एक घुंगरू व एक डाळिंब, एक घुंगरू व एक डाळिंब हे याजकाच्या झग्याच्या खालच्या घेरात सभोवती आलटून पालटून लाविली. हे वस्त्र घातले पाहिजे जेव्हा केव्हा याजक परमेश्वरासमोर सेवा करीत असेन, जसे परमेश्वराने मोशे ला आज्ञा दिली होती. (निर्गम ३९:२५-२६)
वरील वचन वस्त्रा (झगा) विषयी वर्णन करतेजे याजक घालतो जेव्हा तो पवित्र स्थानात सेवा करतो. याजकाच्या झग्याच्या खालच्या भागी एक घुंगरू व एक डाळिंब लाविलेले असते, एक घुंगरू व एक डाळिंब हे याजकाच्या झग्याच्या खालच्या घेरात सभोवती आलटून पालटून लाविलेले असते. येथे यांस गहन आध्यात्मिक महत्त्व आहे.
जेव्हासंदेष्टा मोशे ने कनान च्या भूमीचा आढावा घेऊन येण्यास हेर पाठविले होते, एक वार्ता त्यास द्यावयाची होती ती तेथील फळा विषयी होती.
तेथूनते अष्कोल नाल्यापाशी आले; तेथे त्यांनी द्राक्षांच्या घोसासाहित एक फांदी तोडून घेतली व ती दोघा मनुष्यांनी काठीवर घालून नेली; त्याचप्रमाणे त्यांनी काही डाळिंबे व अंजीरेही घेतली. इस्राएल लोकांनी त्या ठिकाणच्या द्राक्षांचा घोस तोडला म्हणून त्याचे नांव अष्कोल नाला असे पडले. (गणना १३:२३-२४)
एक भूमी ही तेथील फळा द्वारे ओळखली जाते; मग ती सुपीक आहे किंवा नापीक आहे. त्याप्रमाणे, एकव्यक्ति हा त्याच्या जीवनात व जीवनाद्वारे निर्माण करणाऱ्या फळा द्वारे ओळखला जातो.
प्रभु येशूने तेच म्हटले:
चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. (मत्तय ७:१९-२०)
आता, तुम्ही हे समजले पाहिजे की प्रभु येशू केवळ झाड व फळा विषयी बोलत नाही, तो लोक व त्यांच्या चारित्र्या विषयी संदर्भ देत आहे. तर तुम्ही मुख्य याजकाच्या झग्याच्या किनाऱ्यावर डाळिंब पाहता ते आत्म्याच्या फळा चे प्रतीक आहे.
एक ख्रिस्ती म्हणून, जेव्हा आपण त्याचे साक्षी म्हणून जातो, आपण याची काळजी घेतली पाहिजे की त्याच्या आत्म्याच्या फळांना प्रदर्शित करावे. फळांविषयी केवळ बोलणे हे पुरेसे नाही.
आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता इंद्रियदमन हे आहे (गलती ५:२२-२३). याशिवाय येथे कोणतीही खरी साक्ष असू शकत नाही; येथे कोणतीही सेवा असू शकत नाही.
दुसरे,मुख्य याजकाच्या झग्याच्या किनाऱ्यावर घुंगरू हे आत्म्याच्या दाना चे प्रतीक असे आहे.
मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीति नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. (१ करिंथ १३:१)
१ करिंथ १२ मध्ये आत्म्याच्या दाना विषयी बोलल्या नंतर ताबडतोब, पौल जो प्रेषित प्रीतीच्या पायावर आधारित आत्म्याच्या दानाच्या कार्याच्या महत्वा विषयी बोलत आहे.
घुंगरूचे छमछमनेहेलोक जे बाहेर वाट पाहत आहेत त्यांना दर्शविते की याजक हा आतमध्ये देवासमोर जिवंत आहे आणि मृत झाला नाही.
सर्वात महत्वाचे सत्य येथे हे आहे की आपण एक पर्याय निवडावा आणि दुसरा घेऊ नये असे करू शकत नाही. आपण एकाची जोपासना आणि दुसऱ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. ते घुंगरू, डाळिंब, घुंगरू, डाळिंब असे आपल्या जीवनाभोवती असले पाहिजे.
आपले जीवन, आपली सेवा, जे काही आपण करू त्यामध्ये दान व फळे यांचे सिद्ध संतुलन असले पाहिजे; आणि दोन्ही तेथे आहे की देवाला आशीर्वाद दयावे व त्याच्या लोकांना आशीर्वाद दयावे. हे नेहमीच असे असो.
प्रार्थना
पित्या, माझे जीवन हे पवित्र आत्म्याचे दान व फळांचे एक सिद्ध प्रदर्शन होवो. माझ्या जीवना द्वारे सर्व गौरव व महिमा प्राप्त कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● धार्मिक सवयी● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात
● अशी संकटे का?
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
● तुमचे तारण झालेच्या दिवसाचा उत्सव करा
● दिवस ०५: ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या