डेली मन्ना
आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -३
Wednesday, 28th of August 2024
27
25
410
Categories :
आध्यात्मिक शक्ती
आज, जर आपण आपले जीवन, आपला व्यवसाय उपवास, प्रार्थना आणि अश्रू यांच्याद्वारे बांधले आणि काही प्रमाणात यश संपादन केले तर समीक्षक ते पचवू शकणार नाहीत, बर्याचदा ते आपल्या दुष्ट शब्दाने तुम्हाला लांछन लावतात. ते फक्त तुमचे वैभव पाहतात आणि हेवा करतात, परंतु त्यांनी तुमची कथा जाणून घेण्याचा प्रयत्न कधीच केलेला नसतो.
अनेक खोटे सोंग घेऊन बहाने करत टीका करतात. मात्र, जेव्हा तुम्ही खोल संघर्ष करीत असाल तेव्हा ते तुम्हाला कधीच सुधारणार नाहीत. ते तुमच्या मदतीसाठी बोट देखील देणार नाहीत. जेव्हा तुमची वाढ होण्यास सुरुवात होते, तेव्हा ते स्वयं-नियुक्त संरक्षक म्हणून कार्य करतात. कदाचित एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर हल्ला केल्याने त्यांना त्यांचा अभिनय कायम ठेवण्यासाठी आवश्यक असणारी विव्ह्स आणि सोशल मीडियावर पसंती मिळत असावी.
दक्षिण भारतामध्ये देवाटे महान दास राहत होते, ज्यांचा देवाने सामर्थ्याने उपयोग केला. एका दिवशी, एका कारच्या अपघातात त्यांनी आपल्या अनमोल मुलीला गमावले. समीक्षक त्यांच्या विरुद्ध तीव्रतेने कसे उठले हे आपण पाहायला हवे होते. त्यांनी त्यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या सेवेविरुध्द सर्व प्रकारच्या विचित्र गोष्टी लिहिल्या. आपल्या तरुण मुलीचा मृत्यू आणि कटू टीकेने त्याचे हृदय तुटले. त्यांनी जवळजवळ सेवेचा त्याग केला होता.
एके दिवशी कौटुंबिक प्रार्थनेच्या वेळी, पवित्र आत्मा त्या व्यक्तीवर उतरला आणि तो देवाच्या प्रिय माणसाला म्हणाला, “माझ्या मुला, तू या सर्व गोष्टीतून गेला असूनही, माझी सेवा करशील की नाही याची सर्व स्वर्ग आतुरतेने वाट पाहत आहे. त्या क्षणी, देवाच्या सेवकाने मोठ्याने आक्रोश केला आणि ते म्हणाले, “मी शेवटच्या श्वासापर्यत परमेश्वराची सेवा करीन.” त्या क्षणापासून, त्यांचे सेवाकार्य सर्व जगभर पसरले. तुम्हाला या प्रिय देवाच्या माणसाचे रहस्य माहित आहे का? ते दररोज निरनिराळ्या भाषेत प्रार्थना करीत असे. निरनिराळ्या भाषेत प्रार्थना केल्याने आपल्या मानवी आत्म्यास विश्रांती मिळते. कदाचित तुम्ही आपले पाचारण किंवा सेवा सोडण्याच्या मार्गावर असाल; निरनिराळ्या भाषेत प्रार्थना करण्यास प्रारंभ करा, त्यामुळे आत्म्याच्या राज्यात तुम्ही पुढच्या स्तरावर जाल.
तोतर्यांच्या द्वारे परभाषेत तो ह्या लोकांशी बोलेल; तो त्यांना म्हणाला होता, “ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या; त्याने त्याला आराम होईल,” तरी ते ऐकतना. (यशया २८:११-१२)
निरनिराळ्या भाषेत बोलणे इतके शक्तिशाली आणि उत्पादनक्षम आहे, म्हणूनच काहीजण त्यास ऐकणार नाहीत. याची यशया संदेष्ट्याने भविष्यवाणी केली होती; “परंतु ते ऐकणार नाही.” असे काही लोक आहेत जे निरनिराळ्या भाषा बोलण्याविरुद्ध बोलतात व लिहितात. ते बिर्याणी न चाखता बोलण्यासारखे आहे. ज्याने कधीही गणिताचा अभ्यास केला नाही अशा माणसाकडून गणित शिकण्यासारखे आहे. जे लोक निरनिराळ्या भाषांविरुध्द बोलतात आणि त्याविरुध्द लिहीतात, त्यांनी कधीच निरनिराळ्या भाषांचा अनुभव घेतलेला नसतो, कधीच निरनिराळ्या भाषेत बोललेले नसतात, तर अशा लोकांचे ऐकण्यात व त्यांच्याबरोबर वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवू नका. देवाने दिलेला हा खजिना कोणालाही घेऊ देऊ नका.
प्रेषित पेत्राच्या जीवनात असा एक काळ होता जेव्हा त्याने पुर्णपणे येशूला नाकारले होते. माझा विश्वास आहे की हे असे झाले कारण तो जीवनाच्या असा समयात होता जेव्हा तो निराश होता, तणावग्रस्त होता आणि आध्यात्मिकदृष्ट्या दुर्बल होता. तथापि, पेन्टेकॉस्टच्या दिवशी, पवित्र आत्मा पेत्रावर आला आणि तो निरनिराळ्या भाषांमध्ये बोलू लागला. हाच तो मनुष्य ज्याने येशूला नाकारले होते आणि म्हणाला होता की येशूशी माझा काहीही संबंध नाही, त्याच मनुष्याने धैर्याने तीन हजार लोकांना त्याची घोषणा केली ज्यांनी पश्चाताप केला व बाप्तिस्मा घेतला ( प्रेषितांची कृत्ये २).
बरेच लोक तणावातून सुटका मिळावी म्हणून तंबाखू आणि मद्यपानाचा उपयोग करतात. नकारात्मक दुष्परिणाम होण्याव्यतिरिक्त हे पदार्थ महाग असतात आणि त्याचे वारंवार व्यसन लागते. निरनिराळ्या भाषांमध्ये बोलणे ही सर्वात प्रभावी आध्यात्मिक तणावविरोधी उपचार आहे.
येशूच्या नावात, मी हुकूम देतो व घोषित करतो की तुमच्या समोर असलेल्या कोणत्याही गोष्टींवर तुम्ही मात कराल. तुम्हाला विजयी म्हणतील, तुम्हाला एक विजय मिळविणारे म्हणतील, घातलेल्या कपड्यांवरून तुम्ही ओळखले जाणार नाही, तुमची ओळख तुमच्या जीवनातून होणाऱ्या आत्म्याच्या प्रकटीकरणाद्वारे होईल.
अंगीकार
प्रभु येशू ख्रिस्ताच्या रक्ताने माझा आत्म्या, प्राण आणि शरीर व्यापली आहेत, आणि त्याने मला पवित्र केले आणि जग, देह आणि सैतान यांच्यापासून वेगळे केले आहे. निरनिराळ्या भाषेत बोलण्याने माझ्या संवेदना बरे आणि वाईट यात फरक करण्यास प्रशिक्षित झाल्या आहेत. येशूच्या नावात आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस २०: ४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● चांगले यश काय आहे?
● ओरडण्यापेक्षा दयेसाठी रडणे
● आत्मे जिंकणे-ते किती महत्वाचे आहे?
● ख्रिस्ताने कबरेवर विजय मिळविला आहे
● प्रभू येशू : शांतीचा स्त्रोत
● प्रारंभीच्या अवस्थेत परमेश्वराचीस्तुति करा
टिप्पण्या