त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. (१ करिंथ १०: ९-१०)
इस्राएली लोक रानात त्यांच्या दुसऱ्या प्रवासात ते अन्न, वातावरण वगैरे या सर्वांच्या बाबतीत तक्रार व कुरकुर करू लागले. ह्याने परमेश्वराला राग आला आणि त्याने त्यांच्या मध्य विषारी साप पाठविले आणि सापांच्या चावण्याने अनेक हे मरण पावले. (निर्गम २१: ४-६ वाचा)
ह्या त्यांच्या वेदनेत लोकांना लगेचच त्यांची चूककळली आणि त्यांनी नम्रपणे मानले की त्यांनी पाप केले आहे. हे मग तेव्हाच मोशे ने त्यांच्यासाठी मध्यस्थी केली. (गणना २१: ७)
सतत तक्रार आणि कुरकुर करण्याचा धोका हा कीशेवटी परमेश्वराने ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला दिल्या आहेत त्या आपण विसरून जातो. ज्याक्षणी तुम्ही कुरकुर, कुडबुड, तक्रार करता, तुम्ही अकृतज्ञ होऊ लागता.
कुरकुर करणे हे जो उत्तर आहे त्याकडे लक्ष केंद्रित करण्या ऐवजी समस्यांकडे लक्ष केंद्रित करविते.देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहण्याऐवजी ते आपल्या स्वतःवर लक्ष केंद्रित करविते.
कुरकुर आणि कुडबुड करण्याची सर्वांत धोकादायक बाब ही कीते दुष्ट सैतानी आत्म्याला द्वार उघडते आणिलोकांच्या जीवनात थैमान माजाविते.
पवित्र आत्म्यास आपल्याला शिकवावयास पाहिजे की कुरकुर करणे थांबविणे हे किती महत्वाचे आहे म्हणून त्याने प्रेषित पौला द्वारे फिलिप्पै २: १४-१६ मध्ये लिहिले,
"जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा;
ह्यासाठीकी, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगांत दिसता. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल."
देवाचा माणूस मोशे लाआणखी एक गोष्ट करण्यास आदेश देण्यात आला होता:
मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला, तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगे. (गणना २१: ९)
येथे ह्या चित्रणा विषयी 3 गोष्टी आपल्या साठी महत्वाच्या आहेत की स्पष्टपणे त्याचा अर्थ समजावा.
१. धातू, पितळ, किंवा ब्रास हे संपूर्ण जुन्या करारात न्यायाविषयी जुडलेले आहे.
२. सर्प हा एदेन बागेत सैतानाने घेतलेल्या रूपाचे प्रतीक आहे की हव्वे ला लोभात पाडावे.
३. पितळेच्या सापाला एका खांबावर लटकविण्यात आले, सर्वांना दिसेल असे, बाहेर, सर्वांच्या दृष्टीपथात.
ज्या लोकांना साप चावले आहेत त्यांना केवळ खांबावरील सापाच्याह्या प्रतिमेकडे पाहावयाचेआहे आणि मग ते जगतील. जेव्हा केव्हा आपल्याला कुरकुर किंवा तक्रार करावयाची वाटते केवळ येशू कडे पाहा, त्याने कुरकुर किंवा तक्रार न करिता आपल्यासाठी कसे दु:ख सहन केले. परमेश्वर पित्याने मग त्यास अत्यंत श्रेष्ठ पद दिले. तीच गोष्ट तुमच्या बाबतीत सुद्धा होऊ शकते.
तसेच जर तुम्ही कुरकुर किंवा तक्रार करण्याच्या सवयीत नेहमी असाल तर येशू कडे पाहा आणि त्याच्याकडे कृपे साठी मागा. लक्षात ठेवा, येशू हा आपले सिद्ध उदाहरण आहे.
प्रार्थना
पित्या, माझ्या जीवनातील परिस्थिती विषयी तक्रार करण्याबद्दल मला क्षमा कर. मला तुझ्याकडे पाहण्यास आणि आज ज्या प्रत्येक अडथळ्यांचा सामना मी करीत आहे त्यावर वर्चस्व मिळविण्यास मला साहाय्य कर. येशूच्या नांवात मी प्रार्थना करतो, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-१● पापी रागाचे स्तर उघडणे
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात - ४
● दुष्ट आत्म्यांचे प्रवेशाचे मार्ग बंद करणे- ३
● बदलण्याची वेळ
● देवाच्या प्रकारची प्रीति
● यहूदाच्या पतनापासून ३ शिकवणी
टिप्पण्या