डेली मन्ना
अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)
Friday, 24th of December 2021
51
13
2167
Categories :
उपास व प्रार्थना
पापकबुली (हे प्रत्येक वेळी मोठयाने बोला)
१. ख्रिस्त जो मला समर्थ करतो त्याच्याद्वारे मी सर्व गोष्टी करू शकतो. (फिलिप्पै ४:१३)
२. मला ख्रिस्ताचे मन आहे. (१ करिंथ २:१६)
३. माझी पाऊले ही परमेश्वरा द्वारे आदेशित आहेत. (स्तोत्र ३७:२३)
४. सर्व गोष्टी माझ्या जीवनात कल्याणासाठी होत आहेत कारण मी देवा वर प्रीति करतो व मला त्याच्या उद्धेशानुसार बोलाविले आहे. (रोम ८:२८)
५. मी मला जसे दिसते किंवा वाटते तसे नाही तर विश्वासाद्वारे जगतो व चालतो. (२ करिंथ ५:७)
६. कोकऱ्याच्या रक्ता द्वारे व माझ्या साक्षीच्या वचना द्वारे मी सैतानावर विजय मिळवितो, मृत्युपर्यंत माझ्या जिवावर प्रीति करीत नाही. (प्रकटीकरण १२:११)
७. जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा जो मजमध्ये आहे तो मोठा आहे. (१ योहान ४:४)
८. जे काही मी हाती घेतो ते परमेश्वराच्या गौरवाकरिता आशीर्वादित केले जाते. (अनुवाद २८:१२)
९. मी माझ्या स्वतःला परमेश्वरास समर्पित करतो. मी सैतानाचा प्रतिकार करतो व तो माझ्यापासून पळतो. (याकोब ४:७)
१०. मी सैतानाला स्थान किंवा संधी देत नाही. (इफिस ४:२७)
११. ख्रिस्त येशू मध्ये मी देवाची नितीमत्ता आहे. (२ करिंथ ५:२१)
१२. माझ्या प्रभु येशू ख्रिस्ता द्वारे जो मला विजय देतो त्या परमेश्वराला धन्यवाद. (१ करिंथ १५:५७)
मनन करण्यासाठी पवित्र शास्त्रातील वचने
जखऱ्या १:१८-२०
इब्री ११:१
४० दिवसांची बायबल वाचन योजना
इब्री लोकांस ५ -११
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. (वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा व प्रत्येक प्रार्थना मुद्दा कमीत कमी एक मिनीट असे करा.)
१. पिता परमेश्वरा, तुझ्या सामर्थी शक्तीद्वारे, येशूच्या रक्तामधील सामार्थ्याद्वारे, पवित्र आत्म्याच्या अग्नी माझ्या विरोधातील कोणत्याही अडखळण करणाऱ्या आत्म्याला येशूच्या नांवात विखरून टाक व नष्ट कर.
२. आध्यात्मिक, शारीरिक, आर्थिक, वैवाहिक व शैक्षणिक दृष्टया माझ्या जीवनावरील प्रत्येक आदेश किंवा शाप, मी तुम्हाला येशूच्या नांवात मोडत आहे.
३. जीवित परमेश्वराच्या आत्म्या, ऊठ व मला आता माझ्या आशीर्वादाच्या ठिकाणी येशूच्या नांवात ने.
४. पिता परमेश्वरा, माझ्या दैवी सहाय्यकांना माझ्यासह जोड, सुधारणूक कर व मार्गदर्शन कर येशूच्या नांवात.
५. जीवित परमेश्वराच्या आत्म्या, ऊठ व माझ्या मुखाला आवरण करणाऱ्या कोणत्याही पडद्याला काढून टाक म्हणजे मी येशूच्या नांवात स्पष्टपणे पाहू शकावे.
६. जीवनात यशस्वी होण्याचे सामर्थ्य, येशूच्या नांवात आत्ता, मजवर येवो.
७. पाहणे व पारख करण्याचे सामर्थ्य, येशूच्या नांवात आत्ता, मजवर येवो.
८. वर्चस्व करण्याचे सामर्थ्य, येशूच्या नांवात आत्ता, मजवर येवो.
९. प्रत्येक विचार कल्पना जे स्वतःला देवाच्या ज्ञाना पेक्षा वरचढ करते, येशूच्या सामर्थी नांवात मी तुम्हाला खाली पाडून देत आहे.
१०. प्रत्येक शक्ति जी माझ्या जीवनात स्थूलपणा वाढवीत आहे, येशूच्या नांवात मरून जावो.
११. प्रत्येक शक्ति जी माझ्या जीवनात गरिबीला वाढवीत आहे, येशूच्या नांवात मरून जावो.
१२. हे परमेश्वरा, असे होवो की पवित्र आत्म्याचा अभिषेक माझ्या नवीन वाटचालीच्या काठावरील प्रत्येक अडथळ्यास येशूच्या नांवात मोडून टाको.
१३. माझी नवीन वाटचाल ही तडजोड करणारी नाही, मी पवित्र आत्म्याचा अभिषेक व येशूच्या रक्ता द्वारे येशूच्या नांवात पुढे वाटचाल करीत आहे.
१४. कोणतेही पाप ज्याने माझे जीवन, कुटुंब, सेवाकार्य व वैवाहिक जीवनात प्रवेश व कार्य करू देण्यास कोणत्याही आत्म्याला द्वार उघडले आहे त्यासाठी येशूच्या नांवात मी पश्चाताप करतो व क्षमा स्वीकारतो.
१५. माझे जीवन तुझ्या अग्निद्वारे शुद्ध कर हे परमेश्वरा.
१६. माझे जीवन, माझे कुटुंब, माझे वैवाहिक जीवन, माझी मुलेबाळे, माझी मंडळी, माझा देश व जगा मध्ये तुझ्या पवित्र आत्म्या द्वारे येशूच्या नांवात तुझा अग्नी मोकळा कर.
१७. परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अग्निद्वारे येशूच्या नांवात माझा बाप्तिस्मा कर. (५ मिनिटे अन्य भाषे मध्ये प्रार्थना करा किंवा जसे पवित्र आत्मा तुम्हाला कृपा पुरवितो.)
Join our WhatsApp Channel
Most Read
● विश्वसनीय साक्षी● अग्नि हा पडला पाहिजे
● अडथळ्याचा धोका
● स्वर्गाचे द्वार उघडा व नरकाचे द्वार जोरानेबंद करा
● जीवनाचे पुस्तक
● कर्जामधून बाहेर या: किल्ली# १
● देवाचा आरसा
टिप्पण्या