त्याच्या मृत्यू मधून पुनरुत्थाना नंतर, प्रभु येशूने घोषणा केली की जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्या द्वारे चिन्हे आणि चमत्कार हे होतील.
जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असत जातील: तेमाझ्या नावाने भुते काढतील, नव्यानव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही; त्यांनी दुखणाइतांवर हात ठेविले म्हणजे ते बरे होतील. (मार्क १६: १६-१८)
ही चिन्हे त्यांच्याद्वारे घडतील जे प्रभु येशू ख्रिस्ताला, त्यांचा प्रभु, परमेश्वर आणि तारणारा असे स्वीकार करतात.
1. ते भुते काढतील-अद्भुत अधिकार
2. ते नव्यानव्या भाषा बोलतील-एक अद्भुत भाषा
3. ते सर्प उचलतील-अद्भुत संरक्षण
4.जर त्यांनी कोणताही प्राणघटक पदार्थ प्याला तरी ते त्यास बाधणार नाही-अद्भुत सांभाळ
5. ते आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते स्वस्थ होतील-अद्भुत सामर्थ्य
वरील वचनांमध्ये, लक्षात घ्या अन्य भाषेत बोलणे यांस इतर अद्भुत चिन्हांच्यासोबतच ठेवले आहे. हे दाखविते की अन्य भाषेत बोलणे हे मनुष्याच्या स्वभावाचे अद्भुतेचे दर्शक आहे.
मला आत्म्यहत्त्या करण्यापासून परमेश्वराने नाटकीयरित्या वाचविले आहे. कोणीतरी रस्त्यावर मला शुभवर्तमान सांगितले.
(हे एक कारण आहे की मी सुवार्ता प्रसारा बद्दल का इतका आवेगात आहे.) मग ह्या तरुण लोकांच्या गटात सामील झालो जे येशू साठी इतके आवेगी होते.
एके रात्री, खूपउशिरा जेव्हा आम्ही जवळजवळ 2.30 वाजता प्रार्थना करीत होतो, मी देवाचे सामर्थ्य अग्नी प्रमाणे माझ्या संपूर्ण शरीरा भोवती अनुभविले. ते खूप चटके देत होते. मी शुद्ध हरपून खूप रडू लागलो. त्याचवेळेला, मला असा अनुभव वाटला की माझ्या शरीरात काहीतरी फार तीव्रतेनेभरले गेले आहे.
जेव्हा हे सर्व घडत होते, माझे मुख हालत होते आणि माझ्या जीभे मध्ये असामान्य तीव्रतेने कंपन होत होते. मी देवाची स्तुती करण्याचा प्रयत्न केला आणि जसे वचन सांगते, "तूं आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन" (स्तोत्रसंहिता ८१:१०).
परमेश्वराने माझे मुख नव्या भाषेने भरले- गौरवाची भाषा.
पवित्र आत्म्या मध्ये गौरवाने माझा बाप्तिस्मा केला गेला. परमेश्वर कोणाचा पक्षपात करीत नाही. जे त्याने माझ्यासाठी केले, तो ते तुमच्यासाठी सुद्धा करू शकतो. (प्रेषित १०:३४)
Bible Reading: Proverbs 25-28
अंगीकार
माझी जीभ देवाची इच्छा स्थापित करेल आणि अंधाऱ्या कर्माला फाडून टाकेन. येशूच्या नांवात. आमेन. (यिर्मया ५:१४).
Join our WhatsApp Channel

Most Read
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1● पूल बनवणे, अडथळे नाहीत
● विश्वासासह विरोधकांना सामोरे जाणे
● दिवस ०९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
● उपासनेचा सुगंध
● भावनात्मकदृष्टया वाहवत जाऊन बळी पडणे
टिप्पण्या