english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. तुमच्यासाठी हे बदलत आहे.
डेली मन्ना

तुमच्यासाठी हे बदलत आहे.

Thursday, 20th of February 2025
26 19 265
Categories : एस्तेरचे रहस्य: मालिका
"तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्यापुढे ताट वाढीतोस; तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करितोस; माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे." (स्तोत्रसंहिता २३:५)

देवाला ठाऊक आहे की गोष्टींना तुमच्यासाठी कसे बदलावे. त्याच्याकडे तो हात आहे जो तुमच्या विरोधातील दुष्टाच्या योजनेस उलथून टाकू शकतो आणि त्यास तुमच्यावर कृपा होईल असे करतो. जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत ते संपलेले नाही. मी फुटबॉल स्पर्धा पाहिल्या आहेत जेथे विजेता कोण हे शेवटच्या मिनिटाला ठरविला गेले आहे. त्याच अनुशंघाने, जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही ते संपलेले नाही. कदाचित जीवन हे आता फारच कठीण आहे. सैतान हा तुमची अति परीक्षा घेत आहे आणि हे दिसते की हा तुमचा शेवट आहे. कदाचित तुम्ही कर्जात असाल, आणि त्याचा भार हा असहनीय असा दिसतो. मी एका माणसाविषयी ऐकले ज्याने नदीमध्ये उडी मारली आणि बुडून गेला कारण त्याच्याकडे त्याचे कर्ज भरण्यास त्यास मार्ग सापडला नाही. आव्हानांच्या कारणामुळे तुम्हांला सुद्धा आत्महत्त्या करण्याचे विचार येत आहेत काय? माझ्याकडे तुमच्यासाठी सुवार्ता आहे; तुम्ही सर्व काही बदलणाऱ्या देवाची उपासना करीत आहात.

एस्तेर ६:१०-११ मध्ये बायबल म्हणते, "राज हामानास म्हणाला, त्वरा करून हा पोषाख व हा घोडा घे आणि राजद्वारी मर्दखय बसला आहे त्याची संभावना तुझ्या म्हणण्याप्रमाणे कर, तू बोललास तसे करण्यात काहीएक अंतर होऊ नये. हामानाने तो पोषाख व तो घोडा घेऊन मर्दखयास सजविले आणि शहराच्या रस्त्यातून त्यास मिरवून त्याच्यापुढे ललकारीले की राजेसाहेब ज्याचे गौरव करू इच्छितात त्याची या प्रकारे संभावना होईल."

ही मर्दखयाची वेळ होती! स्वर्ग स्थिर झाला होता की त्यास पुरस्कृत करावे आणि आता त्याच्या परिवर्तनाची वेळ होती. विनोदपूर्वक, देवाने शत्रूचा देखील उपयोग केला ज्याने त्याच्या पतनाची योजना आखली होती. त्याने त्यास इतर कोणत्याही मार्गाने आशीर्वादित केले असते परंतु देवाने ते अशा प्रकारे आयोजिले की तेच हात ज्यांनी त्याच्या पतनाची योजना आखली होती त्यांनी त्यास उच्चपदावर आरूढ होण्यास सजविले होते. त्यादिवशी सर्वकाही बदलले होते. दाविदाने म्हटले, "देवाने माझ्या शत्रूसमोर माझ्यासाठी विपुलतेची मेजवानी तयार केली होती." म्हणून शत्रूची भीति बाळगू नका; देव त्यांचा कमिटीचा अध्यक्ष म्हणून उपयोग करील जे तुम्हाला उच्चपदावर बसविण्याची योजना आखतील.

इस्राएली लोक चारशे तीस वर्षे बंदिवासात होते. कल्पना करा की गुलामगिरीत जन्म घेतलेला आहे. बंदिवास ही त्यांची ओळख होती, परंतु एका दिवशी सर्व काही बदलले. निर्गम १४:१३ मध्ये बायबल म्हणते, "मोशे लोकांना म्हणाला, भिऊ नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहा ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडावयाचे नाहीत." नंतरचा भाग मला आवडतो जे म्हणते तुम्ही मिसरी लोकांना पुन्हा कधीही पाहणार नाही. हे त्यांच्यासाठी पूर्णपणे बदल होणे होते. मिसरी लोकांनी त्यांना बक्षिसे दिली आणि त्यांच्या प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यांना दिल्या.

तुमच्या जीवनावर मी भविष्यात्मक वचनाची घोषणा करीत आहे. "तुमच्या शत्रूंवर दबाव करण्यात येईल की तुमचा सन्मान करावा. तुमची प्रतिकूलता तुमची जाहिरात करील, आणि तुमचा छळ करणारे तुम्हाला बढती देतील.' येशूच्या नावाने.

तुमची स्थिती ही नेहमीच अशासारखीच राहणार नाही. तुम्ही नेहमीच अत्याचार करणाऱ्यांच्या अधीन असणार नाही. बदल हा तुमच्याकडे येत आहे. म्हणून देवाला प्रसन्न करीत राहा. बायबल म्हणते, "मनुष्याचे मार्ग परमेश्वराला आवडले म्हणजे तो त्याच्या शत्रूसही त्याच्याशी समेट करावयास लावितो" (नीतिसूत्रे १६:७). पवित्रता आणि नितीमत्तेच्या मार्गात सतत चालत राहा. लोकांविरुद्ध कपटी योजना आखू नका किंवा त्यांच्यावर अत्याचार करू नका जे तुमच्या अधीन आहेत. प्रामाणिक प्रीतीचे जीवन जगा. आणि तुम्ही पाहाल देव तुम्हांला, शत्रूंना भाग पाडेन की त्यांची मालमत्ता तुमच्या सुपूर्त करावी.

Bible Reading: Numbers 16-17
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की सत्याच्या मार्गात सतत चालण्यासाठी तू मला साहाय्य कर. मी प्रार्थना करतो की माझे जीवन नेहमीच तुला प्रसन्न करील. मी प्रार्थना करतो की माझ्या जीवनाची प्रत्येक आव्हाने चांगल्यासाठी बदलावीत. माझ्या प्रकरणात माझ्या प्रगतीच्या विरोधातील प्रत्येक शत्रू पतन पावो. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● बारा मधील एक
● संबंधामध्ये राहण्याद्वारे अभिषेक
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
● आध्यात्मिक दरवाजे बंद करणे
● राज्यात नम्रता आणि सन्मान
● चर्चमध्ये ऐक्यता जपणे
● कोणाच्या वार्तेवर तुम्ही विश्वास ठेवाल
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन