बहाणे हे समस्यांपासू बाहेर जाण्याचा केवळ एक मार्ग आहे -ते आपल्या अधोरेखित वृत्ती आणि प्राथमिकतांना प्रकट करतात. भाग 1-मध्ये समस्यांमधून बाहेर पडणे किंवा वैयक्तिक समस्यांचा नकार करण्याबद्दल लोक कसे बहाणे करतात त्याबद्दल आपण स्पष्टपणे पाहिले आहे.
त्यामध्येच पुढे, आपण बहाणे का करतो त्याविषयी आणखी दोन कारणांकडे पाहणार आहोत.
1. जबाबदारी टाळण्यासाठी आणि
2. जे करण्याची आपली इच्छा नाही ते करत राहावे
ही वृत्ती मानवी स्वभावात खोलवर रुजलेली आहे, परंतु त्यावर मात करण्यासाठी बायबल सामर्थ्यशाली शिकवण देते.
क.जबाबदारीतून बाहेर पडणे (टाळणे)
लोक बहाणे करतात त्याचे एक सर्वात सामान्य कारण हे जबाबदारी टाळणे आहे. आपल्या सर्वांना भावना माहित आहेत- जबाबदारी कठीण असू शकते आणि अपयशाची किंवा अपुरेपणाची भीती आपल्याला ती पूर्णपणे टाळण्यास प्रवृत्त करते. अशा प्रकारच्या टाळण्याबद्दल मोशेचे जीवन प्रेरणादायी उदाहरण देते.
मोशे : अनिच्छुक पुढारी
मोशेचे पालनपोषण विलक्षण असे होते. त्याला एक बाळ म्हणून मारण्यापासून वाचवण्यात आले, फारोच्या राजवाड्यात मोठा झाला आणि मिसर देशात दिले जाणाऱ्या उत्तम शिक्षण आणि संसाधनांद्वारे आशीर्वादित झाला. तरीही, जेव्हा देवाने इस्राएलला मिसर देशातून काढण्यासाठी मोशेला बोलावले, तेव्हा बहाणे करण्यास तो तत्पर होता.
निर्गम ३:१०मध्ये देवाने मोशेला म्हटले, “तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्राएलवंशज ह्यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो.” हा नियतीचा मोशेचा क्षण होता, उद्देश पूर्ण करण्याची वेळ होती ज्यासाठी देवाने त्याला तयार केले होते. परंतु तयार होण्याऐवजी, मोशेने बहाण्यांच्या शृंखलेने ते टाळण्याचा प्रयत्न केला :
- “मी सक्षम नाही, मला ते कौशल्ये नाहीत.”- “फारोकडे जाऊन इस्राएलवंशजांना मिसारातून काढून आणणारा अस मी कोण? (निर्गम 3:11)
- “ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत.’- “पण ते माझा विश्वास धरणार नाहीत, माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेच नाही.” (निर्गम ४:1)
- “मी चांगला बोलणारा नाही.”-हे प्रभू मी बोलका नाही’ पूर्वीही नव्हतो; व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे.” (निर्गम ४:10)
- “इतर कोणीतरी हे करू शकते” – “हे प्रभू तुझ्या मर्जीस येईल त्याच्या हस्ते त्यांना संदेश पाठव.” (निर्गम ४:१३)
मोशे त्याच्यासमोरच्या कार्याची प्रचंडता पाहून भारावून गेला होता. त्याचे बहाणे स्वतःवर संशय आणि अपयशाची भीतीमध्ये मुळावलेले होते. तथापि, हे बहाणे देवाला आवडले नाहीत. निर्गम ४:१४मध्ये आपण वाचतो, “मग मोशेवर परमेश्वराचा राग भडकला’... . मोशेला ज्या सर्वांची गरज होती त्याद्वारे देवाने त्याला सज्ज केले होते, परंतु जबाबदारी स्वीकारण्याच्या मोशेच्या अनिच्छुकतेने देवाला राग आला.
जर मोशे तसेच बहाणे करीत राहिला असता, तर तो त्याच्या नियतीला चुकला असता. त्याऐवजी, त्याने शेवटी त्याची जबाबदारी स्वीकारली, इस्राएलास मिसर देशातून बाहेर आणण्यास आणि स्वतंत्र होण्यासाठी नेतृत्व केले.
ड. आपल्याला जे करण्याची इच्छा नाही तेच करत राहणे
आणखी एक कारण लोक बहाणे करतात हे सरळपणे जे त्यांना करण्याची इच्छा नाही ते करत राहण्यास टाळणे आहे. असे टाळणे हे प्राथमिकतेमध्ये चुकण्याचे किंवा समर्पणाच्या अभावाचे चिन्ह आहे. बहाण्यांबद्दल एका सामर्थ्यशाली दाखल्यामध्ये प्रभू येशू या विषयावर विचार व्यक्त करत आहे.
मोठ्या मेजवानीचा दाखला
लूक १४:१६-२०मध्ये, येशू एका माणसाची कथा सांगत आहे ज्याने मोठी मेजवानी तयार केली आणि पुष्कळ पाहुण्यांना आमंत्रित केले. तथापि, जेव्हा मेजवानीची वेळ आली, तेव्हा आमंत्रित पाहुणे बहाणे करू लागले :
- मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे – परंतु ते सर्व बहाणे करू लागले, “मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.” (लूक १४:१८)
- “मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, मी त्यांची तपासणी करण्यास जात आहे” – दुसरा म्हणाला, “मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासायला जातो, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.” (लूक १४:१९)
- “मला एक विवाहित पत्नी आहे, म्हणून मी येऊ शकत नाही” – “मी लग्न केले आहे, म्हणून माझे येणे होत नाही. (लूक १४:२०)
ह्या व्यक्तींना मोठ्या मेजवानीला वैयक्तिक आमंत्रण मिळाले होते, तरीही त्यांनी आमंत्रणाऐवजी त्यांच्या स्वतःच्या आवडींना प्राधान्य देण्याचे निवडले होते. हे बहाणे प्रकट करतात की, खोलवर, त्यांना केवळ सहभागी होण्याची इच्छा नव्हती. शेत, बैल आणि नवीन लग्न देखील आमंत्रणाची जबाबदारी टाळण्यासाठी केवळ सोयीस्कर कारणे होती.
हा दाखला एक सामर्थ्यशाली सत्य प्रकट करतो : जेव्हा आपण काहीतरी करण्यास टाळण्यासाठी बहाणे करतो, तेव्हा हे सहसा देवाच्या इच्छेशी समरूप करण्याची खोल अनिच्छा दर्शवते. आमंत्रित पाहुण्यांना मेजवानीला हजर राहण्याची सर्व संधी होती, परंतु त्यांनी तसे न करण्याची निवड केली, ज्यामुळे त्यांच्या समर्पणाच्या आणि इच्छेच्या अभावाला उघड केले.
तर, मग उपाय काय आहे? याची सुरुवात आत्म-चिंतनाने होते. जबाबदारी टाळण्यासाठी किंवा आपण करू इच्छित नाही असे काहीतरी चुकवण्यासाठी आपण बहाणे करीत आहोत का? जर तसे आहे, तर आपण थांबले पाहिजे, आणि आपल्या कृत्यांविषयी पुनः विचार केला पाहिजे. बहाणे करण्याऐवजी, आपण आपल्या जबाबदारीला स्वीकारले पाहिजे आणि आपल्या इच्छेला देवाच्या इच्छेशी समरूप केले पाहिजे.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तू आम्हाला सोपविलेल्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या आणि बहाणे बाजूला काढण्यासाठी आम्हाला मदत कर. आमची अंत:करणे तुझ्या इच्छेशी समरूप कर आणि जेथे तू आम्हाला मार्गदर्शन करत आहे त्याचे अनुसरण करण्यासाठी तुझ्या शक्तीमध्ये भरवसा ठेवण्यासाठी आम्हाला धैर्य दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस ०२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे● राज्यात नम्रता आणि सन्मान
● महानतेचे बीज
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 2
● मान्ना, पाट्या आणि काठी
● अडथळ्यांची भिंत
● २१ दिवस उपवासः दिवस १२
टिप्पण्या