english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दिवस १८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
डेली मन्ना

दिवस १८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना

Thursday, 28th of December 2023
38 25 1050
Categories : उपास व प्रार्थना
शापांना मोडणे

“याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत; इस्राएलावर काही चेटूक चालायचे नाही.” (गणना २३:२३)

शाप शक्तिशाली आहेत; नाशीबांना मर्यादित करण्यासाठी शत्रू त्यांचा उपयोग करू शकतो. शापांच्याभोवती काही रहस्ये आहेत ज्यांच्याबद्दल अनेक विश्वासणारे अनभिज्ञ आहेत.

पुष्कळ  विश्वासणाऱ्यांना देवाच्या वचनाचे योग्य अनुवाद करण्याचे माहित नाही. गलती. ३:१३ म्हणते की, ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आहे. ख्रिस्ताने आपल्याला कोणत्या शापापासून मुक्त केले आहे? मोशेच्या नियमशास्त्राशी संबंधित हा शाप आहे.

तीन प्रकारचे मुख्य नियम आहेत जे तुम्ही स्पष्टपणे समजावे अशी माझी इच्छा आहे, जे पुढील प्रमाणे आहेत:

१. दहा आज्ञा. या कायद्यांना “नियम” म्हणून देखील संबोधले जाते. २. पेंटाटुख, जी पवित्र शास्त्रातील पहिली पाच पुस्तके आहेत (उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद): यांना देखील नियम म्हणून संबोधले जाते.

३. देवाचे वचन. प्रत्येक वचन जे देवाच्या मुखातून बाहेर येते त्यांना देखील नियम म्हणून संबोधले जाते कारण देव राजा आहे, आणि राजाने बोललेले प्रत्येक शब्द हा बोललेला नियम आहे.

ख्रिस्ताने आपल्याला मोशेच्या नियमशास्त्रात असलेल्या नियमापासून मुक्त केले आहे. त्याने आपल्याला इतर कोणत्याही विधिवत नियमांपासून देखील मुक्त केलेले आहे जे धार्मिकतेसाठी बनवले गेले होते.

ख्रिस्ती व्यक्ती शापित होऊ शकतो का?

सत्य हे आहे की एक ख्रिस्ती व्यक्ती जो देवाबरोबर मजबूत नातेसंबंधात आहे तो शापित होऊ शकत नाही. काही प्रकरणे आहेत जेथे शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात, परंतु त्याचा अर्थ हा नाही की एखादा ख्रिस्ती व्यक्ती प्रत्यक्षपणे शापित आहे.

कोणत्या परिस्थिती आहेत ज्या एका ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात शापाला कार्य करायला लावू शकतात?

शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात जर तो देवाच्या सहभागीतेच्या बाहेर चालू लागतो.

शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू  शकतात जर त्याने पापी जीवनशैली बाळगून कुंपणाला तोडले आहे. कारण आपण अजूनही शंभर टक्के परिपूर्ण नाहीत, म्हणून कधीतरी पाप करणे शक्य आहे पण जेव्हा एखाद्या व्यक्तीची कायमची पापी जीवनशैली आहे, तेव्हा अशा व्यक्तीच्या विरोधात शापे सक्रीय होऊ शकतात कारण त्याने सैतानाला स्थान दिलेले आहे. (इफिस. ४:२७)

शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात, जर ख्रिस्ती व्यक्ती कराराचे संरक्षण, स्थान, आणि हक्काविषयी अनभिज्ञ आहे.

शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात, जर ख्रिस्ती व्यक्ती देवाला लुबाडत आहे किंवा देवाच्या गोष्टींचा अनादर करत आहे.

शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात, जर ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या आज्ञा पाळत नाही.

शाप ख्रिस्ती व्यक्तीच्या विरोधात कार्य करू शकतात, जर ख्रिस्ती व्यक्ती प्रार्थना करू शकत नाही आणि शापाच्या विरोधात त्याच्या अधिकाराचा वापर करू शकत नाही. हे ते आहे जे तुम्ही लागू करता त्याचा तुम्ही आनंद घेता. एक ख्रिस्ती व्यक्ती आध्यात्मिक युद्धात निष्क्रिय नसला पाहिजे.

जर ख्रिस्ती व्यक्तीने कोणाला फसवले आहे किंवा इतरांचे वाईट केले आहे, जर त्यांनी त्याला शाप दिला, तर ते कार्य करू शकते. शापाने कार्य करण्यासाठी कारण आहे. शापाने कार्य करण्यासाठी येथे कायदेशीर पाया आहे. (नीतिसूत्रे २६:२) म्हणते, “....निष्कारण दिलेला शाप खोठेच ठरत नाही.”

