"कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे." (इफिस २:८)
जेव्हाकेव्हा मी प्रसिद्ध गीत गातो: "अद्भुत कृपा" किती मधुर वाणी ज्याने माझ्यासारख्या दुष्टाचे तारण केले?" माझ्या तारणाच्या कथे मध्ये कृपेने जी भूमिका पार पाडली आहे त्याचे हे मला आठवण देते. परमेश्वराने मला आत्महत्या करण्यापासून वाचविले. कृपेच्या ह्या तारणाचा मी नेहमीच आनंद घेत राहीन जे मला मोफतपणे दिले गेले आहे. मला खातरी आहे की तुमच्याकडे सुद्धा सांगावयास तशीच कथा असेन.
आपले आजचे मुख्य वचन आपण तारण कसे प्राप्त केले याचे स्पष्टीकरण देते. प्रत्यक्षात तारण प्राप्त करण्यात आपल्या कार्याच्या किंवा परिश्रमाच्या अभावास ते स्पष्ट करते. प्रत्येक विश्वासू एक निश्चित कर्तव्य किंवा जबाबदारी पूर्ण करण्यात त्याच्या योग्यतेद्वारे तारण पावत नाही. आपल्या तारणासाठी आपल्याकडून काहीही पात्रतेची गरज लागत नाही परंतु परिवर्तनासाठी एक इच्छूक अंत:करण व इच्छा लागते. कोणताही मनुष्य त्याचे स्वतःचे तारण करण्यास पुरेसा योग्य व सबळ असा नाही!
कवटीच्या ठिकाणी येशूचे बलिदान हे कृपेचे सिद्ध उदाहरण आहे ज्याने आपले तारण केले आहे. एदेन बागेतील अगदी शोकांतिक पतनापासून, मानवजात नेहमीच पाप, अंधार व विनाश मध्ये गुरफटून गेली होती. येथे उद्धारा साठी काहीही आशा नव्हती व पापासाठी बलिदान म्हणून कोणत्याही मनुष्याचे रक्त हे योग्य असे नव्हते. म्हणून, मनुष्य पापा मध्ये निरंतर विनाश पावत व नुकसान भोगत होते.
परंतु देवाच्या कृपाळू व प्रेमळ स्वभावाने आपल्यासाठी मनुष्याचे दुराचरण व कार्य करण्याच्या आळशीपणावर उपाय साठी एक महान योजना आखली. प्रसिद्ध वचन, योहान ३:१६, सर्वदृष्टया कृपाळू प्रेमळ पिता द्वारे केलेल्या अंतिम अर्पणा विषयी आपल्याला सांगते. मानवासाठी देवाच्या प्रीतीच्या गहनतेने त्याच्या अंत:करणात आपल्यासाठी एक विशाल स्थान निर्माण केले. आपण सर्व जण नरकास पात्र होतो! परंतु विनाश व अस्वीकाराच्या आपल्या कथेस कृपेने पुन्हा लिहिले!
अद्भुतपणे, येथे किंमत होती जी येशूने पापा साठी भरली जे त्याने कधीही केले नव्हते. मानवासाठी देवाच्या प्रीति द्वारे कृपेच्या पुरवठ्यानेच केवळ जन्म घेतला. कृपा प्राप्त करणे किंवा त्यास पात्र होण्यासाठी येथे असे काहीही नव्हते/नाही आहे जे तुम्ही कधी करू शकला असता. रोम ५:८ प्रगट करते की, "परंतु देव आपणांवरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतांनाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला." ओह किती कृपा! त्याविषयी विचार करा-जेव्हा आपण अजूनही पापी होतो! म्हणजे ते कृपा येथे कार्यरत आहे.
अनेक बायबल विज्ञानी लोकांनी कृपे ला त्याच्या पहिल्या अक्षराशी जोडले आहे:
जी- (G)- देवाची
R- रिचेस-श्रीमंती
A- करण्याने
C- ख्रिस्ताचे
E- अर्पण
प्रारंभीच्या नवीन करारातील मंडळी मध्ये, अनेक यहूदी विश्वासणारे अपेक्षा करीत होते की परराष्ट्रीयातून ख्रिस्ती झालेल्या लोकांनी सुंता ही करावी व विधी व नियम हे पाळावे (प्रेषित १५:१-२ वाचा). देवाच्या प्रीति साठी पात्र होण्याचा तो एक मार्ग होता. जेव्हा येशू आपल्याला कृपेचे दान देतो, आपण त्याची भरपाई करावी याची तो आपल्याकडून अपेक्षा करीत नाही. ते प्रीति द्वारे दिले गेले आहे आणि आपण त्यासाठी कधीही पात्र नाहीत! त्याच्या कृपे द्वारे आपल्याला तारणाचे दान हे दिले गेले आहे. हे दान प्राप्त करण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही.
प्रार्थना
पित्या, माझा अपुरेपणा असताना सुद्धा तुझी कृपा मला सतत आश्चर्यात टाकत असते. माझ्या कमकुवतपणाद्वारे तुझी प्रीति कधी कमी होत नाही. तुझ्या कृपे साठी तुझा धन्यवाद व मला साहाय्य कर की त्यास कधीही दृष्टिआड करू नये. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● येशू स्वर्गात काय करीत आहे● याबेस ची प्रार्थना
● उपासनेच्या चार मुख्य गोष्टी
● पित्याचे हृदय प्रकट केले गेले
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● परमेश्वरा, मला अडथळ्यापासून सोडीव
● धन्यवाद आणि स्तुतिचा दिवस (दिवस १९)
टिप्पण्या