डेली मन्ना
पैसा चरित्राला वाढवितो
Friday, 15th of November 2024
20
15
183
Categories :
पैशाचे व्यवस्थापन
वर्ण
सातव्या दिवशी एफ्राइमाच्या वंशजांचा सरदार अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा ह्याने अर्पण सादर केले. (गणना ७: ४८)
पैसा हा आपल्या दैनंदिन जीवनात महत्वाची भूमिका पार पाडतो. तुम्ही जसे पैसे वापरता ते तुमच्या विषयी बरेच काही बोलते.पैसा हा देवासाठी तितका महत्वाचा आहे काय? मी हे पाहिले आहे की जेव्हाकेव्हा कोणी चर्च किंवा प्रार्थना सभे मध्ये पैशा विषयी बोलतात, तेव्हा काही लोक गडबडून जातात, इतरांना त्रास होतो, काहीकट्टरपणे लोकांची इतकी टीका करतात की त्यांचा न्यायच करतात. पैसा इतकी आवेगपूर्ण भावना का निर्माण करतो?
आपल्यापैकी अनेक हे पैशा बदल्यात वेळ घेतात; इतर हे पैशाच्या बदल्यात वरदान किंवा सुंदरता देतात. काही स्वतःला १०-१५ तास काम करण्याद्वारे त्यांचे सामर्थ्य आणि श्रम पैशा साठी देऊन टाकतात. दुसऱ्या शब्दात, पैसा सादर करतो,'तुम्ही कोण आहात'.
हेच तर कारण आहे ह्या जगाचे लोक तुम्हाला किंमत देतात जितका पैसा तुम्ही कमाविता. आता जेव्हा तुम्ही तुमचा पैसा परमेश्वराला अर्पण म्हणून आणता, तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या स्वतःच्या भागाला अक्षरशः आणत आहात. सैतान आणि त्याची भुते सुद्धा या वास्तविकते बाबत अवगत आहेत. ते सुद्धा तुमच्या पैशा द्वारे उपासनेची मागणी करतात.
सत्य हे, पैसा हा तटस्थ आहे-तो चांगला ही नाही आणि वाईट पण नाही. चांगल्या मनुष्याच्या हातात, त्यासकष्टाचे पैसे म्हणतात आणि नाहीतर, त्यास वाईट पैसा असे म्हणतात.
मुर्खाला बुद्धि नसता ज्ञानाची खरेदी करण्याकरिता तो हाती द्रव्य का घेतो? (नीतिसूत्रे १७: १६)
पैसा केवळ व्यक्तीच्या चारित्र्याला वाढविते आणि तुम्ही खरेच ज्यासाठी समर्पित आहात त्याचे ते प्रमाण आहे. ही समज महत्वाची आहे.
उदाहरणार्थ: जर तुम्हाला काही वाईट सवय आहे आणि तुम्हाला खूप अधिक पैसा मिळतो, तरहे साहजिकच आहे की तुम्ही त्या सवयी साठी तो पैसा जास्त खर्च करणार. पैसा सरळपणे वाईट सवयी वाढविते. ते व्यक्तीच्या चारित्र्याला वाढविते.
मदर तेरेसा बद्दल काय? तिने गरीब आणि निराधार व्यक्तींसाठी पैसा वापरला. येथे सकारात्मक उदाहरण आहे की पैसा चारित्र्याला वाढवीत आहे.
मनुष्याचे हृदय किंवा चारित्र्याच्या आंतरिक विचारांना पैशा इतके इतर काहीही प्रकट करीत नाही. आज निर्णय करा, की तुमचे पैसे बुद्धिमत्तापूर्वक वापराल.तुमच्या वृद्ध आई-वडिलांना साहाय्य करा. नियमितपणे देऊन देवाच्या कार्याला साहाय्य करा. विधवा आणि अनाथ यांना आशीर्वाद देण्यासाठी तुमचा पैसा वापरा. अशा प्रकारे, तुमचा पैसा हा खरेच देवाला गौरव आणेल. (नीतिसूत्रे ३: ९)
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तूं जे आर्थिक आशीर्वाद मला दिले आहेत त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. माझे पैसे योग्यपणे वापरण्यासाठी मला साहाय्य कर. पित्या, जेव्हा मी तुझ्या कार्याकरिता माझी आर्थिक भेट देतो, तुझा आशीर्वाद माझ्यावर ओत आणि बी जे मी पेरत आहे ते वाढीव. येशूच्यानांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वचनाचा प्रभाव● काही अतिरिक्त भार घेऊ नये
● अंतिम रहस्य
● अपरिवर्तनीय सत्य
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● देवदुतांकडे आपण प्रार्थना करू शकतो काय?
● वारा जो डोंगराला देखील सरकवतो
टिप्पण्या