english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दिवस ०४: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
डेली मन्ना

दिवस ०४: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना

Thursday, 14th of December 2023
46 38 993
Categories : उपास व प्रार्थना
चांगल्या गोष्टींची पुनर्स्थापना

“ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दु:खाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली.” (ईयोब ४२:१०)


पुनर्स्थापना, जगाच्या सामान्य भाषेत, काहीतरी उलट करण्याच्या प्रक्रियेस संबोधते जे जुने झाले आहे, झिजले आहे, जीर्ण झाले आहे किंवा जसे पूर्वी होते तसे मोडके झाले आहे. तथापि, पुनर्स्थापना, देवाच्या वचनानुसार, हे जगिक पुनर्स्थापनेपासून भिन्न आहे. बायबलनुसार, “पुनर्स्थापना” हा शब्द काहीतरी त्याच्या पूर्वीच्या अवस्थेत पुनर्स्थापित करण्याच्या प्रक्रियेला संबोधते परंतु त्यामध्ये अशा प्रकारे सुधारणा करते की ते पूर्वीपेक्षा अधिक उत्तम असे दिसते.


ईयोबाच्या कथेपेक्षा दुसरे काहीही इतके स्पष्ट नाही. ईयोब ४२:१२ म्हणते, “ परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले.”


जे काही शत्रूने चोरले आहे,- मग ते तुमचे आरोग्य, तुमची आर्थिक सुरक्षितता, तुमच्या मनाची शांती किंवा इतर काहीही जे तुम्हाला अति प्रिय होते असे काहीही असो-देव त्याला पुनर्स्थापित करण्याचे वचन देतो. शत्रू काय म्हणतो त्याची पर्वा नाही, प्रभू येशूकडे अंतिम बोलणे असेल कारण पुनर्स्थापित केले जावे हीच तुमच्यासाठी देवाची इच्छा आहे.


आध्यात्मिक तत्वांनुसार जे देवाने मांडले आहे, जेव्हा चोर पकडला जातो, तेव्हा त्याने आपल्याकडून जे घेतले आहे ते त्याला सात पट देण्याची आवश्यकता असते (नीतीसूत्रे ६:३१ वाचा). चोर या हेतूने येतो की चोरावे, हिरावून घ्यावे आणि नष्ट करावे परंतु देव त्या मुद्द्यापर्यंत पूर्ण पुनर्स्थापना करतो जेथे आपली जीवने काठोकाठ भरली जातात. ते पूर्वी होते त्यापेक्षा सर्वकाही उत्तम असे करतो.

सैतान विश्वासणाऱ्याकडून हिरावून घेऊ शकतो का?

होय. सैतान परवानगीने कार्य करतो. प्रवेशावाचून तो विश्वासणाऱ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही (इफिस. ४:२७). सैतान विश्वासणाऱ्याकडून हिरावून घेऊ शकतो याचे येथे काही प्रकार आहेत.


१. दैवी उपदेशाची अवज्ञा करणे

अवज्ञा आपल्या आध्यात्मिक शस्त्रामध्ये पोकळी निर्माण करते, ते आपल्याला सैतानाच्या योजनांसाठी दुर्बळ करते. हे तुमचा दरवाजा खोलून ठेवणे, अनिच्छुक पाहुण्यांना आमंत्रित करण्यासारखे आहे. देवाची आज्ञा पाळणे, दुसऱ्या बाजूने, हे ढालीप्रमाणे आहे, जे सुरक्षितता प्रदान करते आणि आपल्याला त्याचे मार्गदर्शन आणि आशीर्वादात ठेवते.

सैतानाने आदामाला देवाची आज्ञा मोडण्यास प्रवृत्त करण्याद्वारे पृथ्वीवरील त्याचा अधिकार हिरावून घेतला. १ शमुवेल १५:२२ आपल्याला सांगते, “परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय?” हे वचन कोणत्याही प्रकारच्या विधीपूर्वक भक्तीपेक्षा देवाच्या वचनाचे पालन करण्यावर जोर देते.


२. चुकीचे विचार

आपले विचार हे आपल्या कृतींची रूपरेखा आहेत. जेव्हा ते देवाच्या सत्याशी समरूप नाहीत, तेव्हा ते आपल्याला विनाशाच्या मार्गाकडे नेऊ शकतात. सैतान हा नेहमी शंका, भीती आणि नकारात्मकतेचे बीज पेरतो, आणि जर त्यांना तपासले नाहीत तर ते हानिकारक कृतीमध्ये वाढू शकतात.

तुम्ही त्या कल्पना, विचार आणि ज्ञानाला काढून टाकले पाहिजे जे देवाच्या वचनाच्या विरोधात आहेत (२ करिंथ. १०:५). जेव्हा लोक चुकीच्या गोष्टींबद्दल विचार करतात, तेव्हा ते त्यांची कबुली आणि कृत्यांवर प्रभाव करते.

फिलिप्पै. ४:८ आपल्याला उपदेश देते की आपले विचार कसे आणि कशावर केंद्रित केले पाहिजे. “बंधुंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.”


३. चुकीची कबुली

आपल्या वास्तविकतेला आकार देण्याची शब्दांमध्ये शक्ती आहे. नकारात्मक कबुली नकारात्मक परिणामास आकर्षित करू शकतात, ज्याप्रमाणे सकारात्मक घोषणा सकारात्मक परिणामांकडे नेऊ शकतात. सैतान आपल्याविरुद्ध कार्य करण्यासाठी आपल्या स्वतःच्याच शब्दांचा वापर करतो, आपली भीती आणि शंकेला वास्तविकतेमध्ये बदलतो.

