आपणख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण (नवीन जन्मलेले) केलेले असे देवाची (स्वतःची)हस्तकृती (त्याचे कार्य)आहोत, की आपण ती सत्कृत्ये करावी जी देवाने आपल्यासाठी(तो मार्ग घ्यावा जो त्याने वेळेच्या पूर्वी तयार केला)पूर्वी योजून (अगोदरच योजून ठेवलेले)ठेवली की आपण त्यात चालावे (चांगल्या जीवनात राहावे जे त्याने तयार केले आणि आपल्यासाठी सिद्ध केले की आपण त्यात राहावे). (इफिस 2:10 ऐम्प्लीफाईड बायबल)
काळजीपूर्वक वाक्ये लक्षातघ्या, देवाने पूर्वी योजून ठेवले, पूर्वीच योजना केली, वेळे अगोदर तयार केले.
जक्कय ने प्रभु येशूला समोरासमोर पाहण्याची इच्छा केली म्हणून तो पुढे धावत गेला आणि उंबराच्या झाडावर चढला कारण प्रभु तेथून जाणार होता. जेव्हायेशू त्या ठिकाणी आला, त्याने वर पाहिले आणि त्यास म्हटले, जक्कया, खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. (लूक 19:4-5)
तुम्ही पाहा की प्रभूला ठाऊक होते कीएके दिवशी जक्कयाला त्यास पाहण्याचीइच्छा होईल म्हणून त्याने उंबराच्या झाडाला वेळेच्या अगोदर तयार करून ठेवले होते-कदाचित जक्कयचा जन्म होण्याअगोदर सुद्धा.
हे ते दोन शब्द आहेत जे भविष्य वर्णन करण्यासाठी वापरतात.
"नशीब" वर्णन करते भाकीत घटना त्या घडतील मग त्या तुम्हाला पसंत होवो किंवा पसंत ना होवो; ते जीवनात तुमच्या नशीब चा संदर्भ देते. येथे काही मार्ग नाही की तो बदलावा. हेच ते काय जगातील अनेक तत्वज्ञान त्यांच्या अनुयायांना शिकविते.
"नियती" चा अर्थ देवाची योजना तुमच्या चांगल्या जीवनासाठी. जरी अगोदरच योजून ठेवले, तुम्ही तुमच्या नियतीच्या मागे चालण्याचे निवडू शकता किंवा त्यापासून परावृत्त होऊ शकता.
बायबल नशीब शिकवत नाही. याबद्दल विचार करा. जर आपल्याला आपल्या जीवनावरील घटनांवर काहीही प्रभाव नसता, तर मग देवाने आपल्याला सुचनाकशा दिल्या असत्या की संपन्न कसे व्हावे आणि एक महान जीवन जगावे?जर आपले जीवन हे पूर्व नियोजित असते, त्यासुचना ह्या अनावश्यक असत्या.
प्रार्थना मग एक निष्फळ प्रयास असता जर बायबल ने नशीब शिकविले असते. तथापि, प्रभू येशूने शिकविले की विश्वासाची प्रार्थना जीवनातील कोणत्याही मोठया समस्यांचे समाधान करू शकते-कदाचित त्या मार्गांनी नाही ज्याप्रमाणेतो सरकावा असे आपल्याला पाहिजे होते किंवा त्या ठिकाणी तो सरकावा जी आपण इच्छा सुद्धा केली असेन, परंतु तो सरकेल! परमेश्वर आपल्याला समर्थ करेल कीआपण पर्वतावर किंवा त्याभोवती पोहोचावे!
आता याबेस हा त्याच्या भावांपेक्षा अधिक आदरणीय होता आणि त्याच्या आईने त्याचे नाव याबेस असे म्हटले, हे बोलत, "कारण मी त्यास क्लेशाने प्रसवले आहे." आणि याबेस ने इस्राएल च्या परमेश्वराला हेम्हणत हाक मारिली, "तूं माझे खरोखर कल्याण करिशील, माझ्या मुलुखाचा विस्तार वाढविशील आणि मजवर कोणतेही अरिष्ट येऊन मी दु:खी न व्हावे म्हणून तुझा हात माझ्यावर राहील तर किती बरे होईल! त्याने मागितलेला हा वर देवाने त्यास दिला. (1 इतिहास 4:9-10)
याबेस ने त्याचे जीवन दयनीयपरिस्थितीत सुरु केले. तो त्याच्या आई साठी क्लेशा चा स्त्रोत होता. त्याने त्याचे जीवन एका वाईट नावाने सुरु केले. त्याचे भविष्य उज्वल दिसत नव्हते. तो एक करुणास्पद आणि कष्टी जीवन जगत होता.
परंतु त्याने निर्णय केला होता की तो त्याचे उरलेले जीवन अशा करुणास्पद व कष्टी स्थितीत जगणार नाही. त्यास एक चांगले आणि आशीर्वादित जीवन हवे होते. त्यास त्याची नियती बदलावयास पाहिजे होते आणि म्हणून त्याने प्रार्थना केली आणि देवाने त्याची नियती बदलली.
देवाने आपल्यातील प्रत्येकासाठी एक भविष्यात्मक नियती तयार केली आहे (इफिस 2:10) आणि जर आपण त्याचे मार्ग घेतो, आपण आपले चांगले जीवन जगू. तथापि, जरदेवाने निश्चित केलेल्या मार्गावरून आपण दूर गेलो, तरीसुद्धा कोणतेही आणि प्रत्येक अस्तव्यस्त जीवन जे आपण केले आहे त्यातून तो आपल्याला दिशा देऊ शकतो-केवळ एकच गोष्ट होते की तुम्ही तुमच्या जीवनासाठी त्याच्या योजनेला उशीर केला असेन.
आपण स्वतःला जाणतो त्यापेक्षा प्रभू आपल्याला अधिक चांगले जाणतो, मग त्याच्या योजनेबरोबर का स्थिर राहू नये? तुमचे कान उघडे ठेवा आणि मग तो तुम्हाला गौरवाकडून गौरवाकडे आणि विश्वासाकडून विश्वासाकडे नेईल.
प्रार्थना
कोणतेही प्रश्न जे शत्रू वापरीत आहे की माझा प्रगती, यश आणि साक्ष धीमी करावी, ते येशूच्या नांवात काढून टाकण्यात यावेत.
कोणतेही प्रश्न जे शत्रू वापरीत आहे कीमाझे जीवन आणि नियतीला निश्चल असे करावे, तेयेशूच्या नांवात उपटून टाकले जावे.
कोणतेही प्रश्न जे शत्रू वापरीत आहे कीमाझे जीवन आणि नियतीला निश्चल असे करावे, तेयेशूच्या नांवात उपटून टाकले जावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वराला तुमचा बदला घेऊ दया● दिवस ११ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● भविष्यवाणीचा आत्मा
● गौरव आणि सामर्थ्याची भाषा-जीभ
● दिवस २२:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● दिवस १० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● नवीन आध्यात्मिक वस्त्रे परिधान करा
टिप्पण्या