देवाच्या सामर्थ्याच्या करणीने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते तेणेकरून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. (इफिस ३:७)
मेरियम वेब्स्टर डिक्शनरी नुसार, एक दान हे: भरपाई विना काहीतरी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला स्वेच्छेने दिले जाते. हे ह्या वास्तविकतेकडे इशारा देते की दान देण्याची निश्चित इच्छा ही प्राप्त करणारा नाही तर देणारा आहे. दान देणारा हा निर्णय घेतो की दान हे केव्हा दयायचे, ते कसे दयायचे, आणि ते कोणाला देण्यात येईल. मनोरंजकपणे, दान (चमत्कारिक गोष्ट) साठी नवीन कराराचा शब्द हा नेहमी कृपा असा भाषांतरित केला आहे. पवित्र शास्त्राचे लिहिणारे सुद्धा हे समजतात की कृपा हे दान आहे:पात्रता नसतानाही कृपा. आपण ते प्राप्त करीत नाही कारण आपल्या स्वतःहून आपण त्यास पात्र आहोत किंवा कारण की येथे काहीतरी आहे जे आपण केले आहे की त्यासाठी पात्र ठरावे.
देवाची कृपा ही आपल्याला आपली कृत्ये किंवा पात्रतेच्या कारणामुळे दिली जात नाही. म्हणून, येथे काहीही नाही जे आपण करू शकतो जे देवाला आपल्या प्रती त्याची कृपा दाखविण्यास आडवेल किंवा थांबवेल. तो कृपा देणारा आहे, आणि त्याने निर्णय घेतला आहे की चालना देण्यासाठी कृपेचे कार्य ठेवले आहे जे मनुष्याच्या कृती व निष्क्रियतेपासून वेगळे आहे. जर दान हे आपण काय करतो यावरच केवळ आधारित असेन, तेव्हा मग त्याचे महत्त्व हे चुकीचे होते.
तर मग त्याच्या कृपेचे स्त्रोत हे कोठे आहे? त्याची कृपा ही कोठून येते? प्रेषित पौल वर उल्लेख केलेल्या वचनात आपल्याला याचे रहस्य सांगत आहे देवाच्या सामर्थ्याच्या करणीने........ हे देवाचे सामर्थ्य आहे, आपली चांगली कृत्ये किंवा आपला प्रभावीपणा नाही जे आपल्यावर दानाचा वर्षाव करते. आणि आपल्याला त्याच्या वचनाद्वारे हे ठाऊक आहे की तो अमर्यादित सामर्थ्य व असीमित शक्यतेचा परमेश्वर आहे. म्हणून, जेव्हा आपण कोरा चेक जो परमेश्वराने आपल्याला दिला आहे त्यावर प्रभावीपणे कार्य करू की आध्यात्मिक पटलावर कार्य करावे जे मानवी समज व मनाच्या विचारांच्या पलीकडचे असते. जे सर्व काही आपल्यालाकरावयाचे आहे ते हे कि त्याच्या वचनावर विश्वास ठेवावा व त्याच्या कृपे मध्ये पूर्णपणे भरंवसा ठेवावा. कृपा ही व्यक्तिगत योग्यतेचे कार्य नाही परंतु अद्भुत योग्यतेचा पुरवठा आहे!
परमेश्वराने, त्याच्या अमर्यादित ज्ञानात एका कार्यक्रमाची रचना केली आहे ज्याद्वारे सर्व मनुष्यांनी स्वर्गीय आशीर्वादाचा आनंद घ्यावा. एक द्वार हे आपल्यासाठी सताड उघडे केले गेले आहे की येथे पृथ्वीवर देवा सारखे जगावे, परंतु ह्या महान संधी साठी मार्ग मिळविण्याचा पासवर्ड हा कृपा आहे! याची पूर्तता इतर काहीही करू शकत नाही. तुम्ही तुमच्या ख्रिस्ती जीवनप्रवासात पुढे चालण्यास थकला आहात काय. जीवनाच्या आवाहनांच्या मध्य तुम्ही विजयी जीवन जगण्याचा शोध घेत आहात काय? तुम्ही नेहमीच अशी अपेक्षा केली आहे काय की पवित्र शास्त्रात जे काही तुम्ही वाचता ते तुमच्या जीवनात तसेच पूर्ण व्हावे? तर मग तुम्हाला इतर कशाचीही गरज नाही, पण केवळ देवाची कृपा: वर्चस्व व यशा साठी त्याचे अद्भुत साधन. वास्तविकतेचा विचार म्हणून, तुम्हाला कृपे ची गरज आहे की देवा वर भरंवसा ठेवावा, त्याची वाट पाहत राहावे, आणि योग्यपणे त्याचा शोध घ्यावा. देवाच्या निरंतर, विपुल कृपे च्या खातरी मध्ये आज पुढे पाऊल टाका.
प्रार्थना
पित्या, सर्व गोष्टींसाठी तुझ्या कृपेवर अवलंबून राहण्यास मला साहाय्य कर. तुझ्या कृपे वर माझे जीवन हे संलग्न कार्यरत राहावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● धन्यवादाचे सामर्थ्य● तुमच्या नियतीचा विनाश करू नका!
● उदारपणाचा सापळा
● ते व्यवस्थित करा
● धोक्याची सुचना
● इतरांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकावा
● परमेश्वराची महती वर्णा व तुमच्या विश्वासाला प्रेरणा दया
टिप्पण्या