बायबल १ करिंथ १४: ३३ मध्ये म्हणते, "कारण देव अव्यवस्था माजविणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे." संभ्रम काय आहे? संभ्रम हे दैवी व्यवस्थेचा अभाव आहे. आज अनेक घरे, कुटुंबे,संस्था, व्यवसाय, चर्च, प्रार्थना गट यांवर संभ्रम, द्वेष आणि विभाजनच्या आत्म्याने आक्रमण केलेले आहे.
अशा गोंधळासाठी कारण काय आहे?
एकच कारण कीगोष्टींच्या दैवी व्यवस्थेचा अभाव आहे. सर्वत्र, तुम्हीं पाहता, लोक हे अत्यंत तणावात आणि निराश आहेत.
पुन्हा,त्यांच्या जीवनात दैवी व्यवस्थेचा अभाव हेच कारण आहे.
त्याकाळी हिज्कीया हा आजारी पडला आणि मरावयास टेकला होता तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याजकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निरवानिरव कर, कारण आता तूं मरणार, जगणार नाहीस." (यशया ३८: १)
देवाने हिज्कीयाला म्हटले त्याचे घराणे हे व्यवस्थेत नाहीआणि हेच ते कारण होते की तो आता जगणार नाही तर मरणार आहे. देवाचे लोक, जेव्हा आपले जीवन हे दैवी पद्धतीनुसार (देवाची इच्छा) स्थित नसते, तेव्हा आपण केवळ मृत्यूच आणि पराभव हा सर्वत्र पाहू. मला ते स्पष्ट करू दया.
त्या दिवसांत शिष्यांची संख्या वाढत चालली असतां हेल्लेणी (हेल्लेणीयहूदी हे होते जे ग्रीक भाषा बोलत होते) यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरु झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. (प्रेषित ६: १)
प्रारंभीच्या चर्च मध्ये, तेथे दररोजच्या भोजन वाटपा मध्ये समस्या निर्माण झाली ज्याने मोठा संभ्रम आणि द्वेष निर्माण झाला. प्रेषितदेवाच्या आत्म्याद्वारे मार्गदर्शन घेऊन त्यांनी सात सेवकांची निवड केली की ह्या कामावर देखरेख करावी आणि ते स्वतः प्रार्थना आणि वचनाच्या सेवेसाठी समर्पित राहिले.
प्रेषित ६:७ म्हणते, "मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली;
याजकवर्गातीलही पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली."
अर्थातच, तेथे अनेक इतर घटक हे त्यात सामाविलेले होते ज्याने यरुशलेम मधीलचर्च मध्ये वाढ केली. परंतु हे नाकारू शकत नाही, सर्व काही व्यवस्थित करण्यामुळे चर्च ची वाढ झाली.
तुमच्या प्राथमिकतेवर कार्य करा. येथे मग तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात दैवी व्यवस्था कार्यरत होईल.
प्रार्थना
पित्या, मलातुझे दैवी ज्ञान आणि समज दे की योग्यवेळी योग्य कार्य करावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आशीर्वादाचे सामर्थ्य● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे
● दिवस ०८:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका
● तुमच्या नोकरी संबंधी एक रहस्य
● देण्याने वाढ होते - 1
टिप्पण्या