english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. पैसे कशा साठी नाही
डेली मन्ना

पैसे कशा साठी नाही

Wednesday, 3rd of April 2024
30 22 1016
Categories : पैसा
जग शिकवते त्यापेक्षा आपले जीवन वेगळ्या पद्धतीने जगावे असे बायबल आपल्याला शिकवते, आणि हे विशेषकरून खरे आहे जेव्हा पैशाचा प्रश्न येतो. ख्रिस्ती म्हणून, ख्रिस्ताची आज्ञा पाळण्यात जीवनाची एक सर्वात मोठी परीक्षा ही आपण आपले पैसे कसे खर्च करतो. आपण पैसे कसे कमावतो आणि ते खर्च करतो याबद्दल पाहणारा देव केवळ एकटा नाही, तर आपली मुलेबाळे पैसे खर्च करण्याची आपली सवय पाहत आहेत. आपण पैसे कसे खर्च करतो हे खरेच आपल्यासाठी काय महत्वाचे आहे हे प्रकट करते. 

जसे पवित्र शास्त्र म्हणते, “कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल.” (मत्तय ६:२१)

पैशाबद्दल आपली वृत्ती ही आपल्या हृदयात स्थापित होते, आणि आपण आपल्या पैशाला कसे हाताळतो हा आपल्या मनाचा विषय आहे. पुष्कळ लोकांसाठी आव्हान असे आहे की हृदय हे मस्तकाशी जुळलेले आहे आणि पैशाबद्दल बायबल काय शिकवते त्या मार्गाने मस्तक नेहमीच विचार करत नाही. यशया संदेष्ट्याने या विषयावर आपले मत मांडले जेव्हा त्याने विचारले, “जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो.” (यशया ५५:२)

पैसे शहाणपणाने खर्च करणे हे आव्हानात्मक आहे, पण लाभ हे अनमोल आहेत. पैसे अवश्य बोलते, जसे उपदेशक १०:१९ मध्ये लिहिले आहे, “ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करतात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो; पैशाने सर्वकाही साध्य होते.” पैसा आपल्याशी बोलतो, आणि आपल्याविषयी गोष्टींना देखील सांगतो, आणि तो काय बोलतो ते महत्वाचे आहे. पैशाचा विषय. जेव्हा कोणीतरी म्हटले होते, “ आपण आतून खरेच कोण आहोत त्यास पैसे वाढवतात.” म्हणूनच पुष्कळशा चांगल्या कारणांसाठी ख्रिस्ती लोकांसाठी पैशाचा विषय महत्वाचा आहे. आपण पैसे कसे हाताळतो किंवा पैशाला आपल्याला हाताळू देतो यामध्ये आपली आध्यात्मिक वाढ होण्यासाठी किंवा आपली वाढ  गंभीरपणे खुंटवण्याची शक्ती आहे.

साधनसंपत्तीच्या स्त्रोताबद्दल चांगले कारभारी होण्याची योग्यता विकसित करणे ख्रिस्ती लोकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. पैसे आपल्याला काय बोलत आहे हे देवा प्रती आपल्या हृदयाच्या वृत्तीवरून ठरवले  जाईल. पैशाबरोबर आपले संबंध हे देवाबरोबरच्या आपल्या संबंधाशी खरेच संबंधित आहे. प्रेषित पौल लिहितो, “माझा देव आपल्या संपत्त्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील” (फिलिप्पै. ४:१९). जेव्हा आपण देवाच्या तरतुदीवर विश्वास ठेवतो, आणि आपल्या पैशाने त्याचा आदर करण्यास पाहतो, तेव्हा आपण विपुलता आणि समाधानाचा अनुभव करू शकतो जे आज्ञाधारकपणात चालण्याने येते.

पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनानुसार पैशाचे व्यवस्थापन करण्याची सर्वात चांगली एक मुख्य कल्पना ही दशांस देणे आहे. मलाखी ३:१० मध्ये, लोकांनी त्यांच्या पैशाने देवावर विश्वास ठेवावा म्हणून असे बोलत आव्हान करते, “माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाश-कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही ह्याविषयी माझी प्रचिती पाहा.” जेव्हा आपण देवाला प्रथम देतो, आणि आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यावर भरवसा करतो, तेव्हा आपण आपला विश्वास आणि आज्ञाधारकपणाचे प्रदर्शन करतो, आणि आपल्या स्वतःला त्याच्या आशीर्वादांसाठी तयार करतो.

आणखी महत्वाचे तत्व हे कर्ज टाळणे आहे. नीतिसूत्रे २२:७ इशारा देते, “धनिक मनुष्य निर्धनांवर सत्ता चालवतो, ऋणको धनकोचा दास होतो.” जेव्हा आपण कर्जाचे गुलाम होतो तेव्हा उदार होण्याच्या आपल्या क्षमतेला आपण मर्यादित करतो आणि आपल्या जीवनात देवाच्या मार्गदर्शनाला प्रतिसाद देतो. त्याऐवजी, आपण आपल्या साधनसंपत्तीत आणि आपल्याजवळ जे आहे त्यात समाधानी राहण्याचा  प्रयत्न केला पाहिजे, जसे पौल फिलिप्पै. ४:११-१२ मध्ये लिहितो, “मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वालंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे.”

शेवटी, पैशाचा आपला वापर हा आपल्या हृदयाचे आणि आपल्या प्राथमिकतेचे प्रतिबिंब आहे. प्रभू येशूने एका श्रीमंत मनुष्याचा दाखला सांगितला ज्याने त्याच्यासाठी संपत्ती जमा करून ठेवली होती परंतु तो देवा प्रती श्रीमंत नव्हता (लूक १२: १६-२१). तो आपल्याला ताकीद देतो, “सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही” (लूक १२:१५). त्याऐवजी, आपण देवाचे राज्य आणि त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रथम धावा केला पाहिजे, हा भरवसा ठेवून की आपल्या सर्व गरजांची पूर्तता केली जाईल. (मत्तय ६:३३)

ख्रिस्ती म्हणून, देवाचा आदर आणि इतरांना आशीर्वादित करण्यासाठी आपल्या पैशाचा वापर करण्याची आपल्याकडे संधी आहे. त्याने आपल्यावर सोपवलेल्या साधनसंपत्तीचे चांगले कारभारी होण्याद्वारे, आपण आनंद आणि स्वातंत्र्याचा अनुभव करू शकतो जे त्याच्या इच्छेनुसार चालण्याने येते. असे होवो की आपण नेहमीच हे लक्षात ठेवावे की पैशाबरोबर आपले नातेसंबंध हे शेवटी देवाबरोबरच्या आपल्या नातेसंबंधाचे प्रतिबिंब आहे आणि त्याच्या नावाला महिमा आणण्याच्या मार्गाने आपल्या संपत्तीचा आपण वापर करण्याचा विचार करावा.
प्रार्थना
पित्या, मला कृपा पुरीव की सर्व स्त्रोत चे योग्य व्यवस्थापन करणारा व्हावे जे तूं मला सोपविले आहे विशेषतः पैसा. येशूच्या नांवात. आमेन

Join our WhatsApp Channel


Most Read
● केव्हा शांत राहावे आणि केव्हा बोलावे?
● दिवस ०४: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● भविष्यात्मक मध्यस्थी
● पुढच्या स्तरावर जाणे
● उपास कसा करावा?
● लहान गोष्टी मोठ्या उद्देशांना जन्म देतात
● बुद्धिमान व्हा
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन