बायबल म्हणते की, "दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवंशाचा मनुष्य कोणास मिळतो?" (नीतिसूत्रे २०:६)
मला आठवते मी एका वयस्कर स्त्रीला विचारले की ती तिच्या कुत्र्याला इतके प्रेम का करते? तिने उत्तर दिले, "अनेक गोष्टींमध्ये कुत्रे हे मनुष्यांपेक्षा अधिक प्रामाणिक असतात." तिचे उत्तर हे कायमचे माझ्या मनावर कोरले गेले होते.
मग हे कार्यालय (कामाचे ठिकाण), मंडळी, व्यवसाय (व्यवहारिक जग), राजकीय, किंवा कौटुंबिक असे काहीही असो, एक गोष्ट जिचा मोठया प्रमाणात तुटवडा आहे ती प्रामाणिकता आहे. प्रामाणिकता ही आजच्या काळात तुरळक साधन झाले आहे. अनेक जण त्यास तोंडी फारच मोठे स्थान देतात, परंतु फारच थोड्यांमध्ये ती असते.
प्रामाणिकता काय आहे?
प्रामाणिक राहणे याचा अर्थ विश्वासू राहणे व आश्वासने पाळणे होय. सर्व परिस्थिती मध्ये अवलंबून राहणे सुद्धा त्यात समाविष्ठ आहे. प्रामाणिक राहणे याचा अर्थ तुम्हाला तुमच्या स्वार्थीपणास बाजूला ठेवायचे आहे आणि वैयक्तिक समर्पणास महत्त्व देणे आहे.
जेव्हा कोणी रुथ हे पुस्तक वाचतो, तेव्हा तुम्ही पाहाल की सर्वात महत्वाची गोष्ट जी रुथ म्हणते ती प्रामाणिकपणा आहे जो देवाच्या प्रति व्यक्त केला आहे. "....तुमचे लोक हे माझे लोक होतील, व तुझा देव हा माझा देव असेन" (रुथ १:१६). येथे एक तरुण स्त्री होती जिच्या जीवनात काहीही चांगले होत नव्हते. तिच्याकडे सर्व कारणे होती की देवाचा अस्वीकार करावा व देवापासून दूर जावे, आणि तरीही ती म्हणते, "तुझा देव माझा देव असेन."
जेव्हा तुम्ही राहिलेली गोष्ट वाचता तुम्ही हे पाहता की देवाने तिच्या प्रामाणिकपणाला नाटकीयरित्या सन्मानित केले आहे. तिला पुनर्स्थापित केले गेले आणि याचा उल्लेख करू नये, ती सरळपणे मशीहा-प्रभु येशू ख्रिस्ताच्या वंशावळीत होती.
जेव्हा येशूने त्याच्या शिष्यांना बाहेर पाठविले, त्याने त्यांना दोन दोन करून पाठविले (मार्क ६:७). ह्या दोघांच्या संघाने, साहजिकच प्रामाणिकपणा, एकता व मित्रता खात्रीने वाढविली जेव्हा त्यांनी एकत्र मिळून देवाच्या राज्याची घोषणा केली, आजाऱ्यांस बरे केले व भूतांना काढले.
तुमचे दररोजचा हा प्रार्थनेचा मुद्दा करा, परमेश्वराला हे मागत की इतरांसोबत तुमच्या संबंधांमध्ये प्रामाणिक राहावे. सर्वात महत्वाचे, योग्य प्राथमिकतेसह त्याशी प्रामाणिक राहावे.
प्रार्थना
पित्या मला साहाय्य कर की दररोज मी आपला वधस्तंभ घ्यावा आणि तुझ्या वचनानुसार तुझ्या मागे चालावे. मी तुला हे सुद्धा मागतो की माझ्याभोवती प्रामाणिक व विश्वासू लोक असू दे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी सामर्थ्य मिळवा● निराशेच्या तीरांवर प्रभुत्व करणे
● अगापेप्रीति मध्ये वाढणे
● निंदा संबंधाला नष्ट करते
● दयाळूपणाचे मोल आहे.
● दुरून मागे मागे चालणे
● शत्रूला तुमच्या परिवर्तनाची भीति वाटते
टिप्पण्या