english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दिवस १४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
डेली मन्ना

दिवस १४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना

Sunday, 24th of December 2023
30 22 1295
Categories : उपास व प्रार्थना
माझ्यावर कृपा करण्यात येईल

“आणि ह्या लोकांवर मिसरी लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन; म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही.” (निर्गम ३:२१)

कृपा हे दयेचे कृत्य आहे जे देवाकडून मनुष्यावर किंवा मनुष्याकडून मनुष्यावर केले जाते. आपल्या सर्वांना इतरांकडून चांगल्या गोष्टी आणि दया हवी असते. मनुष्ये ही  आशिर्वादाची माध्यमे आहेत, तर देव हा आशीर्वादाचा स्त्रोत आणि कृपा करणारा आहे. जेव्हा देव मनुष्यावर कृपा करतो तेव्हा लोक त्याच्यावर कृपा करण्यास सुरुवात करतील. आजच्या दिवसासाठी पवित्र शास्त्रातील आपल्या वचनावरून, वचन प्रकट करते की हा देवच आहे जो लोकांवर कृपा करतो: “मी ह्या लोकांवर कृपा होईल असे करीन ...”. आज माझी इच्छा आहे की तुम्ही देवाच्या कृपेसाठी आक्रोश करावा. देव तुमच्यावर कृपा करण्यासाठी कोणाचाही उपयोग करू शकतो; हे मित्र किंवा त्या लोकांपुरते मर्यादित नाही जे तुम्हांला ओळखतात. देव एखाद्या अनोळखी व्यक्तीला किंवा शत्रूचाही तुमच्यावर कृपा करण्यासाठी उपयोग करू शकतो. मी तुमच्या जीवनावर आदेश देतो की येशूच्या नावाने तुमच्यावर कृपा करण्यात येईल.

पुष्कळ लोक जीवनात रिकामी आहेत; त्याना एकतर शारीरिकदृष्ट्या किंवा आध्यात्मिकदृष्ट्या लुटले किंवा फसविले गेले आहे. इस्राएली लोक मिसर मधून रिकाम्या हाताने गेले असते परंतु देवाच्या कृपेमुळे, ते संपत्ती, गौरव आणि मालमत्तेसह गेले. तुमच्या सर्व वाया गेलेल्या वर्षांसाठी देवाची कृपा दैवीपणे तुमची भरपाई करू शकते.

देवाची कृपा मनुष्याच्या जीवनात काय करू शकते? 

१. देवाची कृपा तुमच्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेते. 
हे एक जागरुकता निर्माण करते आणि लोकांना तुमच्याबद्दल सकारात्मक छाप पाडण्यास प्रवृत्त करते.

“तेव्हा ती त्याला दंडवत घालून म्हणाली, ‘माझ्यासारख्या परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतलात ह्याचे काय कारण बरे?” (रुथ २:१०)

२. देवाची कृपा पदोन्नतीची शाश्वती देते
“कारण त्याच्या बलाचे वैभव तू आहेस; तुझ्या प्रसादाने आमचा उत्कर्ष होत राहील.” (स्तोत्र. ८९:१७)

३. कृपा तुम्हांला देवाची मदत सुरक्षित करते 
जेव्हाजेव्हा आपल्याला मदतीची आवश्यकता असते, तेव्हा आपण देवाच्या कृपेसाठी आक्रोश करू शकतो. दैवी कृपेमध्ये वाढ अधिक मदतीकडे नेईल.

“हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर; माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे.” (स्तोत्र. १०६:४)

४. वैवाहिक स्थिरतेसाठी देवाच्या कृपेची आवश्यकता असते
हे केवळ देवाच्या कृपे द्वारेच, तुम्हांला योग्य जोडीदार मिळेल, सुंदरता, संपत्ती किंवा शारीरिक देखावा नाही.

