डेली मन्ना
उपास द्वारे देवदूताला कार्य करावयास लावणे
Tuesday, 30th of January 2024
23
14
943
Categories :
उपास व प्रार्थना
देवदूत
तो (देवदूत) मला म्हणाला, दानीएला, भिऊ नको; कारण ज्या दिवशी तूं समज घेण्याचा, व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दावरून मी आलो आहे. (दानीएल १०:१२)
बायबल सांगते की दानीएल च्या तीन आठवड्याच्या उपास व प्रार्थनेच्या शेवटी देवाकडून उत्तर म्हणून, देवदूत गैब्रिएल दानीएल ला प्रगट झाला व त्यास म्हटले, " तुझे शब्द ऐकण्यात आले; त्या तुझ्या शब्दावरून मी आलो आहे."
दानीएल ने देवदूताकडे प्रार्थना केली नाही. ही प्रार्थना पित्याकडे केली होती ज्यात उपास सुद्धा होता ज्याने दानीएल च्या वतीने देवदूताच्या स्तरास कार्यरत केले. दानीएल च्या वतीने एका सामर्थ्यशाली देवदूताला कार्यरत केले गेले.
प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही प्रार्थने मध्ये येता, हे लक्षात ठेवा की तुम्ही काही निष्फळ कार्यात व्यस्त नाहीत. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उपास व प्रार्थना करता तेव्हा देवदूतास तुमच्या वतीने कार्यरत केले जाते. आग्रह्पूर्ण उपास व प्रार्थना देवदूतास कार्यरत करते की तुमचे स्वप्न व दृष्टांत हे पूर्ण करावे.
प्रेषित २७ मध्ये, प्रेषित पौल एका जहाजामध्ये होता ज्यामध्ये २७६ यात्रेकरू होते. हे जहाज एका भयानक वादळात सापडले होते. जहाज हे वाऱ्याने हलणाऱ्या पाना प्रमाणे इकडून तिकडे हेलकावे खात होते आणि ते तुकडेतुकडे होण्याच्या धोक्यात होते. अनेक दिवस सूर्य, चंद्र व तारे ही दिसले नाहीत, आणि धोकादायक खडक व धसणाऱ्या वाळू मुळे, असे दिसत होते की पौल व यात्रेकरू निश्चितच मोठया विनाशात पडणार आहेत.
पौल अधिक उपास करीत होता आणि देवाच्या मध्यस्थी साठी प्रार्थना करीत होता. देवाने पौलाच्या वतीने देवदूताला पाठविले, देवदूताकडून भविष्यात्मक संदेशाने त्यांस वादळा पासून विनाश होण्यापासून सांभाळले.
जेव्हा केव्हा तुम्ही उपास व प्रार्थना करता, देवदूत हे तुमच्या वतीने कार्यरत केले जातात. अनेक वेळेला लोक मला हे म्हणत लिहितात, "मी उपास केला आणि प्रत्यक्षात काहीही झाले नाही." तेच काय ते तुम्ही विचार करता. आत्मिक स्तरात देवदूत हे कार्यरत केले जातात व ते सैतानी अडथळे काढण्यात कार्य करीत आहेत जे तुमचे चमत्कार भौतिक स्तरात प्रगट होण्यापासून रोखत आहेत.
उपास व प्रार्थना करीत राहा. तुम्ही एक नवीन वाटचाल पाहणार आहात जे तुमचे शत्रू सुद्धा मानतील की परमेश्वर तुमच्या जीवनात कार्यरत आहे.
अंगीकार
मी परमेश्वराचे भय धरतो व त्याची इच्छा पूर्ण करतो म्हणून देवाचा दूत सतत माझ्याभोवती डेरा देऊन आहे. (हे सतत बोलत राहा.)
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वराकडून सल्ल्याची गरज● स्वामीची इच्छा
● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
● अपरिवर्तनीय सत्य
● प्रार्थना कशी करावी जेव्हा तुम्हाला देवापासून दूर आहोत असे वाटते
● दिवस १८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● दीर्घ रात्रीनंतर सूर्योदय
टिप्पण्या