जसे मी काल उल्लेख केला आहे, स्वैराचार सैतानाला कायदेशीर अधिकार देतो की उत्तरार्धातील पिढ्यांना त्यांचे पूर्वज ज्या पापालाबळी पडले होते त्याच परीक्षेत पाडावे.
मी त्याच्या दृष्टीने सात्विकतेने वागत असे आणि मी अनीतीपासून स्वतःला अलिप्त राखिले. (स्तोत्र १८:२३)
दावीदास आत्मविश्वास होता की परमेश्वर त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईल कारण त्याच्या विरोधात कार्य करणाऱ्या शक्तीला तो शरण गेला नव्हता. तुम्ही पाहा, स्वैराचार हे त्याकडे "झुकणे" आहे जे एखादया विशेष अशक्तपणाकडे नेते.
सैतानाच्या परीक्षेचा दावीदावरत्याच्याकौटुंबिकवंशावळीच्या स्वैराचाराचा परिणाम म्हणून एक दबाव होता. ह्या क्षणामध्ये परमेश्वराबरोबरील त्याच्या घनिष्ठ संबंधाच्या गुणामुळे दावीदानेह्या शक्तीला तोंड दिले.
आता येथे एक गोष्ट आहे जे मला पाहिजे की तुम्ही समजावे. जेव्हा स्वैराचाराची शक्ती कोणा एका व्यक्तीवरून मोडून काढण्यात येते, याचा अर्थ तो किंवा ती हे पुन्हा कधी परीक्षेत पडणार नाहीत असे नाही. याचा सरळपणे अर्थ हा आहेकी आपल्याला सामर्थ्य असेल की परीक्षेला नाही म्हणावे.
तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहा, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालविणार नाही. (रोम ६:१४)
जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला प्रभु व तारणारा असे स्वीकारता, तुम्ही कृपेच्या अधीन आहात. कृपा आता तुम्हाला समर्थ करते की कोणा एका विशेष पापाला "नाही" म्हणावे. आता तुम्ही पापाच्या वर्चस्वाच्या अधीन नाही तर कृपेच्या नियमात आहात.
तुम्ही पाहा, येशू मध्ये काहीही पाप नव्हते, त्याच्यावंशावळीमध्येकोणताही स्वैराचार कार्यरत नव्हता आणि तरीही सर्व घटकांमध्ये त्याची परीक्षा झाली परंतु तो पापविरहित राहिला (इब्री ४:१५ वाचा). पापाच्या स्वभावाचे चिन्ह ही परीक्षा नाही जी आपल्याविरोधात कार्य करीत आहे परंतु परीक्षेला नाही म्हणण्याची असमर्थता.
दुसरी गोष्ट जे स्वैराचार करते ते आपल्या ओळखीला; आपल्या आंतरिक विचारास, मी माझ्या स्वतःविषयी कसा विचार करतो यासवळण देते. एक योग्य ओळख परमेश्वर आपल्याविषयी काय म्हणतो त्यावर विश्वास ठेवेल. समस्या ही आहे कीस्वैराचार हा आपल्या विषयी आपल्या विश्वासाच्या पद्धतीला वळण देतो.
उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले; त्याच्या झग्याच्या सोंग्यांनी मंदिर व्यापून गेले होते.
त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहासहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे.
ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत,
पवित्र ! पवित्र! पवित्र! सेनाधीश परमेश्वर !
अखिल पृथ्वीची समृद्धि त्याचे वैभव होय.
घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले.
तेव्हा मी म्हणालो, हाय हाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले.
मग एक सराफदूतवेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन मजकडे उडत आला; तो माझ्या ओठांस लावून त्याने म्हटले, पाहा, याचा स्पर्श तुझ्या ओठांस झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे.
तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल? तेव्हा मी म्हणालो, मी आहे, मला पाठिव. (यशया६:१-८)
यशयाने स्वतःला पापी व अपात्र असे पाहिले. जेव्हा स्वर्गातून अग्निद्वारे यशया त्याच्या स्वैराचारापासून शुद्ध झाला तेव्हा दोन गोष्टी घडल्या.
१. तो प्रभूला ऐकण्यास समर्थ झाला आणि
२. आणि प्रभूच्या हाकेला आवेशीपणाने उत्तर देऊ शकला (मी आहे, मला पाठिव.)
स्वैराचार व त्याचा परिणाम आध्यात्मिकदृष्टीने काय घडत आहे ते पाहण्यापासून आपल्याला अडथळा करते. तो आता स्वतःला अयोग्य पात्र असे पाहत नाही. त्याला आता ओळख विषयी नवीन अर्थआहे. परमेश्वर आपल्याला जसे पाहतो त्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःला पाहतो.
अंगीकार
सर्व अभक्तिमान आचरण, बोललेले शब्द, विचार व नकारात्मक भावना ज्याचा माझ्या कुटुंबाच्या वंशावळीवर, माझ्या विवाहावर, व इतर संबंधावर वाईट परिणाम होता त्याची मी कबुली देतो व क्षमा मागतो, येशूच्या नांवात.
सर्व अभक्तिमान शब्द जे बोलले किंवा कोणाला उद्देशून बोलले त्याचा मी पश्चाताप करतो. प्रत्येकव्यक्ति ज्याने मला दु:खविले आहे त्यास मी सोडून देतो, आणि बदला घेण्याच्या माझ्या हक्काला सोडून देतो, कारण देवाचे वचन सांगते परमेश्वर हा बदला घेणारा आहे.
पित्या, माझ्या व माझ्या कुटुंबाच्या विरोधात कार्य करणारे हेवा, लोभ आत्मनिर्भरतेच्या सर्व वाईट शक्तीला उपटून काढून टाक. मला ते हृदय दे जे देवाच्या कार्याला आर्थिकदृष्टया नेहमी साहाय्य करते.
माझ्या वंशावळी मध्ये प्रत्येक प्रकारचा अस्वीकार व भीति कार्यरत राहण्याची मी कबुली देतो, विशेषतः जे आज मला, माझे वैवाहिक जीवन व माझ्या कुटुंबावर परिणाम करीत आहे. परमेश्वरा, त्यास उपटून काढून टाक, येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे मार्गदर्शन कोण करीत आहे?● दोष लावलेल्या गोष्टी काढून टाक
● वचनामध्ये ज्ञान
● सुवार्ता घेऊन जाणारे
● दुसऱ्यावर दोष लावणे
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● अन्य भाषे मध्ये बोलणे हे आंतरिक आरोग्य आणते
टिप्पण्या