डेली मन्ना
विश्वास: परमेश्वराला संतोषविण्याचा एक निश्चित मार्ग
Monday, 8th of July 2024
28
23
441
Categories :
विश्वासूपणा
विश्वासावाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाण्याऱ्याने असा विश्वास ठेवला पाहीजे की, तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो. (इब्री ११:६ NLT)
विश्वास हा चिकटवण्याच्या पदार्थाप्रमाणे आहे. हा संपूर्ण देवाचा मार्ग आहे! विश्वासाचा पाया काळजीपूर्वक घातल्याशिवाय कोणतेही ख्रिस्ती जीवन शक्य नाही [इफिस 2:8].
प्रत्येक व्यक्ती जे त्यांची काळजी घेतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात अश्या लोकांबरोबर उत्कंठतेने प्रवास करतात, जे सर्वजण देवावर विश्वास ठेवतात आणि त्याच्याशी आपला नातेसंबंध विकसित करण्यास वेळ घालवतात त्यांच्यासाठीच देवाचे सर्वस्व उपलब्ध आहे. नातेसंबंधातील विश्वासाशिवाय, आपण जे काही करतो ते मनापासून करत नाही! नात्यातून येणारा विश्वास शक्तिशाली असतो.
मी आमच्या एका सुवार्ता प्रसाराच्या सेवेसाठी भारतातील एका विशिष्ट राज्यात गेलो. मी वैयक्तिकरित्या शेकडो लोकांसाठी प्रार्थना केल्या त्यामुळे मी शारीरिकरित्या थकलो होतो. मी गाडीत बसणारच तेव्हा एक महिला आपल्या मुलीसह प्रार्थनेसाठी आली. घरच्या काही अडचणींमुळे ती वेळेवर सभेला येऊ शकली नव्हती. त्या महिलेने माझ्या टीमच्या सदस्यांना तिच्या मुलीचे वैद्यकीय अहवाल दाखविले. वरवर पाहता, त्या अहवालांवर काहीही दिसले नाही परंतु त्या लहान मुलीला तिच्या पोटात कित्येक महिण्यांपासून त्रास होत होता.
खरं सांगायचं झालं तर माझ्या शारीरिक थकव्यामुळे त्या बाईच्या लहान मुलीसाठी प्रार्थना करण्याची इच्छा मला झाली नाही. पण मला वाटले की परमेश्वर मला माझ्या आत्म्याद्वारे सांगत आहे, “मुला, या क्षणी तुला कसे वाटते यावर अवलंबून राहू नको, तर माझ्याशी असलेल्या तुझ्या नातेसंबंधावर विश्वास ठेव आणि त्याकडे लक्ष दे.”
म्हणून मी डोळे मिटून एक साधी प्रार्थना केली, “हे पित्या, या लहान मुलीला साहाय्य कर. तिला तुझ्या स्पर्शाची गरज आहे. येशूच्या नावात.”ती अभिषेकामुळे खाली पडली. खरं सांगायचं तर, मला हे अपेक्षित नव्हते. ती उठली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळत असताना तिने आपल्या आईला सांगितले,की तिला तिच्या शरीरात विजेची तीव्र संवेदना जाणवली.
दुसऱ्या महीण्यात, जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो, तेव्हा आई आणि मुलगी या दोघींनी मंचावर येऊन साक्ष दिली की देवाने त्यांच्यावर कशी कृपा केली. तिची लहान मुलगी तिच्या अवस्थेतून पूर्णपणे बरी झाली होती. तिच्या पोटातील कित्येक महिन्यांपासून असलेल्या वेदनेने तिला सोडले होते आणि ते परत आले नाही.
मी तुम्हाला परमेश्वराबरोबरचे आपले नातेसंबंध विकसित करण्यास प्रोत्साहित करतो. तुम्ही असे करताच,तुम्हाला लवकरच कळेल की पुर्वीपेक्षा तुम्ही अधिक विश्वासात पुढे जात आहात. का? ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आता त्याला तुम्ही ओळखता. (२ तिमथ्यी १:१२ वाचा) तुमचा त्याच्याशी वैयक्तिक संबंध आहे. तेथे कोणताही संघर्ष नसेल.
प्रार्थना
हे प्रभू, तो कोण आहे याच्या प्रकटीकरणाने माझा अविश्वास काढून टाक, येशुच्या नावात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्तुति वृद्धि करते● दिवस १६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● देवदूताचे साहाय्य कसे सक्रीय करावे
● तुमचा हेतू काय आहे?
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-1
● परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक
● किंमत मोजणे
टिप्पण्या