आपण वातावरणाविषयी शिकत आहोत. आज, आपण वातावरणामध्ये समज प्राप्त करण्याचा आपला शोध चालू ठेवू.
एक प्रश्न मला नेहमी विचारला गेला आहे की, आपण वातावरण तयार करू शकतो काय? उत्तर हे, होय आहे. यासाठी आपल्याला आपल्या विश्वासाचा उत्पादक व सिद्ध उदाहरण प्रभु येशुकडून शिकण्याची गरज आहे. (इब्री ६:२०, १ पेत्र २)
प्रभु येशू याईर च्या घराच्या मार्गावर त्याच्या मुलीला बरे करण्यास जात असताना बातमी ऐकतो की ती मरण पावली आहे. ते ऐकुने येशू त्याला म्हणाल, भिऊ नका, विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल. नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपणा बरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. (लूक ८:५०-५१)
त्या लहान मुलीला पुन्हा जिवंत करण्यापूर्वी, त्याने निंदा करणाऱ्यांस बाहेर घालवून दिले. त्याने चमत्कारासाठी वातावरण तयार केले.
जरी जेव्हा आपण सर्व निंदा करणाऱ्यांस शांत करू शकणार नाही, पण निश्चितच गर्व, क्षमाहीनता वगैरे आपल्या जीवनातून बाहेर काढू शकतो. कोणासाठी प्रार्थना करण्याअगोदर, याची खात्री करा की तुम्ही त्यांना पश्चातापाच्या प्रार्थनेमध्ये व येशूला त्यांचा तारणारा असे स्वीकारण्यात न्यावे. तसेच, जेव्हा तुम्ही कोणाबरोबर प्रार्थना करता, याची खात्री करा की तुम्ही काही वेळ उपासनेत घालवावा, आणि केवळ तेव्हाच आवश्यक प्रार्थनेत जावे कारण हे तुमचे अंत:करण त्याच्या आत्म्याबरोबर एक करेल.
प्रेषित पेत्राने चमत्कारा साठी वातावरण तयार करणे हे रहस्य त्याचा प्रभु व स्वामी- प्रभु येशू ख्रिस्ता कडून शिकले होते.
जेव्हा त्यास एक स्त्री दुर्कस साठी प्रार्थना करण्यास बोलाविले होते, पेत्राने त्या सर्वांना (सर्व लोकांना) बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली; मग कुडीकडे वळून म्हटले, टबीथे, ऊठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. (प्रेषित ९:४०)
पेत्राने प्रभु येशू प्रमाणे अडथळ्यास काढण्याद्वारे चमत्कारा साठी वातावरण तयार केले. आपण सुद्धा ह्यापासून शिकू शकतो व स्वामी व त्याचा महान प्रेषित यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालू शकतो.
मला तुम्हाला सत्याची आणखी एक मौल्यवान गोष्ट सांगू दया.
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तूं बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तूं मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. (मत्तय १६:१९)
परमेश्वराने आपल्याला सामर्थ्य दिले आहे की स्वर्गीय स्थानात दुष्ट आत्म्यांना बांधून ठेवावे. एखादया ठिकाणी प्रार्थना करण्यापूर्वी, आपण येशूच्या नांवात अधिकार घेतला पाहिजे व प्रत्येक अडथळे, प्रत्येक अवरोध व प्रत्येक शक्तीला बांधले पाहिजे जे चमत्कार प्रगट होण्यास अडथळा करणारे असेल. अशा प्रकारे तुम्ही चमत्कार साठी वातावरण तयार करू शकता.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी व माझ्या कुटुंबाच्या विरोधात आमची नवीन वाटचाल मिळण्यापासून अडथळा करणाऱ्या अंधाऱ्या शक्तींना बांधून टाकत आहे. मी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवनावर सुटका व कृपा बोलत आहे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वासाचे बरे करणारे सामर्थ्य● तो शब्द पाळ
● वाट पाहण्यामुळे एका राष्ट्राचा उद्धार केला गेला
● प्राचीन इस्राएलच्या घरांकडून शिकवणी
● एका भेटीचे सामर्थ्य
● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
● चर्चला न जाता चर्च ऑनलाईन पाहणे ठीक आहे काय?
टिप्पण्या