बायबल चर्चमधील ऐक्यतेवर अत्यंत जोर देते. इफिस. ४:३ मध्ये, प्रेषित पौल ख्रिस्ती लोकांना उपदेश देतो की “आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा.” या ऐक्याला सर्वात मोठा धोका म्हणजे निंदा करण्याचे पाप आहे. जेव्हा चर्चमधील लोक एकमेकांविरुद्ध दुर्भावनापूर्ण निंदा आणि खोटे आरोप करत राहतात, तेव्हा ते नातेसंबंधाला विषारी करते आणि शरीराचे विभाजन करते. ख्रिस्ती म्हणून, या विनाशकारक पापाविरुद्ध आपण जागरूक राहिले पाहिजे.
निंदेची विनाशकता
निंदा ही खोटे विधान करणे आहे जे व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे नुकसान करते. नीतिसूत्रे १०:१८ म्हणते, “गुप्तपणे द्वेष करणाऱ्याची वाणी असत्य असते, आणि चहाडी करणारा मूर्ख असतो. निंदा द्वेषपूर्ण हृदयातून येते आणि मोठे नुकसान करते. याकोब ३:५-६ जिभेची तुलना लहानशा ठिणगीशी करते जी लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते.” निंदा मित्र, कुटुंब आणि चर्चचे विभाजन करते.
आपण एका निर्दयी समाजात राहत आहोत जेथे लोक पुढे जाण्यासाठी लोकांचे पतन घडवून आणतात. परंतु चर्चमध्ये आपल्याला उच्च दर्जासाठी पाचारण झालेले आहे –एकमेकांचे सात्वन करावे व एकमेकांची उन्नती करावी” (१ थेस्सल. ५:११). जेव्हा आपण निंदाजनक बोलण्यात व्यस्त राहतो किंवा ऐकतो, तेव्हा आपण सैतानाच्या योजनेबरोबर सहभागी होतो की हिरावून घ्यावे, मारून टाकावे आणि नष्ट करावे (योहान १०:१०). निंदा पवित्र आत्म्याला दु:ख देते, जो आपल्यात प्रीती, आनंद आणि शांतीचे फळ निर्माण करतो. (इफिस. ४:३०-३१)
देवाचा नीतिमान न्याय
बायबल त्यांच्या विरोधात देवाच्या त्वरित न्यायाविषयी नोंद करते ज्यांनी आध्यात्मिक नेत्यांविरुद्ध निंदा केली आहे. गणना १२मध्ये, मिर्याम व अहरोनाने मोशेची टीका केली, आणि देवाने मिर्यामला कोडी बनवून शिक्षा दिली. गणना १६मध्ये, कोरहने मोशेविरुद्ध निंदाजनक आरोपावर आधारित बंडखोरी केली. देवाने कोरह आणि त्याचे अनुसरण करणाऱ्यांना गिळण्यासाठी पृथ्वीला आज्ञा दिली.
प्रभू येशूने चेतावणी दिली आहे की आपण बोललेल्या प्रत्येक निष्काळजी शब्दाचा हिशेब द्यावा लागेल (मत्तय १२:३६-३७). ज्यांनी इतरांचे त्यांच्या बोलण्याने नुकसान केले आहे त्यांनी पश्चाताप केल्याशिवाय देवाच्या नीतिमान न्यायापासून वाचणार नाहीत. स्तोत्र. १०१:५ म्हणते, “आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचा मी विध्वंस करीन.”
आपल्या अंत:करणाचे आणि मुखाचे रक्षण करणे
कारण निंदा हृदयात सुरु होते, म्हणून आपण तेथेच तिला जपले पाहिजे. नीतिसूत्रे ४:२३ आपल्याला उपदेश देते, “सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.” आपण कटुत्व, क्रोध, राग, आणि द्वेष काढून टाकला पाहिजे, जे निंदा उत्पन्न करते (इफिस. ४:३१). त्याऐवजी, आपण करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करावी.” (कलस्सै. ३:१२)
नीतिसूत्रे २१:२३ म्हणते, “जो आपले तोंड व जिव्हा सांभाळतो, तो संकटांपासून आपला जीव बचावतो.” जेव्हा कोणाचीतरी टीका करावी असा मोह आपल्याला होतो, तेव्हा आपण विचारावे : हे खरे आहे का? हे आवश्यक आहे का? हे लाभकारक आहे का? बऱ्याचवेळा, शांत राहणे हे उत्तम आहे. जेव्हा आपण बोलतो, तेव्हा इतरांची उन्नती करण्यासाठी असावे, त्यांचे पतन करण्यासाठी नाही. इफिस. ४:२९ म्हणते, “तुमच्या मुखातून कसलेच कुजके भाषण न निघो, पण गरजेप्रमाणे उन्नतीकरता जे चांगले तेच मात्र निघो, ह्यासाठी की, तेणेकरून ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे.”
जर इतर कोणीतरी निंदा करत आहे असे आपण ऐकतो, तर आपण त्यांना सौम्यपणे सुधारावे (गलती. ६:१). नीतिसूत्रे २५:२३ म्हणते, “उत्तरेचा वारा पाऊस आणतो, त्याप्रमाणे चुगलखोर जीभ मुद्रा क्रोधाविष्ट करते.” ज्याप्रमाणे कठोर शब्द राग उत्पन्न करते, त्याप्रमाणेच सौम्यपणे सुधारणा निंदेला त्याचवेळी थांबवू शकते.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, निंदेच्या विषापासून आमच्या जिभेचे रक्षण कर. आमची अंत:करणे तुझे प्रेम आणि ज्ञानाने भरून काढ म्हणजे आम्ही ते शब्द बोलावे जे आरोग्य आणि ऐक्य घडवून आणते. तुझ्या गौरवासाठी तुझ्या मंडळीला शांतीच्या बंधनात निर्माण करण्यासाठी आम्हांला मदत कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याची इच्छा पूर्ण करण्याचे महत्त्व● ते व्यवस्थित करा
● तुमच्या आत्म्याची पुनर्स्थापना
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● दिवस ११:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
टिप्पण्या