येशूने उत्तर दिले आणि तिला (शोमरोनी स्त्री ला)म्हटले, "जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही;
जे पाणी मी त्याला देईन तें त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून तें पाणी मला दया.
तो तिला म्हणाला, तूं जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तूं खरे सांगितलेस. (योहान ४:१३-१८)
माध्यमे अक्षरशः आपल्याकडे ओरड करते की आपले लक्ष त्याकडे दयावे ते आपल्याला हे सांगते कीआपण तेव्हाच आनंदी आणि समाधानी असू शकतो जेव्हा आपल्याकडे ह्या नवीनतम स्मार्टफोन, ही चांगली कार,ही वय-लपविणारी सौदर्य साधने वगैरे असतील. विषयाबाबत सत्य हे की साधने ही व्यक्तीला कधीही समाधानी करणार नाहीत. कोणीतरी एकदा म्हटले आहे, "ज्यांस थोडे हे पुरेसे नाही, त्यास काहीही पुरेसे नाही."
वरील वचनांमध्ये, बायबल आपल्याला एका स्त्री विषयी सांगते जिला पाच नवरे होते आणि आता आणखी एका मनुष्या बरोबर राहत होती. हे स्पष्ट आहे की, ही स्त्री इच्छा पूर्ण करण्यासाठी जगत होती जी समाधानी नव्हती.समाधानी आणि आनंदी होणे याच्या शोधाने तिला एका मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे नेले तरी ती समाधानी झाली नाही.
प्रभु येशूने भविष्यात्मक तिला हे ध्यानात आणून दिले कीतिलाएका नवीन नवऱ्याची (किंवा दुसरा मनुष्य) गरज नाही तर एका नवीन जीवनाची आहे आणि तो त्या नवीन जीवनाचा स्त्रोत आहे.
ह्या स्त्री प्रमाणे, अनेक हे अनुभवाकडून अनुभव घेत राहतात, आणि पुढे जात राहतात, ही आशा ठेवून की ते आपल्याला अधिक-इच्छित समाधान देईल. आम्ही फारच उत्सुकतेने आशा करीत राहतोकी पुढील संबंध, पुढील नोकरी, नवीन घर, आजचेआधुनिक स्मार्टफोन हे आपल्याला अधिक-इच्छित समाधान देतील.
खरे समाधान हे वस्तू किंवा लोक यामध्ये नाही परंतु स्वतः देवाबरोबच्याकधीही न संपणाऱ्या संबंधात आहे. परमेश्वरसंपत्तीचा धिक्कार करीत नाही. त्यास पाहिजे की आपण संपन्न व्हावे परंतु त्यास हे सुद्धा पाहिजे की आपण सावधान राहावे जर आपण संपत्तीचा खरा उद्देश समजला नाही, तर ते आपल्याला त्याच्यापासून सामर्थ्यशाली रुपात दूर करू शकते. पैशा वरील प्रेम आपल्याला समाधानी करीत नाही परंतु परमेश्वरावर प्रीति करणे हे अवश्य समाधान आणते ज्याचे मानवी शब्दात वर्णनकरू शकत नाही.
अनेक वेळेला आपले असमाधान ह्या वास्ताविकते मधून निर्माण होत नाही की आपल्याला अधिक पाहिजे परंतु हे की आपल्याला इतरांपेक्षा अधिक पाहिजे ह्यामुळे होते. ही स्पर्धात्मक वृत्ती जी आपल्या असमाधानाचे मूळ आहे. ह्यावर मात करण्यासाठी,देवाला सतत धन्यवाद देण्याची वृत्ती जोपासण्याची आपल्याला गरज आहे.
आधुनिक आणिउत्तम यामधील चढाओढ नक्कीच आपल्याला निराश करते आणि तणाव आणते. आपण नेहमी विचार करतो आपल्याला काय गरज आहे ते आपल्याला माहीत आहे परंतु देवाला उत्तम ते ठाऊक आहे. जोपर्यंत आपण हे ओळखत नाही की काहीही आपल्याला समाधान देऊ शकत नाही परंतु केवळ देवच ते देऊ शकतो, आपणअसमाधानाची भीती आणि भावनेसह सतत गुरफटलेले राहू.
परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत; कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले; भुकेल्या जिवास उत्तम पदार्थांनी संतुष्ट केले. (स्तोत्रसंहिता १०७: ८-९)
येथे ते आहे जे आपल्याला दररोज करण्याची गरज आहे. काही सौम्य संगीत लावा आणि सर्वात प्रथम गोष्ट की परमेश्वराबरोबर दररोज चांगला वेळ घालवा. तुमच्या इच्छा शुध्द करण्यासाठी त्यास मागा. त्याचीशांति आणि उपस्थितीने तुमचा जीव समाधानी होईल. तोच स्मार्टफोन वापरा की देवाचे वचन जितक्या वेळा तुम्ही वाचू शकता तितक्या वेळा वाचा.
जेव्हा तुम्ही परमेश्वराबरोबर तुमचे संबंध घनिष्ठ करता, तुमच्या समाधानाची शास्वती मिळेल.
प्रार्थना
स्वर्गातील पित्या, मला पाहिजे की तूं आणि केवळ तुझ्याद्वारेच भरले जावे. जसे हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. मला कोठोकाठ भर.
परमेश्वरा, तूं माझा मेंढपाळ आहेस. मला काहीही उणे पडणार नाही. तूं मला स्वर्गातील दव आणि पृथ्वीवरील विपुलतेनुसार समाधानी करेन. येशूच्या नांवात. आमेन.
परमेश्वरा, तूं माझा मेंढपाळ आहेस. मला काहीही उणे पडणार नाही. तूं मला स्वर्गातील दव आणि पृथ्वीवरील विपुलतेनुसार समाधानी करेन. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा संघर्ष तुमची ओळख होऊ देऊ नका -१● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● युद्धासाठी प्रशिक्षण
● तुम्ही किती विश्वसनीय आहात?
● २१ दिवस उपवासः दिवस १७
● दिवस १८ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● बीभत्सपणा
टिप्पण्या