नातेसंबंध हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आणि ख्रिस्ती म्हणून, देवाच्या योजनेनुसार त्यास कसे बनवावे आणि वाढवावे हे समजणे महत्वाचे आहे. या संबंधात प्रभू येशू ख्रिस्तावाचून आपला इतर कोणताही परिपूर्ण आदर्श नाही. पृथ्वीवरील त्याच्या समयादरम्यान, प्रभू येशूला एक महत्वाचा उद्देश पूर्ण करायचा होता आणि पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य नातेसंबंध एक महत्वाची भूमिका पार पाडेल हे त्यास ठाऊक होते.
नातेसंबंधाकडे पाहण्याचा येशूचा एक महत्वाचा पैलू हा प्रार्थना होता. ज्या लोकांमध्ये निवेश करायचा आहे आणि ज्यांच्याबरोबर वेळ व्यतीत करायचा आहे त्यांची निवड करण्यामध्ये तो पित्याचे मार्गदर्शन सातत्याने शोधत होता. जसे लूक. ६:१२-१३ आपल्याला सांगते, “त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले, आणि त्यांच्यातून पुढील बारा जणांना निवडून त्यांना ‘प्रेषित’ असे नावही दिले.”
नातेसंबंध बनवण्यामध्ये येशूचे प्रार्थनेवर विसंबून राहणे आपल्याला एक मौल्यवान धडा शिकवते. आपण देवाचे ज्ञान आणि निर्देशाचा धावा केला पाहिजे जेव्हा लोक ज्यांना आपण आपल्या जीवनात सामावून घेतो. नीतिसूत्रे १३:२० आपल्याला आठवण देते, “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” आपल्या नातेसंबंधासाठी प्रार्थनापूर्वक विचार करण्याने, आपण अनावश्यक वेदनांना टाळू शकतो, आणि आपल्या सभोवती त्या व्यक्तींनी घेरलेले राहू शकतो जे आपल्याला आपल्या विश्वासात प्रोत्साहन देतील आणि देवाचे उद्देश पूर्ण करण्यात आपल्याला साहाय्य करतील.
तथापि, प्रार्थना आणि पारख केल्यानंतरही, सर्व नातेसंबंध हे नेहमीच सोपे किंवा यातनारहित नसतील. यहूदा इस्कर्योत, बारामधील एका शिष्याची कथा, या सत्याला स्पष्ट करते. स्वयं येशूने निवड केलेली असतानाही, यहूदाने शेवटी प्रभूचा विश्वासघात केला. योहान. १७:१२ मध्ये, येशूने प्रार्थना केली, “जोपर्यंत मी जगात त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला; आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.”
येशू आणि यहूदामधील हे कठीण वाटणारे नातेसंबंध एक आठवण म्हणून कार्य करते की कधीकधी, सर्वात आव्हानात्मक नातेसंबंध देवाच्या महान योजनेमध्ये एक उद्देश पूर्ण करण्याचे काम करते. जसे रोम. ८:२८ आपल्याला खात्री देते, “परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.” काही निश्चित नातेसंबंधामागील कारणे आपण कदाचित समजू शकत नसतानाही, आपल्याला घडवण्यासाठी आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव त्यांचा वापर करत आहे हा आपण विश्वास ठेवू शकतो.
नातेसंबंधांच्या जटीलतेमधून आपण पुढे वाटचाल करत असताना, देवाने आदेश दिलेल्या प्रत्येक नातेसंबंधात अदृश्य शत्रू असतो हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. इफिस. ६:१२ मध्ये बायबल आपल्याला ताकीद देते, “कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.”
या कारणामुळेच आपल्या नातेसंबंधाला दररोज येशूच्या रक्ताने आच्छादन करणे आणि देवाचे संरक्षण आणि सामर्थ्यासाठी प्रार्थना करणे महत्वाचे आहे.
याशिवाय, आपण आपल्या नातेसंबंधात सक्रीय होऊन निवेश केला पाहिजे, ज्याप्रमाणे प्रभू येशूने त्याच्या शिष्यांबरोबर केले. त्याने त्यांना शिकवून, मार्गदर्शन देऊन आणि त्यांच्या जीवनात सहभागी होऊन वेळ व्यतीत केला. जसे नीतिसूत्रे २७:१७ म्हणते, “तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो.” इतरांच्या जीवनात स्वतः हेतुपूर्वक लक्ष घालण्याद्वारे आणि त्यांनाही तसेच आपल्यासोबत करू देण्याद्वारे, आपण एक वातावरण निर्माण करतो जेथे नातेसंबंध वाढते आणि देवाला गौरव आणते.
शेवटी, आपल्या सर्व नातेसंबंधांचा पाया हा ख्रिस्ताबरोबरचा आपला संपर्क असला पाहिजे. जेव्हा आपण त्याच्यामध्ये राहतो, आणि त्याच्या प्रीतीला आपल्यातून प्रवाहित होऊ देतो, तेव्हा आपण इतरांना प्रीती करण्यास आणि त्यांची सेवा करण्यास उत्तम असे तयार होतो. योहान. १५:५ आपल्याला आठवण देते, “मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही.”
म्हणून मग, योग्य नातेसंबंध बनवण्यासाठी प्रार्थना, पारख आणि देवावर सखोल विसंबून राहण्याची आवश्यकता लागते. येशूच्या आदर्शाचे अनुसरण करून आणि त्याच्या रक्ताने आपल्या संबंधांना आच्छादन घालून, आपण नातेसंबंध जोपासू शकतो जे त्याचा सन्मान करतात आणि त्याच्या राज्याच्या वाढीसाठी योगदान देतात. आपल्या नातेसंबंधात हेतुपूर्वक असण्यासाठी समर्पित राहा, हा विश्वास ठेवून की आपल्याला शुद्ध करण्यासाठी आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव त्यांचा वापर करेल.

प्रार्थना
प्रिय पित्या, देवाचा-सन्मान करणारे नातेसंबंध बनवण्यासाठी आम्हांला मार्गदर्शन कर. तुझ्या ज्ञानाचा शोध घ्यावा, तुझ्या रक्ताने आमच्या नातेसंबंधांवर आच्छादन घालावे, आणि तुझ्या परिपूर्ण योजनेमध्ये विश्वास ठेवण्याचा धावा करण्यासाठी आम्हांला मदत कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस २१:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● लहान बियापासून ते उंच झाडांपर्यंत
● विश्वासासह विरोधकांना सामोरे जाणे
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
● नरक हे खरे स्थान आहे
● तो तुमच्या जखमांना बरे करू शकतो
● युद्धासाठी प्रशिक्षण
टिप्पण्या