डेली मन्ना
माझ्या दिव्याला पेटव परमेश्वरा
Monday, 11th of March 2024
28
21
858
Categories :
परमेश्वराचे शब्द
परमेश्वर त्याचे रहस्य सामान्य ठिकाणी लपवून ठेवतो. जेव्हा तुम्ही पुढील वचनाकडे पाहता, ते इतके साधे वाटते परंतु त्यामध्ये इतका खजाना लपलेला आहे.
तूं माझा दीप उजळितोस; परमेश्वर माझा देव, माझ्या अंधकाराचा प्रकाश करितो. (स्तोत्र १८:२८)
मनुष्य हा मुख्यत्वेकरून तीन भागांमध्ये विभागलेला आहे: मनुष्य आत्मा आहे, त्यास जीव आहे व तो शरीरात राहतो (१ थेस्सलनी ५:२३). मनुष्याचा आत्म्याला ह्या वचनात 'माझा दीप' असे संबोधिले आहे. पुढील वचन ते स्पष्ट करते.
"मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय. त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करितो." (नीतिसूत्रे २०:२७)
आता ह्या समजेनुसार, चला आपण स्तोत्र १८:२८ वाचावे,
तूं माझा दीप उजळितोस; परमेश्वर माझा देव, माझ्या अंधकाराचा प्रकाश करितो. (स्तोत्र १८:२८)
हे महत्वाचे आहे की तुमचा आध्यात्मिक मनुष्य हा प्रकाशमान व्हावा. चला मला तुम्हाला हे सांगू दया, का?
परमेश्वर तुमच्या मानवी आत्म्याला वापरतो की तुम्हाला त्या गोष्टींचे प्रकटीकरण व समज आणावी जी तुम्हाला स्वाभाविकपणे येत नाही.
प्रभु येशू, राजांचा राजा हा त्याच्या लोकांमध्ये निवास करून होता, परंतु स्वाभाविक स्तरात फारच थोड्यांनी ते जाणले असेन. तो एका साधारण मनुष्या सारखा जगला आणि तरीही परमेश्वर त्यांच्यामध्ये होता. सर्वात महान धार्मिक पुढाऱ्यांनी त्याची महानता व गौरव पाहण्याचे गमाविले.
त्याचप्रमाणे, तुम्ही काहीतरी किंवा कोणाला बाह्यदृष्टया हे जाणू शकत नाही जोपर्यंत तुम्ही आध्यात्मिकदृष्टया ज्ञानी नाहीत.
प्रेषित पौलाने लिहिले स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात; आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. (१ करिंथ २:१४)
तुम्ही उच्च शिक्षित, बुद्धिमान व्यक्ति असू शकता, आणि तरीही आध्यात्मिक समज नसेल. तुमचे दैहिक मन हे कदाचित शिक्षित असेल, परंतु तुमचा आत्मा हा देवाच्या गोष्टींबाबत कदाचित अशिक्षित असेल. असे प्रकरण नेहमी घडते जेव्हा व्यक्तीचा आत्मा हा ज्ञानी होत नाही.
पौल जो प्रेषित ने इफिस येथील चर्च साठी सर्व गोष्टींपेक्षा अधिक प्रार्थना केली: "तुमचे अंत:चक्षु प्रकाशित व्हावे" (इफिस १:१८).
तुमचा आत्मा हा ज्ञानी कसा केला जाऊ शकतो म्हणजे तुम्ही परमेश्वराकडून प्रकटीकरण ज्ञान प्राप्त करू शकता.
तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळयांना ज्ञान प्राप्त होते. (स्तोत्र ११९:१३०)
तुमच्या स्वतःला देवाच्या वचनाने भरून टाका. तुमच्या स्वतःला वचनास समर्पित करा. त्याच्या वचनाचा प्रवेश प्रकाश आणतो. तुमचा आध्यात्मिक मनुष्य हा ज्ञानी केला जाईल.
प्रार्थना
पित्या, माझे डोळे व कान उघड, की तुझ्याकडून पाहावे व ऐकावे. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel
Most Read
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – २● स्वैराचाराच्यासामर्थ्यास मोडून काढणे-१
● चर्चमध्ये ऐक्यता जपणे
● शरण जाण्याचे ठिकाण
● अप्रसिद्ध नायक
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
टिप्पण्या