जो कोणी माणसांसमोर मला पत्करील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर पत्करीन; पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. (मत्तय १०:३२-३३)
येशूचे प्रभुत्व मनुष्यांसमोर कबूल करणे हा लज्जा व भीतीचा विषय नाही. तरीसुद्धा,अनेक ख्रिस्ती लोक सार्वजनिकपणे येशूला त्यांचा प्रभु व तारणारा म्हणून स्वीकारण्यास मनुष्यांच्या भीतीमुळेतयार होत नाहीत.
येशूच्या वेळी सुद्धा अनेक जण त्याच्यामध्ये एक मशीहा म्हणून विश्वास ठेवत होते परंतु घाबरत होते कीउघडपणे भीतीमुळे ते कबूल करावे की ते एखादे पद गमावितील किंवा यहूदी समाजातून बहिष्कृत केले जातील.
मुद्द्याचे प्रकरण: जन्मापासून एक आंधळ्या मनुष्याने येशूच्या हाताने दृष्टि प्राप्त केली. जेव्हा आई-वडिलांना विचारण्यात आले की हा त्यांचा मुलगा आहे का ओळखावे, त्यांनी उत्तर दिले, "हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला हे आम्हांला ठाऊक आहे; तरी आता त्याला दृष्टि कशी आली हे आम्हांला ठाऊक नाही; किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हांला ठाऊक नाही, त्याला विचारा, तो वयात आलेला आहे, तो स्वतःविषयी सांगेल. (योहान ९:२०-२१)
त्यांना ठाऊक होते की हा तो येशू होता ज्याने त्यांच्या मुलाला बरे केले होते. परंतु त्याच्या आई-वडिलांनी असे म्हटले कारण त्यांना यहूद्यांचे भय होते; कारण खिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभाबहिष्कृत करावे असे यहूद्यांचे अगोदरच एकमत झाले होते. ह्यामुळे त्याच्या आईबापांनी म्हटले, तो वयात आलेला आहे, त्याला विचारा. (योहान ९:२२-२३)
बायबल पुढे आपल्याला सांगते, "असे असूनही अधिकाऱ्यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परुश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते." (योहान १२:४२)
लोक येशू ख्रिस्ताला त्यांचा प्रभु व तारणारा म्हणून सार्वजनिकपणे का स्वीकारीत नव्हते?
बायबल म्हणते, "कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवांकडील गौरव अधिक प्रिय वाटले" (योहान १२:४३).
अनेक वेळा देवाच्या मान्यतेपेक्षा मनुष्याची मान्यता अधिक महत्वाची आहे असे दिसते, लोक सार्वजनिकपणे येशू ख्रिस्ताला त्यांचाप्रभु व तारणारा स्वीकारण्यात चुकत आहेत.
आपण इतरांच्या अमान्यतेला इतके का घाबरतो? बायबल यास "मनुष्याचे भय" म्हणते, मनुष्याचे भय हे आपल्याला चालना देऊ शकते की, जेव्हा आपण कार्य केले पाहिजे, व आपल्याला शांत करते जेव्हा आपण बोलले पाहिजे असते.
"मनुष्याची भीति पाशरूप होते; पण जो परमेश्वरावर भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते." (नीतिसूत्रे २९:२५)
"पाशरूप" साठी येथे इब्री शब्द हा त्याचा संदर्भ देतो जे एक शिकारी पक्षी किंवा प्राण्यास पकडण्यास जाळे लावतो. पाश हे धोकादायक आहे आणि आपण ते सर्व काही केले पाहिजे की आपल्या स्वतःला त्याच्यापासून मुक्त करावे.
सुवार्ता ही, परमेश्वराकडे सामर्थ्य आहे की आपल्याला मनुष्याच्या भीतीपासून मुक्त करावे म्हणजे आपण स्वतंत्रतेमध्ये सुरक्षित व संरक्षित असे राहावे जे त्याने आपल्यासाठी त्याचा पुत्र येशू ख्रिस्ताच्या सिद्ध अर्पणाद्वारे पुरविले आहे.
#१ जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात मनुष्याची भीति ओळखता, त्याची देवाकडे पाप म्हणून कबुली करा व पश्चाताप करा.
#२ "आम्ही मनुष्यांपेक्षा देवाचे ऐकले पाहिजे" (प्रेषित ५:२९).आज्ञाधारकपणा धैर्याची मागणी करतो. धैर्य हे भीतीच्या भावनेची अनुपस्थिती नाही, परंतुआपल्याला काय वाटते त्यापेक्षा आज्ञा पाळण्याचा निश्चय करणे आहे.
#३ कृपा व सामर्थ्यासाठी त्यास मागा कीयेशू ख्रिस्ता विषयी सर्व ठिकाणी सर्व वेळेला धैर्याने घोषित करावे.
अंगीकार
मी मनुष्याला भिणार नाही परंतु देवाला. प्रभु येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला व जेव्हा तो पुन्हा उठला त्याने मला विजय दिला. त्यामुळे मी येशूला सर्व ठिकाणी सर्व वेळेला उच्च करेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमची प्रतिक्रिया काय आहे?● मी प्रयत्न सोडणार नाही
● त्याचा शोध घ्या आणि तुमच्या युद्धाला तोंड दया
● अगापेप्रीति मध्ये कसे वाढावे
● २१ दिवस उपवासः दिवस १४
● देव महान द्वार उघडतो
● काठी ज्यास अंकुर आले
टिप्पण्या