चला आपण एदेन बागेत जाऊ - जेथे हे सर्व काही सुरु झाले
आदाम म्हणाला "जी स्त्री तूं मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि तें मी खाल्ले."
परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तूं काय केले? "स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी तें खाल्ले." (उत्पत्ति ३: १२-१३)
आदामाने स्त्री ला दोष दिला आणि स्त्री ने सर्पाला दोष दिला.
जेव्हा आदामाने पाप केले, आदामाने लगेचच इतरांना दोष देण्यास सुरुवात केली (जेव्हा मी आदाम म्हणतो, कृपा करून हे समजा की त्यात स्त्री सुद्धा आहे.)
पापाचा एक परिणाम हा आपण आपल्या कृतींची जबाबदारी घेण्यास नकार देतो. हे आचरण आहे, जे आज सर्वांमध्ये लहान लेकारांपासून ते वडिलधाऱ्या लोकांपर्यंत सार्वत्रिक आहे.
लोक त्यांच्या कृतींसाठी इतरांना दोष का देतात?
१. त्यांना त्या दोषासह राहावयासनको असते जे त्यांच्या कृतीसह येते.
२.त्यांना त्यांच्या कृत्यांच्या परिणामासाठी त्रास भोगायला नको असते. इतरांना दोष देणे हे सुटकाकरून घेण्याच्या यंत्रणे प्रमाणे आहे.
इतरांना दोष देण्याचा परिणाम
१. लोक जे त्यांच्या अपयशांसाठीइतरांना दोष देतात ते त्याच्या कधीही मात करू शकत नाही.
२. ते फक्त समस्ये कडून समस्येकडे जात राहतात आणि ते लोक सुद्धा शोधतात की त्याच्या समस्यांसाठी दोष दयावा.
त्यांच्यासारखे होऊ नका. तुमच्या सामर्थ्यास शिकविण्यासाठी, तुम्ही सतत तुमची सुधारणा केली पाहिजे आणि तुम्ही ते करू शकत नाही जर तुम्ही तुमच्या कृत्यांसाठी जबाबदारी घेत नाही आणि तुमच्या चुकांकडून शिकत नाही.
कमकुवत पुढाऱ्याचे एक चिन्ह
आणिशौल म्हणाला, "लोकांनी ती अमालेक्यांपासून आणिली आहेत; आपला देव परमेश्वर याच्याप्रीत्यर्थ बली अर्पण करण्यासाठी त्यांनी उत्तम उत्तम मेंढरे व गुरे राखून ठेविली आहेत; बाकी सर्वांचा आम्ही अगदी नाश केला आहे."
पुढारी हा त्याच्या लोकांसाठी जबाबदार आहे. तो लोकांवर दोष लावू शकत नाही.
शौल हा कमकुवत पुढारी होता आणि त्याच्या चुकांसाठी लोकांवर दोष लावला की परमेश्वराची आज्ञा पाळावी. एक कमकुवत पुढारी हा त्याचे अपयश/असमर्थते साठी नेहमी इतर, परिस्थिती, नशीब किंवा योगायोग वर दोष लावतो. पवित्र शास्त्र सांगते, "जे लोक आपल्या देवास ओळखीतात ते बलवान होऊन थोर कृत्ये करितील." (दानीएल ११:३२)
मनोरंजक गोष्ट ही, आदामाने त्याची पत्नी हव्वा वर दोष लावून सुद्धा आणि हव्वे ने तो दोष सर्पावर लावून सुद्धा, परमेश्वराने त्यांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार ठरविले आणि त्यांना त्यांच्या अवज्ञेच्या परिणामाला भोगावे लागले.
मग त्याने आदामाला म्हटले, "तूं आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तूं खाल्ले. (उत्पत्ति ३: १७)
न्यायाच्या दिवशी, दोष देण्यासाठी तेथे कोणतीही संधी मिळणार नाही.
आणि आपल्यातील प्रत्येक जणांस आपला हिशोब (न्यायाच्या प्रत्युत्तरात उत्तर दयावे लागेल) परमेश्वराला दयावा लागेल.
ह्यांकरीता आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये; तर असे ठरवून टाकावे की, कोणी आपल्या भावापुढे ठेच लागण्यासारखे काही किंवा अडखळण ठेवू नये. (रोम १४: १२-१३)
Bible Reading: Ecclesiastes 7-10
प्रार्थना
पित्या, येशूच्यानांवात, मी कबूल करतो की मी माझ्या स्वतःला न्यायी ठरविण्यासाठी नेहमी इतरांना दोष दिला आहे. कृपा करून ह्या अडखळणावर प्रभुत्व मिळविण्यासाठी मला साहाय्य कर. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● हेतुपुरस्सर शोध● दिवस १८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● विश्वास ठेवण्याची तुमची क्षमता कशी वाढवावी
● पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणात्मक इतर दानास मिळविण्याचा मार्ग मिळवा
● बायबल प्रभावीपणे कसे वाचावे
● सर्वशक्तिमान परमेश्वराबरोबर भेट
● अडखळण्याच्या जाळ्यात पडण्यापासून मुक्त राहणे
टिप्पण्या