शापांविषयी वस्तुस्थिती
  • शाप हे निश्चित करू शकतात की जीवनात तुम्ही किती वेगाने आणि किती लांबपर्यंत जाऊ शकता.
  • शाप हे आध्यात्मिक शस्त्र आहेत ज्यांना नशिबाच्या विरोधात सोडले जाऊ शकतात.
  • शाप हे आजार, अपयश आणि मृत्यूकडे नेऊ शकतात.
  • शाप आशीर्वादांच्या उलट आहेत
  • शाप विनाशकारक आहेत.
  • शाप मोडले जाऊ शकतात.
जेव्हा शाप हे मोकळे केले जातात, आणि जेव्हा कोणताही कालावधी निश्चित केलेला नसतो, तेव्हा  ते एका पिढीपासून ते दुसऱ्या पिढीपर्यंत चालू शकते. अधिकाराच्या पदावर जे आहेत त्यांना आशीर्वाद किंवा शाप देण्याची शक्ती आहे. स्वतःवरच ओढवू घेतलेली शापे ही शापांच्या प्रकारातील सर्वात धोकादायक शापे आहेत.
पिढ्यांपिढ्यांचा आशीर्वादाप्रमाणे, पिढ्यांपिढ्यांचा शाप देखील आहे.

शापाच्या कार्याची पवित्र शास्त्रातील उदाहरणे

१. गेहेजी आणि त्याच्या घराण्याला कुष्ठरोगाने शापित केले गेले.  (२ राजे ५:२७)

२. यहोशवाने यरीहोला शाप दिला. यहोशवा ६:२६ मध्ये, यहोशवाने यरीहोवर शाप लावला, आणि त्यानंतर जवळजवळ ५३० वर्षांनी, हिएल नावाच्या माणसाने यरीहो पुन्हा बनवले, आणि त्या माणसाच्या पहिल्या आणि शेवटी जन्मलेल्या मुलांवर शापाने कार्य केले. (१ राजे १६:३४)

एकतर हिएलने शापाचा द्वेष केला, किंवा तो त्याबद्दल अनभिज्ञ होता. अनभिज्ञ असणे हे माणसाला शापाच्या नकारात्मक प्रभावापासून वाचवू शकत नाही, म्हणूनचा एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला हे कधीही नाही वाटले पाहिजे की वंशातील अस्तित्वात असलेल्या शापाबद्दल अनभिज्ञ असणे हे त्यापासून सुटलेलो आहे असे नाही.

३. आदामाला आशीर्वादित केले होते, पण त्याच्या अवज्ञेने शापाकडे नेले. परमेश्वर पाप क्षमा करतो; तो पापी व्यक्तीवर प्रेम करतो, पण पापाप्रती आपल्या निष्काळजी आचरणास सहन करत नाही. आपण पापाच्या विरोधात लढा दिला पाहिजे. (उत्पत्ती ३:१७-१९)

४. बालाक आणि बलाम. बालाकाने बलामाला वेतन देऊन कामावर ठेवले; त्याने इस्राएलास शाप द्यावा अशी त्याची इच्छा होती, म्हणजे तो त्यांचा पराभव करू शकेन. बालाकाने कोणालाही शाप देण्याच्या आध्यात्मिक प्रभावाला समजले होते आणि शारीरिकदृष्ट्या युद्धात जाण्यापूर्वी आध्यात्मिक तीर (शाप) सोडण्याची इच्छा होती. जर बालाक इस्राएली लोकांना शाप देण्यात यशस्वी झाला असता, तर मोआबी लोकांविरुद्ध युद्धात त्यांचा पराभव झाला असता.

शापांना कसे मोडणे

शाप जर सक्रीय आहे तर आध्यात्मिकदृष्ट्या पारख करा.

शापाच्या कारणासाठी प्रार्थनापूर्वक दैवी प्रकटीकरणाची विनंती करा.

कोणत्याही ज्ञात आणि अज्ञात पापांचा पश्चाताप करा जे सैतानाला आणि शापाला कायदेशीर जागा देऊ शकते.

देवाचे अभिवचन घ्या ज्याचा तुम्ही आत्म्याची तलवार म्हणून वापर कराल. तुम्ही वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि देवाची इच्छा जाणली पाहिजे. ही देवाची इच्छा आहे की तुम्ही बालेकिल्ल्यांना आणि शापाच्या कार्यांना उध्वस्त करावे.

एखाद्या परिस्थितीवर येशूचे रक्त लावा आणि त्या शापांच्या कायदेशीर आधारांना काढून टाका.