“ ज्याला गृहिणी लाभते त्याला उत्तम लाभ घडतो, त्याला परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.” (नीतिसूत्रे १८:२२)

५. देवाच्या कृपे द्वारे, तुम्ही देवाकडून काहीही विनंती करू शकता
हे कृपे द्वारेच देव आपल्या विनंत्या प्रार्थनेने मान्य करतो. जर कृपेचा अभाव असला, तर प्रार्थनांना उत्तर मिळणार नाही. प्रार्थनेच्या ठिकाणी कृपा ही फार महत्वाची आहे.

“परमेश्वर त्याला म्हणाला, ‘खरोखर मी तुझ्याबरोबर असेन; जसे एका माणसाला मारावे तसे एकजात साऱ्या मिद्यानाला तू मारशील.” (शास्ते ६:१७)

६. देवाची ही कृपाच आहे जी आपल्याला त्याच्या दयेचा आनंद घेऊ देते
जेव्हा तुम्ही हे समजून जाता की कृपा, दया, पसंती आणि देवाची प्रीती कशी कार्य करते, तेव्हा तुम्ही देवाच्या उत्तमतेचा आनंद घ्याल.

 कृपेवाचून, दया उपलब्ध नसेल, आणि दयेची अनुपस्थिती न्यायाकडे नेईल. जेव्हा तेथे दया आहे, ती न्यायावर विजय मिळवते.

“प्रदेशचे लोक तुझे कोट बांधत आहेत, त्यांचे राजे तुझी सेवा करत आहेत; कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडन केले तरी आता मी प्रसन्न होऊन तुझ्यावर दया केली आहे.” (यशया ६०:१०)

“कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते.” (याकोब २:१३)

जे कृपेचा आनंद घेतात त्यांची पवित्र शास्त्रातील उदाहरणे 

अ]. प्रभू येशू 
लूक. २:५२ नुसार, आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो की कृपा ही वाढू शकते तसेच ज्ञानही. जर येशूला पृथ्वीवर त्याचे नियुक्त काम करण्यासाठी कृपेची आवश्यकता लागते, तर तुम्ही कोण आहात ज्यांना त्याची आवश्यकता लागणार नाही? कृपा ही जीवनासाठी महत्वाची आहे; मनुष्यासाठी ती जीवन सोपे करते. 

ब]. मरीया, येशूची आई 
हे देवाच्या कृपेनेच, मरीयेची निवड झाली. तेथे शहरात पुष्कळ कुमारी होत्या, पण देवाच्या कृपेने तिला निवडले. त्या इतर कुमारिकांवर देखील कृपा दाखवली गेली, परंतु पवित्र शास्त्र सांगते, मरीयेवर “अत्यंत कृपा” झाली. कृपा ही स्तरांमध्ये आहे; आणि म्हणून येथे त्याला “अत्यंत कृपा” म्हणतात, तुम्ही येशूच्या नावात अत्यंत कृपेचा आनंद घेण्यास सुरुवात कराल. (लूक. १:२८-३०)

कृपेचा आनंद घेण्यासाठी काय करावे? 

१) देवाच्या वचनाचे पालन करा 
वचनाचे पालन निश्चीत करेल की देवाच्या कृपेचा तुम्ही किती आनंद घ्याल.

“१ माझ्या मुला, माझे नियमशास्त्र विसरू नकोस, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; २ कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होतील. ३ दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागव; त्यांना आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव; ४ म्हणजे तुला देव व मनुष्य ह्यांच्याकडून अनुग्रह व सुकीर्ती ही प्राप्त होतील.” (नीतिसूत्रे ३:१-४)

२). नम्र बना
कृपेसाठी आणखी एक शब्द “पसंती” हा आहे. नम्रता आपल्याला देवाच्या कृपेचा आनंद घेण्यास कारणीभूत असते. एक गर्विष्ठ माणूस विचार करतो की तो सक्षम व स्वतंत्र आहे; असा व्यक्ती नबुखद्दनेस्सर सारखा आहे. जो त्याचे यश, विजय, प्रसिद्धी आणि संपत्ती ही देवाने त्याला दिली आहे याबद्दल अज्ञानी होता. गर्विष्ठपणा देवाची कृपा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकतो.

