डेली मन्ना
परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1
Friday, 13th of September 2024
27
26
223
Categories :
पुरवठा
परमेश्वर त्याच्या लोकांसाठी पुरवठा कसा करतो
मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो;
तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति
भिकेस लागलेली मी पाहिली नाही. (स्तोत्रसंहिता 37:25)
दाविदाचीत्याच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी ही साक्ष होती. असे होवो की ही साक्ष तुमची आणि माझी सुद्धा व्हावी येशूच्या नांवात. परमेश्वर त्याच्या लोकांना काही मार्गांनी आणि प्रकारे नेहमीच पुरवठा करेल ज्याचा तुम्ही आणि मी विचारही करू शकत नाही. तो विश्वसनीय परमेश्वर आहे. (अनुवाद 7:9)
जेव्हा परमेश्वराने इस्राएली लोकांना मिसर देशातून 430 वर्षांच्या बंदिवासातून बाहेर आणले, जेव्हा ते आश्वासित भूमी कडे जात होते तेव्हा त्यांनी एक सर्वात मोठया आवाहनाचा सामना केला ते भोजन होते.
ते संख्येने इतके अगणित होते आणि वास्तविकता ही कीते रानातून जात होते त्याने तो प्रवास आणखीनच आवाहनात्मक केला. मोशे जो देवाचा मनुष्य त्याने सुद्धा एकदा परमेश्वराला विचारिले,
"मग मोशे म्हणाला, ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पायदळच सहा लाख आहे आणि तूं म्हणतोसकी, ते महिनाभर खात राहतील एवढे मांस मी त्यांना देईन. त्यांना पुरे पडावे म्हणून गुरेढोरे व शेरडेमेंढरे कापावीत काय? अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय?" (गणना 11:21-22)
तरीसुद्धा वेळोवेळी परमेश्वराने त्याच्या लोकांना रानात अद्भुतरित्या पुरवठा केला. जरपरमेश्वर लाखो इस्राएली लोकांना रानाच्या मध्यअसतानापुरवठाकरू शकतो, तर तो निश्चितच तुम्हाला आणि तुमच्या प्रिय जणांना पुरवठा करू शकतो.
तरीसुद्धा परमेश्वराच्या अद्भुतरीतीने पुरवठा केल्यानंतरही, इस्राएली लोकांनी रानात तरीसुद्धा परमेश्वरा विरुद्ध कुरूकुर आणि तक्रार केली. ते त्या भोजनाची इच्छा करीत होते जे त्यांनी मागे मिसर मध्ये घेतले होते.
त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला; आणि इस्राएल लोकहि पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, आम्हांला खावयाला मांस कोण देईल? मिसर देशात आम्हांला मासे फुकट खावयाला मिळत असत त्याची आठवण आम्हांलायेते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांचीही आम्हांला आठवण येते; पण आता आमचा जीव सुकून गेला आहे; येथे ह्या मान्नाशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही. (गणना 11:4-6)
परमेश्वर प्रत्यक्षात स्वर्गातून भाकर पुरवीत होता-रोजच्या दिवसाकरिता पुरेशी-परंतु त्यांना त्याचा पुरवठा वेगळ्या मार्गाने पाहिजे होता. त्यांना त्यांच्या मार्गाने तो पाहिजे होता.
कदाचित तुम्ही एका विशेष नोकरी साठी प्रार्थना करीत आहात आणि जी नोकरी तुम्हाला पाहिजे होती ती तुम्हाला मिळत नाही, तर तक्रार आणि कुरकुर करू नका. तुमचा उत्तम प्रयत्न करा!
तुमच्या कामाच्या ठिकाणी काही गोष्टी कदाचित व्यवस्थित होत नसतील, तर चिडू नका. कमीत कमी तुम्ही आभारी असले पाहिजे की आजच्या वेळात तुमच्याकडे नोकरी आहे जेथे हजारो त्यांची नोकरी गमावीत आहेत
जर तुम्हाला देवाचा पुरवठा निरंतर पाहावयाचा आहे, तुम्हाला परमेश्वराला हे मागायचे आहे की ज्याकोणत्याही मार्गाने त्यास योग्य वाटते तसे त्याने पुरवावे. परमेश्वराच्या अद्भुत आणि अनपेक्षित मार्गा विरुद्ध कुरूकुर करू नका.
तसेच तक्रार आणि कुरकुर करण्याऐवजी, आपल्याला परमेश्वरास त्याच्या पुरवठयासाठी आभार व्यक्त केले पाहिजे.
सर्व स्थितीत [यात काही पर्वा नाही कीपरिस्थिती कशी आहे, आभारी राहा, आभार व्यक्त करा] [देवाची] उपकारस्तुति करा; कारण तुम्हांविषयी ख्रिस्त येशुमध्ये [त्या इच्छेचा प्रकट करणारा आणि मध्यस्त] देवाची इच्छा हीच आहे. (1 थेस्सलनी 5:18)
आभारी राहणे हे तुम्हाला मोठे होण्यात समर्थ करेल. जेव्हा तुम्ही कृतज्ञ आणि आभारी ख्रिस्ती व्यक्ति आहात, नवीन तेल नवीन प्रभावासाठी तुमच्यावर येईल आणि गोष्टींना वाढण्यास व बहुगुणीत होण्याचे कारण होईल.
प्रार्थना
पिता परमेश्वरा, तूं माझा पुरवठा करणारा आहे. तुला जे योग्य वाटते त्याप्रकारे कृपा करून मला पुरवठा कर. विश्वासाद्वारे त्या गोष्टीसाठी मी तुझे अगोदरच आभार मानत आहे. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका● वचनाची सात्विकता
● त्या विश्वासांना मर्यादित करणे जे तुम्हाला अडखळण करते
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम
● परमेश्वर पुरवठा करेल
● दिवस ०५: ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या