डेली मन्ना
19
17
173
किंमत जी तुम्हाला भरण्याची गरज आहे
Friday, 28th of February 2025
Categories :
एस्तेरचे रहस्य: मालिका
" १ हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडीली, गोणताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठयाने आक्रंदन केले; २ तो राजमंदिराच्या दरवाज्यासमोर गेला; गोणताट नेसून राजमंदिराच्या दरवाज्याच्या आंत येण्याची कोणास परवानगी नसे." (एस्तेर ४:१-२)
एस्तेर, राजवाड्याच्या एकांत ठिकाणी राहत होती, आणि राजाने सर्व यहूद्यांची कत्तल करण्याविरुद्ध जारी केलेल्या भयंकर फर्मानविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होती. तीचा चुलता मर्दखयाच्या कृतीबद्दल ती गोंधळली होती, जो विचित्रपणे वागत होता, परंतु ती या वागणुकीमागील कारण समजू शकली नाही.
तथापि, तिच्या दासी व खोजे लोक जे बाहेरच्या जगाच्या अधिक संपर्कात होते, त्यांनी एस्तेरला त्या विध्वंसकारक बातमीविषयी सांगितले. यहूद्यांचा नाश करण्याबद्दलच्या बातमीविषयी त्यांनी तिला सांगितले आणि कसे ही कत्तल घडवून आणण्यासाठी हामानाने मोठी रक्कम राजभंडारात जमा करण्याचे आश्वासन दिले आहे. ही माहिती एस्तेरसाठी मोठा धक्का होती, जेव्हा तिने परिस्थितीचे गांभीर्य व तिच्या लोकांना भेडसावणाऱ्या धोक्याबद्दल जाणले.
मर्दखयाने, एका संदेशवाहकाद्वारे त्या फर्मानाची प्रत एस्तेरकडे पाठविली. फर्मान प्राप्त केल्यावर, मर्दखयाने एस्तेरला आव्हान केले, ही विनंती करीत की तिच्या लोकांच्या वतीने काही कारवाई करावी. त्याने तिजवर दबाव आणला की राजाबरोबर त्याबाबतीत मध्यस्थी कर, तिच्या प्रभावाचा वापर करण्याने यहूद्यांवर दया व त्यांचे रक्षण करण्यासाठी विनंती कर.
ही महत्वपूर्ण विनंती होती, कारण एस्तेर राजवाडयात राहत होती आणि ती राजाला सरळपणे भेटू शकत होती, परंतु या परिस्थितीने तिला एका धोक्याच्या परिस्थितीत आणले होते, कारण राजाचे फर्मान हे जारी करण्यात आले होते आणि त्यामध्ये तिच्याकडून कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप हा गंभीर परिणामात होऊ शकतो.
मर्दखयाचे उत्तर एस्तेरला पुढील प्रमाणे आहे: "तूं राजमंदिरात आहेस म्हणून तूं यहूदी लोकांतून वाचून राहशील असे तुझ्या मनास वाटू देऊ नको. तूं या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसऱ्या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?" (एस्तेर ४:१३-१४)
मर्दखयाने, प्रामुख्याने, एस्तेरला म्हटले, "तूं या शक्यतेबद्दल विचार केला आहे काय की, तुझ्याबद्दल हा कदाचित देवाच्या योजनेचा भाग असू शकतो?" या प्रश्नाने एस्तेरला उद्देशावर विचार करण्याविषयीच केवळ प्रेरित केले नाही, परंतु त्यावर जोर देखील दिला की तशा परिस्थितीत तिच्या लोकांसाठी दैवी योजनेमध्ये तिच्याकडे महत्वाची भूमिका पार पाडण्याचे काम आहे.
आपल्या प्रत्येकाला देवाची सेवा करण्यासाठी अनोखी संधी मिळते, परंतु या संध्या त्यामधील धोक्यासह येतात. यामध्ये कदाचित उपास व प्रार्थना, आर्थिक त्याग, क्षमा आणि भूतकाळातील अपमानाबद्दल विचार सोडून देणे किंवा देवाच्या पाचारणास उत्तर देण्यासाठी आपल्या आरामदायक स्थितीतून बाहेर निघणे हे सर्व समाविष्ट असू शकते. आव्हान कोणतेही असो, हे महत्वाचे आहे हे समजणे की देवाची सेवा करण्यासाठी एका निश्चित पातळीची निडरता आणि धोका पत्करण्याची तयारी आवश्यक आहे.
Bible Reading: Numbers 36- Deuteronomy 1

मार्गदर्शक आपल्याला आपला दृष्टीकोन विस्तृत करण्यासाठी आणि आपल्या आवडीचा पाठपुरावा करण्यास प्रेरित करतात. ते आपल्याला आपल्या भूतकाळातील भीतीपासून पुढे नेतात आणि आपल्याला आमंत्रित करतात की देवाच्या मोठया योजनेमध्ये आपण मोठी भूमिका कशी पार पाडू शकतो.
मर्दखयाने, प्रामुख्याने, एस्तेरला म्हटले, "तूं या शक्यतेबद्दल विचार केला आहे काय की, तुझ्याबद्दल हा कदाचित देवाच्या योजनेचा भाग असू शकतो?" या प्रश्नाने एस्तेरला उद्देशावर विचार करण्याविषयीच केवळ प्रेरित केले नाही, परंतु त्यावर जोर देखील दिला की तशा परिस्थितीत तिच्या लोकांसाठी दैवी योजनेमध्ये तिच्याकडे महत्वाची भूमिका पार पाडण्याचे काम आहे.
आपल्या प्रत्येकाला देवाची सेवा करण्यासाठी अनोखी संधी मिळते, परंतु या संध्या त्यामधील धोक्यासह येतात. यामध्ये कदाचित उपास व प्रार्थना, आर्थिक त्याग, क्षमा आणि भूतकाळातील अपमानाबद्दल विचार सोडून देणे किंवा देवाच्या पाचारणास उत्तर देण्यासाठी आपल्या आरामदायक स्थितीतून बाहेर निघणे हे सर्व समाविष्ट असू शकते. आव्हान कोणतेही असो, हे महत्वाचे आहे हे समजणे की देवाची सेवा करण्यासाठी एका निश्चित पातळीची निडरता आणि धोका पत्करण्याची तयारी आवश्यक आहे.
Bible Reading: Numbers 36- Deuteronomy 1
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझी सेवा करण्यासाठी तूं मला विशेष वरदाने व क्षमता दिली आहेत म्हणून मी तुझे आभार मानतो. कृपाकरून मला समर्थ कर की जे माझ्या सभोवती आहेत त्यांना देखील प्रेरित करावे की तुझी सेवा परिश्रमपूर्वक करावी. येशूच्या नावाने मी ही प्रार्थना करतो, आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● गुप्त गोष्टी समजून घेणे● कुटुंबात चांगला वेळ घालवा
● ओरडण्यापेक्षा दयेसाठी रडणे
● विश्वासाचे सामर्थ्य
● देवासारखा विश्वास
● भीतीचा आत्मा
● विश्वास जो जय मिळवितो
टिप्पण्या