“तू निजतेवेळी भिणार नाहीस; तू निजशील आणि तुझी झोप सुखाची होईल.” (नीतिसूत्रे ३:२४)

३). इतरांबरोबर चांगले वागा
लोक जे तुम्हांला आवडतात किंवा जे तुमच्याशी चांगले आहेत त्यांच्यापुरतेच तुमचा दयाळूपणा मर्यादित नसला पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वर्गीय पित्यासारखे असले पाहिजे, आणि बिनशर्त इतरांवर प्रीती करावी.

“सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणाऱ्याला तो दोषी ठरवतो.” (नीतिसूत्रे १२:२)

“४३ आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. ४४मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, [जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद दया, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा] आणि जे तुमचा छळ करतात [व तुमच्या पाठीस लागतात] त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ४५ अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतीमानांवर पाऊस पाडतो. ४६ कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना? ४७ आणि तुम्ही आपल्या बंधूजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीयही तसेच करता ना? ४८ ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.” (मत्तय. ५: ४३-४८)

४). कृपेसाठी प्रार्थना करा
कृपा ही दैवी आशीर्वादाचा एक प्रकार आहे; तुम्ही कोणत्याही परिस्थितीसंबंधी कृपा मागू शकता. देव तुम्हांला मनुष्यांसमोर कृपा देण्यास तयार आहे.

“कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस; हे परमेश्वरा, तू त्याच्याभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस.” (स्तोत्र. ५:१२)

पुढील अभ्यासासाठी: उत्पत्ती ६:८; १ शमुवेल १६:२२ आणि प्रेषित. ७:१०
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका. 

१. पित्या, तुझी कृपा माझ्या जीवनात वाढावी असे येशूच्या नावाने कर. (स्तोत्र. ५:१२)

२. हे परमेश्वरा, ज्या ठिकाणी कधी माझा नकार केला गेला होता तेथे माझा स्वीकार व्हावा असे येशूच्या नावाने कर. (एस्तेर २:१७)

३. या हंगामात आणि या महिन्यात येशूच्या नावाने माझ्यावर कृपा करण्यात येईल. (लूक. १:३०)

४. पित्या, मनुष्यांनी मजवर कृपा करावी असे येशूच्या नावाने कर. (नीतिसूत्रे ३:४)

५. पित्या, मला आर्थिकदृष्ट्या आशीर्वादित कर म्हणजे मी देखील इतरांना आशीर्वादित करू शकावे. (२ करिंथ. ९:८)

६. माझ्या जीवनातील कृपेच्या विरोधातील कोणत्याही आचरणाला येशूच्या नावाने मी उपटून टाकतो. (फिलिप्पै. ४:८)

७. हे परमेश्वरा, तुझी कृपा येशूच्या नावाने माझ्या व्यवसायावर राहो. (अनुवाद २८:१२)

८. पित्या, तुझ्या कृपेने उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेकडून येशूच्या नावाने मला शोधावे असे होऊ दे. (यशया ४३:५-६)

९. मी आदेश देत आहे की, आशीर्वाद, पदोन्नती, संपत्ती आणि संधीचे बंद झालेले प्रत्येक दार अग्नीद्वारे येशूच्या नावाने उघडले जावे. (प्रकटीकरण ३:८)

१०. मला संपन्न होण्यापासून रोखणाऱ्या कोणत्याही दुष्ट शक्तीला येशूच्या नावाने मी मोडून काढतो. (लूक. १०:१९)

११. पित्या, तुझ्या कृपेने, प्रत्येक आशीर्वाद-विरोधी नियम आणि अडथळ्यांना मी समजून घेतो. (स्तोत्र. ४४:३)

१२. परमेश्वरा, या उपास आणि प्रार्थनेच्या ४० दिवसांच्या कार्यक्रमात सामील होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आणि मला येशूच्या नावाने तुझ्या गौरवाकरता उपयोगात आण. (मत्तय. १७:२१)

Join our WhatsApp Channel


Most Read
● दिवस २५:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● प्रतिभेपेक्षा चारित्र्य
● धैर्यवान राहा
● दिवस २० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● २१ दिवस उपवासः दिवस ११
● दिवस १४ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन