डेली मन्ना
31
23
635
तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
Thursday, 29th of August 2024
Categories :
ताण
शारीरिक समस्या, मानसिक समस्या, स्वास्थ्य समस्या, विखरलेले नातेसंबध आणि रोजचा संघर्ष ज्यास आधुनिक समाज जीवन म्हणतात. तणाव हा आजच्या आधुनिक समाजात प्राणघातक असासर्वातप्रथम आहे-परंतु असे नाही की त्यावर उपाय करता येत नाही. वास्तविकते मध्ये, देवानेआपल्यालात्याच्या जीवन-देणाऱ्या वचनात स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे की त्यावर कसे मात करावे.
"काय तुम्ही थकला आहात? शिणला आहात? हताश झाला आहात?"माझ्याकडे या. माझ्याबरोबर चाला आणि तुम्ही पुन्हा संजीवित व्हाल. मी तुम्हाला दाखवेल की खरी विश्रांती कशी घ्यावी. माझ्याबरोबर चाला आणि माझ्याबरोबर कार्य करा-पाहा मी ते कसे करतो. कृपेचे दबावरहित लय शिका. मी काहीही जड किंवा तुमच्यावर अयोग्य असे ठेवणार नाही.
माझ्यासोबत राहा आणि तुम्ही मुक्तपणे आणि तणावरहित जगण्यास शिकाल. (मत्तय ११: २८-३०)
त्याच्या उपस्थिती मध्ये या
जर तुम्हाला नियमितपणे थकलेले आणि हताश असे वाटत असेन, तर कदाचित ही निकडीची वेळ असेन की तुम्ही वेळ काढावा आणि त्याच्या उपस्थिती मध्ये वेळ घालवावा.
परमेश्वराने त्याची विश्रांती आणि समाधान देण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे ते जे असे करतात. काही सौम्य उपासना संगीत वाजवा, फोन बंद ठेवा आणि केवळ त्याची शांति आणि ताजेतवाने करणाऱ्या त्याच्या उपस्थितीचा आनंद घ्या. सावकाशकाही वचने वाचा आणि त्यास तुमच्याशी बोलू दया. हे आत्मा आणि शरीरासाठी अद्भुत कार्य करेल.
केंद्रित राहा
ते करण्याचा प्रयत्न करू नका जे तुमच्या भोवतालचे लोक करीत आहेत. दुसऱ्या शब्दात, तुम्ही सर्व बाबतीत भाग घेऊ शकत नाही, तुम्ही तुमचा सहभाग सर्व बाबतीत देऊ शकत नाही. तुम्हाला तुमची वेळी आणि शक्ती केवळ त्यागोष्टींवरच केंद्रित केली पाहिजे ज्या बाबतीत तुम्ही कुशल असे आहात.
लक्षात ठेवा, केवळ कार्य करणे हे फलदायक असे नाही.
म्हणजे तुम्हाला काही निश्चित निष्फळ गोष्टींपासून वेगळे केले पाहिजे. ते सुरुवातीला पीडादायक होऊ शकते परंतु शेवटी ते तुमचे जीवन वाचवू शकते. एक मार्ग हा की देवाबरोबर वेळ घालवा आणि त्यास मागा की तुम्हाला ज्ञान दयावे की तुमचे दैनंदिन जीवन व्यवस्थित करावे.
विश्राम
हे माझ्या जिवा, तूं आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत. (स्तोत्रसंहिता ११६: ७)
विश्राम घेणे ही केवळ चांगली कल्पना नाही परंतु देवाची कल्पना आहे-हा देवाचा आदेश आहे.
"सहा दिवस तूं आपला उदयोग कर व सातव्या दिवशी विश्रांति घे, म्हणजे तुझे बैल आणि गाढव ह्यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासींची संतति आणि उपरी ह्यांचा जीव ताजातवाना होईल." (निर्गम २३: १२)
परमेश्वराने त्यात जोडले, सहा दिवस तूं आपले कामकाज कर व सातव्या दिवशी विसावाघे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामांतही विसावा घे.(निर्गम३४:२१)
रात्रीची चांगली झोप सुद्धा तुमच्या जीवनाच्या तणाव साठी अद्भुत कार्य करेल. तुमच्या आठवडयाची सुरुवात आवश्यक विश्रांती घेऊन करा आणि मग तुमचा चांगला संपन्न आठवडा होईल-शारीरिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्टया.
प्रार्थना
१. पित्या, कृपा करून मला क्षमा कर की मी सर्व काही माझ्या स्वतःच्या सामर्थ्याने करण्याचा प्रयत्न करीत होतो. कृपा करून तुझ्या आत्म्याने मला सामर्थ्यशाली कर.
२. पित्या, येशूच्या नांवात, ह्या क्षणापासून तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. तुझ्या गौरवाकरिता माझे जीवन व्यवस्थित कर. आमेन.
२. पित्या, येशूच्या नांवात, ह्या क्षणापासून तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. तुझ्या गौरवाकरिता माझे जीवन व्यवस्थित कर. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात● अनुकरण करा
● रहस्य स्वीकारणे
● ओरडण्यापेक्षा दयेसाठी रडणे
● पारख उलट न्याय
● ख्रिस्ती लोक डॉक्टर कडे जाऊ शकतात काय?
● स्वप्ना मध्ये देवदूताचे प्रगट होणे
टिप्पण्या