डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस ०४
Wednesday, 15th of December 2021
51
14
3691
Categories :
उपास व प्रार्थना
येशूख्रिस्ताच्या रक्ताचे लाभ -II
कोणीतरी म्हटले आहे, “ज्याकडे तुम्ही लक्ष देता ते वाढते.” त्याप्रमाणेच, जर आपण येशूच्या रक्ताच्या लाभा कडे सतत पाहत राहिलो, तर देवाचे सान्निध्य तुमच्या जीवनावर सावली करेल.
४. विपुलता
जेव्हा इस्राएल लोकांनी मिसर देश सोडला, मृत्यूचा दूत त्यासर्वाना ओलांडून गेला ज्यांनी त्यांच्या दाराच्या बाह्यपट्टीवर कोकऱ्याचे रक्त लावलेले होते. ते केवळ मृत्यू किंवा फारोच्या दास्यातून मुक्त झाले नाही परंतु त्यांनी मिसर देश सर्व साधनसंपत्ति व श्रीमंतीसह सोडला. ज्या कशाचा तुम्ही सामना करीत आहात, तुमच्या परिस्थितीत त्याच्या रक्ताच्या सामर्थ्याच्या सुटकेवर दावा करा. तुम्ही त्याच्या विपुलतेवर सुद्धा दावा करू शकता.
मोशेच्या सांगण्याप्रमाणेइस्राएल लोकांनी केले; त्यांनी मिसरी लोकांपासून सोन्याचांदीचे दागिने व वस्त्रे प्रावरणे मागून घेतली; मिसरी लोकांची कृपादृष्टि इस्राएल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले, म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांनी त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिसरी लोकांना लुटिले. (निर्गम १२:३५-३६).
५. जीवन
शरीराचे जीवन तर रक्तात असते; आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे; कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. (लेवीय १७:११)
आपले जीवन हे येशूच्या रक्तात आहे. जीवनास तुम्हांला खाली खेचण्यापासून थांबवा. वधस्तंभावर जे जीवन त्याने आपल्यासाठी विकत घेतले आहे त्यावर दावा करा.
६. प्रवेश
पापाच्या कारणामुळे आपण परमेश्वरापासून वेगळे केले गेलो होतो. प्रवेश करणे हा दुसऱ्याच्या कृपेने आत जाण्याचा अधिकार आहे. येशूच्या सांडलेल्या रक्ताच्या कारणामुळे, पडदाज्याने मनुष्याला परमेश्वराच्या सान्निध्यापासून वेगळे केले होते तो मधून फाडला गेला की सर्वाना प्रवेश मिळावा.
म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परम पवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे; आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे; म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंत:करणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ. (इब्री १०: १९-२२)
७. येशूचे रक्त उत्तमगोष्टी बोलते
येशूचे रक्त हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. (इब्री १२:२४)
जेव्हा काइन ने त्याच्या स्वतःच्या भावाला जिवंत मारले, हाबेलाच्या रक्ताने बदल्या साठी ओरड केली. त्याउलट, येशूचे रक्त आपल्या वतीने उत्तम गोष्टी बोलते. येशूचे रक्त कृपा, आशीर्वाद, क्षमा, आरोग्य, सुटका, अनुग्रह, उद्धार बोलते.
हाबेलाचे रक्त एक व्यक्ति साठी बोलले-काइन. येशूचे रक्त आपल्या सर्वांसाठी बोलते. (प्रकटीकरण ७:९-१०)
४० दिवसांची बायबल वाचन योजना
२ करिंथ २-७
अंगीकार
[पुढील प्रार्थना अस्त्र पूर्ण केल्याशिवाय पुढे जाऊ नका.प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा.]
१. छळ व भीतीच्या सर्व आत्म्यांना मी धमकावतो व काढून टाकतो कारण येशू ख्रिस्ताच्या रक्ता द्वारे मला शांति आहे. (कलस्सै १:२०)
२. माझ्या विरुद्ध, माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध, व करुणासदन सेवाकार्याच्या विरुद्ध प्रत्येक दुष्ट वाणीजी बोलत आहे ती येशू ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ता द्वारे कायमची शांत केली जावी.
३. असे होवो, कीयेशूच्यारक्ताने माझ्या जीवनात व माझ्या शेवटच्या मुक्कामासाठी आता उत्तम गोष्टी बोलावे.
४. असे होवो कीयेशूच्यारक्तानेमाझ्या जीवनात विजय व संपन्नता बोलावे.
५.माझ्या विरुद्ध व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांविरुद्ध प्रत्येक दुष्ट हात जे लिहित आहे ते येशूच्या रक्ता द्वारे पुसून टाकले जावो.
६. माझे सर्व वित्तीयता, दस्तावेज, संपत्ति व मालमत्तेवर मी येशूचे रक्त शिंपडतो.
७. प्रभु येशू ख्रिस्ताच्या रक्ताची सीमारेषा मी माझी सर्व मालमत्ता व संपत्ति भोवती येशूच्या नांवात ओढत आहे.
८. असे होवो की जे सर्व दरवाजे मी शत्रू साठी उघडे केले होते ते येशूच्या रक्ता द्वारे कायमचे बंद केले जावे.
९.आध्यात्मिक व शारीरिक अपघात, विनाश व शोकांतिकेच्या विरुद्ध येशूच्या रक्ता द्वारे मी दैवी विमा घेतो.
१०. काही वेळ परमेश्वराची उपासना करा.येशूच्या
Join our WhatsApp Channel
Most Read
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य● उदारपणाचा सापळा
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३
● दिवस ०६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – १
● कर्जामधून बाहेर या: किल्ली# १
● देवाच्या प्रकारची प्रीति
टिप्पण्या