त्यांनी देवाची स्तुति करावी. आजपासून विश्वासात जाणूनबुजून वाढण्याची निवड करा.
प्रार्थना
पित्या, मला विश्वासात अत्यंत वाढावयाचे आहे व तुझ्यासाठी आनंदाचे स्त्रोत व्हावे. म्हणून परमेश्वरा, मला साहाय्य कर.
येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● काय तुम्ही एकाकीपणाचा संघर्ष करित आहात?● परमेश्वर कधी चुकत नाही
● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● त्याला सर्व सांगा
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1
● त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
● बंदिस्त शक्ती: न वापरलेल्या वरदानांचा नाश
टिप्पण्या