तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभुजी, वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र ह्यांस धमकाविले आणि अगदी निवांत झाले. (मत्तय ८:२५-२६)
मला एक लहान भाचा होता (अर्थातच तो आता मोठा झाला आहे). जेव्हा तो लहान मुलगा होता, मी हळूच त्यास थोडेसे वर हवेत भिरकावीत असे. पहिल्या वेळेला कदाचित भीतीमुळे तो खूपच रडला. दुसऱ्या वेळेला त्याने खदखदा हसण्यास सुरु केले, आणि त्यानंतर लवकरच, तो विनोदाने हसत असे. त्यास ते खूपच आवडत असे. जेव्हा मी माझ्या खोली मध्ये कामात मग्न असे, तो मला शोधत येत असे व त्याच्या बालिश भाषेत मला दाखवीत असे की मला हवेत फेकण्याद्वारे माझ्याबरोबर खेळ.
माझा लहान भाचा मला समजला की खरेच मी कोण व माझा हेतू काय आहे जेव्हा त्याने भयाला काढून टाकले व माझ्यावर विश्वास ठेवू लागला. तसेच काय ते आपल्या जीवनात घडते. ख्रिस्ती म्हणून, आपण समजतो की परमेश्वर आपला पिता आहे परंतु आपल्याला हा "भाववाचक विश्वास" आहे की येथे असे काहीही नाही जे मनुष्य करू शकत नाही. तथापि, जीवनाच्या खऱ्या परिस्थितींना जेव्हा आपण तोंड देतो, आपण भय व दहशतीला आपल्यावर वर्चस्व करू देतो. हे मग ज्या प्रत्येक परिस्थिती मध्ये आपण आहोत त्यातून परमेश्वर जे करण्याचा प्रयत्न करीत आहे ते पाहण्यापासून ते आपल्याला अडथळा करते.
येथे भय व शंका मध्ये नेहमीच संबंध आहे आणि ते दोन्हीही एकमेकांना मार्गदर्शन करतात. एक मनुष्य जो शंका घेतो तो भीति मध्ये असेल व भीति मध्ये असलेला मनुष्य शंका घेईल!
बायबल म्हणते, "कारण पुन्हा भीति बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही; तर ज्याच्या योगे आपण अब्बा, बापा, अशी हांक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे" (रोम ८:१५). तुम्ही हे पाहिले काय? परमेश्वराने आपली अशी रचना केली नाही की संकटाच्या समयी आपण भीति व लटपटणे प्रदर्शित करावे परंतु, त्याऐवजी तो त्याचा आत्मा आपल्यात घालतो, की त्याच्यामधील आपला विश्वास कदाचित आपल्याला हे समजण्यास साहाय्य करेल की आता आपल्याला देवाच्या कुटुंबात दत्तक असे घेतले गेले आहे.
हा मग एक वर्चस्व आणणारा प्रभाव होतो तो मग आपल्याला त्याचे सामर्थ्य व योग्यते वर पूर्णपणे अवलंबून राहण्यात हाक मारण्याकडे नेतो: अब्बा, पिता. विश्वास व भय ख्रिस्ती जीवनात एकाच वेळी अस्तित्वात नाही राहिले पाहिजे. आपल्याला देवा वर पूर्णपणे अवलंबून राहण्यात भरंवसा ठेवला पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा की जीवनाने आपल्याला ज्याही ठिकाणी आणले असेल त्यामध्ये आपल्याला साहाय्य करावे. आपण विश्वासाद्वारे हे जाणले पाहिजे की: जर परमेश्वराने आपल्याला येथपर्यंत आणले आहे, तो मग त्यातून आपल्याला नेईल.
शेवटी, मार्क ४:४० मध्ये ख्रिस्ताने म्हटले की, "....तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हांला विश्वास कसा नाही?" भय हीच केवळ एक गोष्ट आहे जी ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातून विश्वासाला काढून टाकते. आज पूर्ण भरंवसा व समर्पणा मध्ये येशूच्या मागे चालण्याचा निर्णय घ्या, देवाचे वचन व त्याच्या आश्वासनांमध्ये विश्वास ठेवण्यापासून भीतीला तुम्हांस रोखू देऊ नका.
प्रार्थना
पिता परमेश्वरा, मी कोणत्या परिस्थितीत आहे याची पर्वा न करता तुझ्यावर भरंवसा ठेवण्यास मला साहाय्य कर. जेव्हाकेव्हा सैतान मला भिण्यास कारण देतो, मला स्मरण दे की मी तुझा आहे की माझा विश्वास तुझ्यामध्ये बळकट व्हावा. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● भविष्यात्मक मध्यस्थी काय आहे?● त्याच्या ध्वनिलहरींच्या कंपनासह लयबद्ध होणे
● छाटण्याचा समय– २
● ख्रिस्ता समान होणे
● तुम्हांला एकासदुपदेशकाची का गरज लागते
● दुसऱ्यावर दोष लावणे
● दिवस १६ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या