"ज्यांच्याअपराधांची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे, तो धन्य!
ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावीत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य! (स्तोत्र ३२:१-२)
एकदा एका मनुष्याने स्वप्न पाहिले त्यात येशूला एका खांबाला बांधलेले आहे व त्यास निर्दयीपणे फटके मारीत आहे. त्या मनुष्याला सहन होत नव्हतेहे पाहून की येशूच्या शरीरावरून फटके मारल्याने मांस निघत आहे आणि तो पळत गेलाकी त्या मनुष्याला थांबवावे जो आपल्या प्रभूला मारीत होता. जेव्हा त्याने त्या मनुष्याचा हात धरला जो फटके मारीत होता, आणि त्याचा चेहरा पाहण्यास वळला, स्वप्न पाहणाऱ्याने स्वतःचा चेहरा पाहिला.
"आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपआपला मार्ग धरिला होता; अशा आम्हां सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले." (यशया ५३:६)
स्वैराचाराच्या समस्येला काय उपाय आहे? सर्व स्वैराचारास येशूहाच उत्तर होय. शब्द लक्षात घ्या, "आम्हां सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले". आपल्या सर्व स्वैराचारास त्याने अंतिम दंड भरला आहे.
केवळकोणतेही बलिदान हे करू शकत नाही. एक सिद्ध बलिदानाची गरज आहे की प्रत्येक व्यक्तीच्या पापासाठी दंड हा भरावा. त्यामुळेच हे आवश्यक होते की येशू हा तो बलिदान व्हावा.
एका सिद्ध व्यक्ति द्वारे ते एक सिद्ध बलिदान होते कीअपूर्ण व्यक्तींना सिद्ध असे करावे. (इब्री १०:१४-२५ एमएसजी)
खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळझाला, आमच्यादुष्कर्मांमुळे ठेचला गेला. (यशया ५३:५)
येशू आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला. एकजखमेला तुमच्या शरीरावर फार सहज पाहू शकतात. दुष्कर्म हे काहीतरी जे आंतरिक सखोल असते. प्रभु येशू आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला.
एक अविश्वसनीय व्यक्तिगत किंमत, द्वारेपित्यानेआपल्या पापाच्या समस्येसाठी उपाय काढला. परंतु त्याचा उपाय स्वीकारणे किंवा नाकारण्यासाठी आपल्याकडे निवड आहे.
देवाच्या उपाय आपल्या जीवनासाठी लागू करण्यात येशूच्या बलिदानास आपले वैयक्तिक प्रत्युत्तर महत्वाचे आहे.
जर तुम्ही देवाचा उपाय तुमच्या जीवनासाठीस्वीकारता व लागू करता, तेव्हा मग पुढील वचन तुमच्या जीवनात प्रगट होईल.
म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ति आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे. (२ करिंथ ५:१७)
प्रार्थना
प्रभु येशू, मी विश्वास ठेवतो, की तूं देवाचा पुत्र आहे. तूं माझ्यासाठी मरण पावला व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला.
मजवर दया कर. माझ्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्या रक्तामध्ये मला धु. माझ्या अंत:करणात ये व माझ्या जीवनाच्या प्रत्येक भागावर नियंत्रण कर.
येशू ख्रिस्ताच्या रक्ता द्वारे, मी व माझे कुटुंबीय सैतानाच्या हातातून सोडविले गेलो आहोत
प्रत्येक दुष्ट पद्धती ज्या माझ्या वमाझ्या कुटुंबियांच्या जीवनात कार्यरत आहेत, येशूच्या नांवात मोडल्या जावो.
प्रत्येक दुष्ट शक्ति ज्या माझ्या प्रगती मध्ये अडथळा करीत आहे त्या अग्निद्वारे भस्म होवोत, येशूच्या नांवात.
देवाच्या अग्नि, येशूच्या नांवात प्रत्येक दुष्ट शक्ति जी माझ्या विरोधात आहे त्यास विखरून टाक.
Join our WhatsApp Channel
Most Read
● विचार करण्यास वेळ घ्या● अविश्वास
● तो शब्द पाळ
● दानधर्म करण्याची कृपा - ३
● आदर आणि मूल्य
● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
● पतनापासून ते मुक्तीपर्यंतचा प्रवास
टिप्पण्या