देवाच्या इच्छेसाठी प्रार्थना करा, आणि देवाने मध्यस्थी करावी म्हणून प्रार्थना करा. शापांना सक्रीय करण्यापासून त्या सैतानाला बांधण्यासाठी युद्धमय प्रार्थनांची आवश्यकता आहे.

भविष्यात्मक आदेश आणि घोषणा देण्याने ख्रिस्तामधील तुमच्या अधिकाराचा उपयोग करा. तुम्हांला आशीर्वाद प्राप्त झाले आहेत याची तुम्ही कबुली दिली पाहिजे जे त्या शापांच्या विरोधात कार्य करेल.

पवित्रतेत जगा. पापी जीवनशैलीमध्ये पुन्हा जाऊ नका.

शापे शक्तिशाली आहेत; आणि तुम्ही तुमच्या जीवनात त्यांच्याविरोधात युद्ध लढले पाहिजे. देवाची इच्छा आहे की तुम्ही अंधाराच्या कामांना नष्ट करावे जे तुमच्या नशिबावर प्रभाव करत आहेत, ही तुमची जबाबदारी आहे; आणि तुमच्याकडे अधिकार आहे.  तुमच्या आत्म्यात क्रोधात या आणि तुमच्या जीवनाच्या विरोधात केलेले वाईट शापांना नष्ट करा. मी तुमच्या जीवनावर घोषणा करतो की तुमच्या जीवनाच्या विरोधात कार्य करत असलेली कोणतीही शापे  ही आज येशूच्या नावाने मोडली जावोत.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका. 

१. माझ्या नशीबाच्या विरोधात कार्य करणारे कोणतेही नकारात्मक करार येशूच्या नावाने नष्ट केले जावोत. (यशया ५४:१७)

२. माझ्या वंशातून प्रत्येक नकारात्मक शापांना येशूच्या नावाने मी मोडून काढतो. (गलती. ३:१३)

३. मी माझ्या स्वतःला पूर्वजांची शापे आणि वाईट वेदींपासून येशूच्या नावाने वेगळे करतो. (यहेज्केल १८:२०)

४. कोणताही जादूटोणा करणारा व्यक्ती जो मला शाप देत आहे त्यावर मी अधिकार प्राप्त करतो; ती शापे येशूच्या नावाने आशीर्वादांमध्ये बदलून जावीत. (लूक. १०:१९)

५. कोणतेही शाप जे माझ्या जीवनाच्या विरोधात केलेले आहे, पित्या, येशूच्या नावाने त्यांना आशीर्वादांमध्ये बदल. (अनुवाद २३:५)

६. माझी प्रगती आणि संपत्तीच्या विरोधात कार्य करणाऱ्या कोणत्याही तत्वांना येशूच्या नावाने मी बांधतो. (इफिस. ६:१२)

७. माझ्या वंशात मुर्तीपुजेच्या नकारात्मक परिणामांना येशूच्या नावाने मी नष्ट करतो. (१ योहान. ५:२१)

८. पित्या, येशूच्या नावाने, मला कोणत्याही शापांपासून मुक्त कर जे  माझ्या नशिबाच्या विरोधात कार्य करत आहे. (स्तोत्र. ३४:१७)

९. येशूच्या रक्ताने, माझ्या नशिबाच्या विरोधातील पूर्वजांच्या प्रत्येक पापांना येशूच्या नावाने मी निष्क्रिय करत आहे. (यहेज्केल १८:२०)

१०. माझ्या जीवनावरील अपयशाचा आत्मा आणि आदेशाचा मी नकार करतो;  येशूच्या नावाने मी यशस्वी होईन. (फिलिप्पै. ४:१३)

११. परमेश्वराच्या शक्तीने, मला पूर्वजांकडून वारसाने मिळवलेल्या प्रत्येक शापांपासून मुक्त कर. येशूच्या नावाने (गलती. ३:१३)

१२. कोणतेही वाईट शाप जे चांगल्या गोष्टी माझ्याकडे येण्यापासून रोखत आहे; येशूच्या नावाने पवित्र आत्म्याच्या अग्नीने मी तुम्हांला मोडून टाकतो. (यशया ५४;१७)

Join our WhatsApp Channel


Most Read
● सुवार्ता घेऊन जाणारे
● वाईट विचारांवरील युद्ध जिंकणे
● देवाच्या कृपेवरून सामर्थ्य मिळविणे
● पेंटेकॉस्ट चा उद्देश
● देवाच्या उद्धेशासाठी तुम्ही निश्चित केलेले आहात
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा
● नरक हे खरे स्थान आहे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन