डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस ०१
Sunday, 12th of December 2021
56
10
3415
Categories :
उपास व प्रार्थना
उपवास करण्याचा मुख्य हेतू स्वतःला प्रभु समोर नम्र करणे हा आहे.
"उपवास करून मी स्वतःला नम्र केले…" (स्तोत्रसंहिता ३५:१३).
"तिथे… मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली कि देवापुढे नम्र व्हावे" (एज्रा ८:२१).
म्हणूनच, आमचे उपवास आपल्याला पश्चात्ताप करण्यास परवानगी देण्याची आवश्यकता आहे.
पश्चाताप
नवीन करारात, पश्चातापा साठी मुख्य शब्द हा मेटानोईया असा आहे याचा अर्थ 'कोणाचे मन बदलावे.' बायबल आपल्याला हे सुद्धा सांगते की, खरा पश्चाताप हा आचरणात बदल ने परिणाम करेल.
"आता पश्चातापास योग्य अशी फळे दया; आणि अब्राहाम आमचा बाप आहे असे आपल्या मनात म्हणू लागू नका. कारण मी तुम्हांस सांगतो, ह्या दगडांपासून अब्राहामासाठी मुले निर्माण करावयास देव समर्थ आहे; आत्ताच झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तें तोडून अग्नीत टाकले जाते." (लूक 3:8-9)
पश्चातापासखरेभग्नहृदयी असण्याची गरज आहे. पश्चाताप हे पुन्हा पाप करण्याच्या हेतूने देवाकडे क्षमा मागणे नाही.
पश्चाताप हे प्रामाणिक, पापाचा खेदपूर्वक स्वीकार बदलण्याच्या समर्पित भावनेसह आहे. पश्चाताप हे ईश्वरीय जीवन व्यतीत करण्याकडे नेते त्याचबरोबर त्या सवयी खोडून काढते जे पापाकडे नेतात.
तेव्हा तुमची पापें पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा; अशासाठीकी, विश्रांतीचे समय प्रभूजवळून यावे. (प्रेषित 3:19)
सर्वातप्रथम पाऊल तुम्हाला हे उचलावयाचे आहे ते हे स्वीकारावे की तुम्ही चूक केली आहे आणि देवा विरुद्ध पाप केले आहे आणि देवाबरोबर योग्य संबंध बनविण्याची गरज आहे.
पवित्र आत्मा तुम्हाला त्या जागा प्रगट करेल ज्या मध्ये तुम्ही अडखळण्यात संवेदनाक्षम असे आहात, जर तुम्ही त्याच्याकडे मागितले कारण तो 'साहाय्यक'आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आश्वासन असा आहे.
कधीही विसरू नका, पापा विषयी प्रथम तुमचे मनबदलणे आणि येशू कोण आहे आणि त्याने तुमच्यासाठी काय केले आहे हे जाणल्याशिवाय येशू ख्रिस्ता मध्ये तुमचातारणारा असा विश्वास ठेवणे अशक्य आहे.
मननासाठी पवित्र शास्त्र वचन
1 योहान 1:8-10
स्तोत्रसंहिता 51:1-4
प्रेषित 17:30
४० दिवसांची बायबल वाचन योजना
रोम १४-१६;१ करिंथ १-४
प्रार्थना
प्रार्थना अस्त्र
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यन्त ते तुमच्या हृदयातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्राकडे वळा. ते वारंवार म्हणा, व्यक्तिगत असे करा, प्रत्येक प्रार्थना मुद्या कमीत कमी १ मिनीट असे करा.
1. पित्या, मी तुझ्याकडे आमच्या प्रभू आणि तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नांवात येतो आणि मी आता तुला माझाआत्मा, जीव आणि शरीर येशूच्या नांवातसादर करतो.
परमेश्वरा, माझ्याकडे बघ आणि माझे मन जाण माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे. माझ्या मनात काही दुष्ट विचार आहेत का ते बघ आणि मला “सनातन मार्गाचा” रस्ता दाखव. (स्तोत्रसंहिता १३९:२३-२४)
2. मी प्रत्येक पाप, प्रत्येक अपराध, प्रत्येक दोष, प्रत्येक चुका, प्रत्येक अधार्मिकता आणि अभक्तपणाच्या पापाचा येशूच्या नांवात पश्चाताप करतो.
3. मी माझे हृदय, मुख आणि मनाच्या पापाची येशूच्या नांवात कबुली आणि पश्चाताप करतो.
4. येशूच्या रक्ताने मला शुद्ध कर-आत्मा, जीव आणि शरीर येशूच्या नांवात.
5.पित्या येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नांवात माझे प्रियजन, माझे कुटुंब आणि माझे नातेवाईक यांच्या वतीने तुझ्या समोर येतो.
6. मीमाझे प्रियजन, माझे कुटुंब आणि माझे नातेवाईक यांना येशूच्या रक्तामध्ये मुद्रित, बुडवून आणि पूर्णपणे भरून टाकतो.
7. मी माझे पाप आणि माझ्या पूर्वजांच्या पापांची कबुली देतो. आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. आम्ही दुष्टपणे वागलो आहो, आम्ही विद्रोह केला आहे, तुझी वाणी आणि तुझ्या इच्छेचा अस्वीकार केला आहे, आम्हाला क्षमा कर.
8. तू दयाळू परमेश्वर आहे, कृपा व प्रीतीने ओतप्रोत आणि मी तुला विनंती करतो की तू आमच्या पापांची क्षमा कर आणि माझ्या वंशाला सर्व अधार्मिकतेपासून शुद्ध कर. येशूच्या नांवात. आमेन.
9. प्रभूची उपासना करीत काही वेळ घालवा.
Join our WhatsApp Channel
Most Read
● इतरांची सेवा करण्याद्वारे आशीर्वाद जो आम्ही अनुभवितो● आपल्या पाठीमागे पूल हे जळत आहेत
● अन्य भाषे मध्ये बोलणे हे आंतरिक आरोग्य आणते
● विसरलेली आज्ञा
● बुद्धिमान व्हा
● आदर्श होऊन पुढारीपण करा
● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या