येथे एक जुनी म्हण आहे जी मी शाळेत असताना शिकली होती: "एकसारखे पंख असलेले पक्षी एकत्र निवास करतात" हे आजसुद्धा तितकेच खरे आहे. मी हे नेहमी पाहिले आहे की लोक, जे कटू दिसतात, कशानेकिंवाकोणाद्वारे तरी दु:खी जे नेहमीच इतर गटाबरोबर एकत्र येतात जे त्याच मनोवृत्तीचे आहेत.
ते कोणताही संदेश किंवा भविष्यात्मक वचनावर विश्वास ठेवण्यास नकार देतात. त्यांचे असे आहे की त्यांनी अगोदरच काही निर्णय केला आहे की काहीही त्यांची वर्तमान परिस्थिती बदलू शकत नाही.
लोक ज्यांबरोबर आपण सहभागीतेमध्ये राहतो त्यांचा आपल्यावर मोठा प्रभाव असतो.आपले आचरण, आपल्या व्यवहारपद्धती आणि आपल्या भविष्यावर सुद्धा ते प्रभाव करतात. आपण काय वाचतो, आपण काय पाहतो आणि लोक ज्याबरोबर आपण राहतो ह्यांचा आपल्या भविष्यावर मोठा प्रभाव असतो आणि सार्वत्रिक संशोधन ह्या वास्तविकतेला सिद्ध करते.
नीतिसूत्रे 13:20 आपल्याला सुचना देते, "सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खाचा सोबती कष्ट पावतो."
संदेष्टा शमुवेल शौला ला भविष्यवाणी करीत आहे हे म्हणत, "तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुजवर जोरानेयेईल व तुही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. (1 शमुवेल 10:6)
"जेव्हा ते टेकडीपाशी आले तेव्हा, पाहा, संदेष्ट्यांचा एक समुदाय त्याला भेटला; आणि देवाचा आत्मा त्याजवर जोराने आला व तो त्यांच्याबरोबर भाषण करू लागला. जे लोक त्याला पूर्वीपासून ओळखीत होते त्यांनी जेव्हा पाहिले की हा संदेष्ट्यांबरोबर भाषण करीत आहे तेव्हा ते आपसांत म्हणू लागले, किशाच्या पुत्राला काय झाले? शौल हाही संदेष्ट्यांपैकी आहे काय?" (1 शमुवेल 10:10-11)
शौल हा बन्यामीन वंशाचा एक साधारण व्यक्ती होता परंतु जेव्हा तो संदेष्ट्यांच्या एका गटाच्या संपर्कात आला काहीतरी अद्भुत असे घडले. भविष्यात्मक अभिषेक शौलावर आला आणि तो सुद्धा इतरसंदेष्ट्यासारखा भविष्य करू लागला. येथे एक मुख्य सिद्धांत आहे. हे संबंधाद्वारे की अभिषेक हा एक-दुसऱ्याकडे सोपविला जातो.
प्रेषित 4:13 म्हणते, "तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले."
प्रभूचे अधिकतर शिष्य हे मासे धरणारे, अशिक्षित, आणि अप्रशिक्षित असे होते. तथापि, ते तीन आणि अर्धे वर्षे त्याजबरोबर घनिष्ठ सहवासात होते. ह्यामुळे जो अभिषेक प्रभूवर होता त्याने त्यांना स्पर्श केला. ते त्याच्यामुळे अत्यंत प्रभावित झाले होते इतकेकी जो परिणाम येशू आणत होता तसाच परिणाम त्यांनी सुद्धा आणला.
चला आपण दाविदाच्या जीवनाकडे पाहू या:
विपन्न, कर्जबाजारी व जिवाला त्रासलेले असे सर्व लोक त्याजपाशी जमा झाले, तो त्यांचा नायक झाला; सुमारे चारशे पुरुष त्याच्यापाशी जमले. (1 शमुवेल 22:2)
लोक जे दाविदापाशी जमा झाले होते ते विपन्न, कर्जबाजारी व जिवाला त्रासलेले होते परंतु ते जेव्हा त्याच्याबरोबर सहवासात होते, त्यांच्या जीवनात बदल होऊ लागला. ते विपन्न व त्रासलेल्या स्थितीतून खूप यशस्वी झाले. पुन्हा मुख्य सिद्धांत हा, अभिषेक हा सहवासाने वाढतो जे आपण पाहू शकतो.
योग्य संबंध मोठा फरक करतो. यहोशवा हा मोशे च्या सहवासात होता. तीमथी हा पौलाच्या सहवासात होता आणि वगैरे.
आजचे अनेक मोठे प्रचारक आणि आधुनिक जगाचे भविष्यवक्ते हे त्यांच्या प्रशिक्षकासह संबंधात असतात जो त्यांच्या इच्छेनुसार दान देतो.
कधीकधी हे भौतिकरित्या सोपे नसते कीत्यांच्या सहवासात राहावे जे मोठया अभिषेकात चालतात ज्यांची तुम्ही इच्छा करता. तर मग त्यांच्या शिक्षणाच्या अगदी जवळ जावे-त्यांचे संदेश व प्रचार यासोबत घनिष्ठतेत राहावे. अशा प्रकारे तुम्ही त्यांच्यासोबत राहता. अशा प्रकारे तुम्ही अभिषेकात असणाऱ्या सोबत जुडता.
शेवटी, एक चेतावणीचा इशारा:
"सुज्ञाच्या घरात मोलवान वस्तू व तेल यांचा साठा असतो, पण मूर्ख मनुष्य त्यांचा फन्ना उडवितो." (नीतिसूत्रे 21:20)
वरील वचन आपल्याला स्पष्टपणे सांगते की मोलवान खजाना आणि तेल (बोलणे आणि अभिषेक करणे)यांचा साठा सुज्ञाच्या घरात असतो. याउलट सुद्धा खरे आहे.
जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी संगतीसाठी गेला किंवा चुकीच्या व्यक्तीसोबत जुडला तर अभिषेक का सुकून जाईल. जे काही थोडे तुम्ही घेऊन आहात ते नष्ट होईल. त्याठिकाणाशी जुडलेले राहा जेथे परमेश्वर कार्यरत आहे.
अंगीकार
मी सुज्ञांसोबत चालेन आणि अधिक सुज्ञ होईन. येशूच्या नांवात.
पित्या, येशूच्या नांवात,मी तुला दैवी संबंधासाठी मागत आहे जे मला अभिषेकात अधिक वाढण्यास कारणीभूत होईल.
पित्या, येशूच्या नांवात,मी तुला दैवी संबंधासाठी मागत आहे जे मला अभिषेकात अधिक वाढण्यास कारणीभूत होईल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – १● आज्ञाधारकपणा हा आध्यात्मिक गुण आहे
● त्वरित आज्ञापालनाचे सामर्थ्य
● दिवस १३:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
● कृपेचे माध्यम होणे
टिप्पण्या