देवाला शाप देण्यासाठी सैतानाने ईयोबाला चुकीच्या गोष्टी बोलाव्या म्हणून प्रयत्न केले, पण ईयोबाने नकार दिला. “तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस.” (नीतीसूत्रे ६:२)

याकोब ३:१० आपल्याला शब्दांची शक्ती आणि त्यांना शहाणपणाने उपयोगात आणण्याच्या आवश्यकतेविषयी स्मरण देते. “एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात, माझ्या बंधुंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नये.”


४. चुकीची संगती

जेव्हा देवाला तुम्हांला आशीर्वाद द्यावयाचा असतो, तेव्हा तो एक पुरुष किंवा एका स्त्रीला पाठवतो. जेव्हा सैतानाला तुमचा नाश करायचा असतो तेव्हा तो एक पुरुष किंवा एका स्त्रीला पाठवतो. असे म्हणण्याचा माझा अर्थ काय आहे की तुम्ही ज्यांना मित्र बनवता आणि ज्यांच्या संगतीत तुम्ही राहता त्याबद्दल सावधगिरी बाळगा. चुकीच्या संगतीमुळे पुष्कळ जनांनी चांगल्या गोष्टी गमावल्या आहेत.

फसविले जाणे किंवा चुकीने मार्गदर्शन होऊ देऊ नका. वाईट संगती (संगती, संबंध) चांगले शिष्टाचार आणि नैतिक आणि चारित्र्य भ्रष्ट करते. (१ करिंथ. १५:३३)

अडथळे, नुकसान, त्रास, चुका, हानी ज्यांचा तुम्ही अनुभव केला आहे तसे असतानाही पुनर्स्थापना शक्य आहे. सैतान पुष्कळ गोष्टी काढून घेऊ शकतो पण सर्वकाही पुनर्स्थापित करावे हे देवाचे वचन आहे, आणि सर्वकाही पुनर्स्थापित करण्यास तो सक्षम आहे.
प्रार्थना
तुमच्या मनातून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच मग पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. (ते वारंवार करा, त्यास वैयक्तिक करा आणि कमीत कमी १ मिनिटासाठी तसे प्रत्येक प्रार्थना मुद्द्याबरोबर करा.) 

१. पित्या, येशूच्या नावाने माझ्या जीवनात चांगल्या गोष्टींची सर्वत्र पुनर्स्थापना होऊ दे. (योएल २:२५)

२. माझ्या जीवनाच्या विरोधात कार्य करणाऱ्या आध्यात्मिक लुटारू आणि बिघडवणाऱ्यांना मी येशूच्या नावाने हताश करत आणि संपवून टाकत आहे. (यशया ५४:१७)

३. माझ्या जीवनात चांगल्या गोष्टींचा नाश करणाऱ्या सैतानी एजंटांच्या कार्याला येशूच्या नावाने मी पक्षघाती करत आहे. (लूक. १०:१९)

४. हे परमेश्वरा, माझे सर्व गमावलेले आशीर्वाद, नशीब आणि गुणधर्मांच्या साहाय्यकांना कृपा करून येशूच्या नावाने पुनर्स्थापित कर.

५. पित्या, माझे शरीर आणि जीवनात जी काही हानी झाली आहे ती येशूच्या नावाने दुरुस्त कर. (यिर्मया ३०:१७)

६. गमावलेल्या सर्व आशीर्वादांना चिकाटीने, प्रभुत्व करून पुन्हा प्राप्त करण्यासाठी येशूच्या नावाने मला समर्थ कर. (१ शमुवेल ३०:१९)

७. आशिर्वादांचे बंद झालेले प्रत्येक दार येशूच्या नावाने पुन्हा उघडले जावे. (प्रकटीकरण ३:८)

८. पित्या, नशिबाचे साहाय्यक जे माझ्यापासून वेगळे झाले आहेत त्यांना येशूच्या नावाने माझ्याशी पुन्हा संबंधात आण. (रोम. ८:२८)

९. माझ्या जीवनात संपत्ती, आशीर्वाद आणि गौरवाची सात पट पुनर्स्थापना व्हावी म्हणून मी येशूच्या नावाने आदेश देत आहे. (नीतीसूत्रे ६:३१)

१०. पित्या, तुझ्या पवित्रस्थानातून येशूच्या नावाने मला साहाय्य पाठव. (स्तोत्र. २०:२)

११. परमेश्वरा शत्रूच्या फसवणुकीपासून मला संरक्षण दे आणि तुझ्या सत्याने माझ्या अंत:करणाला प्रज्वलित कर जेणेकरून मी सैतानाच्या धूर्तपणाच्या विरोधात स्थिर उभा राहू शकेन. येशूच्या नावाने. (इफिस. ६:११)

१२. स्वर्गीय पित्या, बंधनाच्या प्रत्येक साखळ्या मोडून टाक आणि आध्यात्मिक बंधनाच्या कोणत्याही प्रकारातून मला स्वतंत्र कर. येशूच्या नावाने, तुझे स्वातंत्र्य माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात राज्य करावे असे होऊ दे. (यशया ५८:६)

Join our WhatsApp Channel


Most Read
● देव पुरस्कार देणारा आहे
● विश्वासाद्वारे कृपा प्राप्त करणे
● दिवस १९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● त्याचे दैवी दुरुस्तीचे दुकान
● संपन्नतेसाठी विसरलेली किल्ली
● खोटे बोलणे सोडणे आणि सत्य स्वीकारणे
● सुटकेचा दिवस (दिवस १०)
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन