डेली मन्ना
चिंते वर वर्चस्व मिळविण्यासाठी, ह्या गोष्टींवर विचार करा
Saturday, 27th of July 2024
28
25
558
जेव्हा तुम्ही तुमच्या मनात अनेक गोष्टी ठेवता तेव्हा ते महत्वाचे असते. मनुष्याचे मन हे चुंबकीय दाबा सारखे असू शकते. ते गोष्टींना आकर्षित करते व ते जतन करून ठेवते. तुम्ही कधी कोणते पुस्तक वाचले आहे काय ज्याने तुमच्या मनावर पकड घेतली होती, चित्रपट जे तुम्ही पाहिले ज्याने तुमच्या मनावर छाप पाडली होती? मन हे इतके सामर्थ्यशाली असू शकते की जी माहिती त्याच्याकडे येते ती ते स्मरणात ठेवते.
एक विश्वासणारे म्हणून विचार जे तुम्ही तुमच्या मनात टाकता ते तुमच्या ख्रिस्ती म्हणून जगण्यास महत्वाचे आहेत. जग त्याच्या स्वतःच्या विचारांच्या पद्धती देते, ज्याचा तुम्हाला नकार केला पाहिजे. बातम्या माध्यम स्वतःहून लोकांच्या मनात गोंधळ निर्माण करून ठेवते. जे तुम्ही दररोज पाहता व ऐकता ते कदाचित फारच अपायकारक असू शकते. तथापि, तुम्हांला तुमच्या विचारांची व्यवस्था करणे व त्यावर वर्चस्व करण्याविषयी तुमच्या स्वतःला एकटेच विचार करण्यास सोडलेले नाही.
मनुष्य दुसऱ्यास हेतूपूर्वक दु:ख देण्याची निवड करण्याअगोदर, ज्याप्रकारचे विचार त्याच्या समोर आले असतील ते कधीही प्रीतीचे विचार असू शकणार नाहीत. त्याप्रमाणेच, तुमचे विचार तुमच्या कृतींवर नियंत्रण करते, आणि प्रेषित पौल आपल्याला उपदेश देतो की, आपण आपले विचार कशावर केंद्रित केले पाहिजे.
"बंधुंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सदगुण, जी काही स्तुति, त्यांचे मनन करा." (फिलिप्पै ४:८)
फिलिप्पै ४:८ मध्ये जी काही यादी नोंदली आहे ती नकारात्मक असे काहीही दर्शवित नाही. तुम्हांला व मला ह्या गोष्टींवर मनन करण्याचा सल्ला दिला आहे-ज्या काही गोष्टी ज्या सत्य, न्याय्य, शुद्ध, प्रशंसनीय, श्रवणीय आहेत. प्रत्येक विचार हे शुद्ध नाहीत, काही विचार हे दूषित आहेत, आणि ते विभिन्न प्रकारे येऊ शकतात.
हे असे सर्व काही नाही जे पाहण्याची तुम्ही इच्छा करता. हे असे सर्व काही नाही जे पाहण्यास तुम्ही आतूर आहात. तुम्हांला सर्व काही ऐकण्याची गरज नाही. संपूर्ण दिवसभर तुम्हांला बातम्या माध्यमांवर विचार करीत बसण्याची गरज नाही. तुमच्या मनाचे रक्षण करा. भयपूर्ण वृत्तांताने भरलेल्या वाईट बातम्यांनी तुमच्या मनाला भरण्याद्वारे दिवसाची सुरुवात करणे हे चांगले नाही. देवाच्या वचनावर लक्ष केंद्रित करा, वचनावर मनन करा, जर आवश्यक असेल तर फोन द्वारे थोडक्यात एका भक्तिमान बंधु बरोबर वार्तालाप करा.
तुमचे मन ही सर्वात मोठी मालमत्ता आहे, आणि तसेच सर्वात मोठे युद्धाचे ठिकाण आहे. भक्तिमान चारित्र्य विकसित करण्यासाठी, मनाला देवाच्या वचनाद्वारे सतत नवीन केले पाहिजे. रोम १२:२ म्हणते, "देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया." ज्यावर तुम्ही सतत विचार करता व ज्यावर सतत मनन करता त्यानुसार कृती करा. जगाबरोबर समरूपता कोणतेही परिवर्तन आणणार नाही कारण ह्या जगाचा देव, सैतान, याने त्यास दूषित केलेले आहे व करीत आहे. त्याऐवजी वचनात समरूप व्हा कारण देवाचे वचन हे सत्य, न्याय्य, शुद्ध, प्रशंसनीय, श्रवणीय अशा गोष्टींच्या विरोधात नाही.
प्रार्थना
पित्या, मी तुला कृपे साठी मागत आहे की माझे विचार हे नेहमीच तुझ्या वचना बरोबर असोत. मी आता तुझ्या इच्छेला समर्पित होत आहे. पित्या तुझा धन्यवाद होवो. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ख्रिस्ता समान होणे● उपास कसा करावा?
● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● अपरिवर्तनीय सत्य
● एक आदर्श व्हा
● दिवस ३४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति
टिप्पण्या