नंतर अलीशा संदेष्ट्याने संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एकास बोलावून सांगितले, कमर बांध आणि ही तेलाची कुपी हाती घेऊन रामोथ-गिलाद येथे जा. तेथे पोहचल्यावर येहू बिन यहोशाफाट बिन निमशी यास शोधून काढ; मग आत जाऊन त्याला त्याच्या भाऊ-बंदातून उठवून आंतल्या खोलीत घेऊन जा. (2 राजे 9:1-2)
येहू हा बायबल मधील एक मनोरंजक चरित्र आहे. तो यशस्वीझाला जेथे इतर हे अपयशी झाले. एलीया हा देवाचा एक सामर्थ्यशाली मनुष्य होता आणि तरीसुद्धा ईजबेल ने एलीयाला खूप वेदना दिल्या. म्हणजे तुम्ही ह्या दुष्ट राणी च्या दुष्टपणाची कल्पना करू शकता. तथापि, देवाने येहू चा उपयोग केला की ह्या दुष्ट राणी ईजबेलचा नाश करावा. म्हणजे तुम्ही येहू वाहून नेणाऱ्या अभिषेकाची कल्पना करू शकता.
मला काही निश्चित सत्य सांगावयाचे आहे जे तुम्हाला देवाबरोबरच्या तुमच्या संगतीत खरेच साहाय्य करेल.
#1"मग आत जाऊन त्याला त्याच्या भाऊ-बंदातून उठव"
संदेष्टा अलीशा त्याच्या एका सेवकास सांगतो की जा आणि येहू चा शोध करा, आणि आत जाऊन त्याला त्याच्या भाऊबंदातून उठवा. आपल्या नियतीच्या मार्गात चालण्याचे पहिले पाऊल हे तेथून उठावे ज्याठिकाणी आपण परिचित असे झाले आहोत-तुमचे समाधानी स्थान.
देवाला पाहिजे की आपला उपयोग करावा की त्याचे गौरव ह्या पिढीला दाखवावे, परंतु त्याअगोदर, आपल्याला त्यास्तरावरून उठावयाचे आहे ज्यात आपण सध्या आहोत. येथे गरज आहे की आपल्याला त्या गोष्टींपासून अलिप्त करावयाचे आहे जे आपल्याला व्यत्यय आणते. जरी येहू पूर्णपणे समजला नाहीकी काय घडत आहे पण त्याने आज्ञा पाळली आणि तो त्याच्या सहकाऱ्यामधून श्रेष्टत्वास उठविला गेला. मी विश्वास ठेवतो, काय आपल्याला वेगळे करते ते आपले पाचारण नाही परंतु पाचारणास आपले प्रत्युत्तर.
# 2"आणि त्याला आंतल्या खोलीत घेऊन जा"
जेव्हा आपण परिचितपणा आणि उदासीनता कडून वर उठतो, तेव्हा मग आपल्याला उघड आमंत्रण आहे की देवाच्या आतील स्थानातचालावे. आतीलस्थान प्रतिनिधित करते जेथे सर्व लोकनिवास करू शकत नाही. हे स्थान हे अगदी देवाचे हृदय आहे.
आतील खोली हे ते स्थान आहे जे व्यत्यय पासून फार दूर आहे. प्रभु येशूने ह्या आतील खोलीच्या अनुभवा बद्दल बोलले आहे हे म्हणत, "तूं जेव्हा जेव्हा प्रार्थना करितोस तेव्हा तेव्हा 'आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन' आपल्या गुप्तवासी पित्याची 'प्रार्थना कर' म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल." (मत्तय 6:6)
जुन्या करारात केवळ मुख्य याजकास परवानगी होती की देवाच्या उपस्थितीच्या आतील खोलीत प्रवेश करावा, "....केवळ वर्षातून एकदाच आणि रक्त घेतल्याशिवाय नाही.." (इब्री 9:7)
नवीन करार आपल्याला सांगतो की ते जे ख्रिस्तामध्ये आहेत त्यांना अभूतपूर्व सौभाग्य आहे की, "...पडद्याच्या आतील भागी निडरपणे प्रवेश करावा जेथे आपला प्रमुख याजक येशूआपल्या वतीने गेला आहे." (इब्री 6:19-20) ते सर्व जे येशूला प्रेम करतात त्यांच्यासाठी आतील खोली ही उघडली जाते.
देवाला पाहिजे की तुम्ही त्याच्या हृदयापर्यंत प्रवेश मिळवावा. जेव्हा तुम्हाला देवाच्या आतील खोली कडे प्रवेश आहे तेव्हा तो तुम्हाला नवीन अभिषेक ने भरेन. तो तुम्हाला एक नवीन नावाने हाक मारील. (प्रकटीकरण 2:17, यशया 62:2)
# 3"मग तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओत व असे बोल, परमेश्वर म्हणतो, तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून मी तुला अभिषेक केला आहे."
लक्षात घ्या ही आतील खोली होती जेथे तेल हे येहू च्या मस्तकावर आले. आतील खोली ही ती आहे जेथे एक नवीन अभिषेक हा तुम्हावर ओतण्यात येईल. तुम्हांला फार नीरस असे वाटते काय, तर मग आतील खोलीत जा, एक नवीन अभिषेक तुमच्यासाठी वाट पाहून आहे.
आतील खोली हे ते स्थान आहे जेथे तुम्ही देवाची वाणी स्पष्टपणे ऐकाल. भविष्यवाणी ही ह्या स्थानात जन्म घेते. येहू ने आतील खोली मध्ये भविष्यवाणी ऐकली.
येहू चे पाचारण हे आतील खोली मध्ये निश्चित झाले. ह्या ठिकाणीच जेथे येहू ने जाणलेकी तो इस्राएल चा राजा होणार आहे. कदाचित तुम्ही निराशा आणि तिरस्कार वगैरे शी संघर्ष करीत असाल, कदाचित तुम्हाला तुमच्या स्वतःची प्रतिमा ही फार खालच्या दर्जाची वाटत असेन. तुम्हाला आतील खोलीत जाण्याची गरज आहे. तुमचे पाचारण हे निश्चित केले जाईल आणि तुम्ही गरुडाच्या पंखावर स्वार होऊनउंच भरारी माराल.
प्रार्थना
1. पित्या, येशूच्या नांवात, माझे ध्येय आणि अंतिम स्थान हे तुझी उपस्थिती न करण्याबद्दल मला क्षमा कर.
2. पित्या, येशूच्या नांवात, येशूच्या मौल्यवान रक्ताने मला पवित्र कर आणि शुद्ध कर जेणेकरून मला दररोज तुझ्या उपस्थिती मध्ये विना अडथळा प्रवेश मिळावा. आमेन.
2. पित्या, येशूच्या नांवात, येशूच्या मौल्यवान रक्ताने मला पवित्र कर आणि शुद्ध कर जेणेकरून मला दररोज तुझ्या उपस्थिती मध्ये विना अडथळा प्रवेश मिळावा. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● इतरांबरोबर शांतीमध्ये राहा● दुष्ट विचार पद्धती विरुद्ध संघर्ष (दिवस 9)
● देवाचे 7 आत्मे: देवाच्या भयाचा आत्मा
● दिवस १५ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● दैवी शांति मध्ये प्रवेश कसा मिळवावा?
● २१ दिवस उपवासः दिवस १८
टिप्पण्या