डेली मन्ना
तुम्ही प्रभूचा प्रतिकार करीत आहात काय?
Sunday, 8th of September 2024
20
19
313
Categories :
सुटका
एकदा एक चर्च चा सभासद त्यांच्या पास्टर कडे गेला जे विशेषकरून भविष्यात्मक दानात उपयोगात आणले जात होते आणि मग त्याने त्यांस विचारले, 'पास्टर,तुम्ही मला सांगू शकता काय की कोणता आत्मा मला विरोध करीत आहे?" चर्च सभासद एक विलक्षण उत्तराची अपेक्षा करीत होता तेव्हा पास्टर ने उत्तर दिले, "देवाचा आत्मा हा तो आहे जो तुम्हाला विरोध करीत आहे कारण तुम्ही देवाला स्वयं विरोध करीत आहात."
कृपा करून खालील पवित्र शास्त्र वचन काळजीपूर्वक वाचा:
त्यामुळे देवाच्या अधीन व्हा. सैतानाचा प्रतिकार करा, आणि तो तुमच्यापासून पळेल. (याकोब 4:7)
त्याचा(सैतानाचा) प्रतिकार करा,....विश्वासात दृढ राहा. (1 पेत्र 5:9)
वरील पवित्र शास्त्र वचने आपल्याला स्पष्टपणे सांगतात की एका ख्रिस्ती व्यक्तीला प्रथम देवाच्या अधीन व्हायचे आहे आणि मग सैतानाचा प्रतिकार करावयाचा आहे. अशा प्रकारेच आपण शत्रूच्या प्रत्येक कुयोजनावर विजय मिळवू शकतो.
शुभवार्ता ही आहे की सर्वात तरुण ख्रिस्ती व्यक्ति सुद्धा ख्रिस्ता मध्ये स्थिर असे उभे राहण्याद्वारे शत्रूच्या सर्वात अंधाऱ्या शक्ती विरुद्ध यशस्वीपणे तोंड देऊ शकतो. तथापि, येथे एक वास्तविकता आहे ज्यास नेहमी कानाडोळा केले जाते आणि तेथेच मग सर्व समस्या ह्या निर्माण होतात.
"देव गर्विष्ठांना विरोध करितो आणिलीनांवर कृपा करितो." (याकोब 4:6)
".....नम्रतारूपी कमरबंद बांध; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो." (1 पेत्र 5:5)
वास्तविकता ही तशीच राहते की आपल्याला प्रभूच्या सामर्थ्यामध्ये सैतानाचा विरोध करावयाचा आहे. तथापि, अनेक वेळेला ख्रिस्ती लोक हे देवाचाच विरोध करीत असतात. गर्व हा देव आणि त्याच्या मार्गा विरुद्ध प्रतिकार आहे. हे त्याचवेळेला प्रभू स्वतः आपला विरोध करतो.
गणना 22 अध्याय एक मनुष्य बलाम विषयी बोलते
असे दिसते की बलाम ने मोठी प्रतिष्ठा मिळविली होती! असे म्हटले गेले होते कीजर त्याने एका व्यक्तीला शाप दिला, तो शापित झाला, जर त्याने व्यक्तीला आशीर्वाद दिला तर तो आशीर्वादित होत असे. बलाम देवाला ओळखत होता आणि प्रत्येकाला ठाऊक होते तो देवाला जाणत होता. आता देवाने बलाम ला स्पष्टपणे सांगितले होते कीमवाबी लोकांबरोबर जाऊ नये आणि तरीसुद्धा बलाम गेला. (गणना 22:21)
मग देवाचा क्रोप भडकला आणि त्याला (बलाम) अडविण्यासाठी परमेश्वराचा दूतवाटेत त्याला आडवा आला. मग परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तरवार हाती घेऊन वाटेत उभा आहे ...... (गणना 22: 22, 31)
जेव्हा आपण देवाचा प्रतिकार करतो, अशा परिस्थितीत आपला प्रतिकार हा व्यर्थ असतो. नम्रता ही गर्वाच्या अगदी उलट आहे.
हे असे असू शकते की परमेश्वर तुम्हाला तुमच्या काही जीवनशैली बदलण्यास सांगत आहे आणि तुम्ही ह्या बदलासाठी अनिश्चितकाळासाठी पुढे ढकलत आहात.
कदाचित असे असू शकते की परमेश्वर तुम्हाला एक विशेष आर्थिक बीज पेरण्याविषयी गरज आहे, कोणाला तरी क्षमा करण्याची गरज आहे किंवा एका विशेष प्रार्थनेची वेळ निश्चित करणे आहे हे सांगत असेन. बाब काहीही असो, त्यास प्रतिकार न करण्याद्वारे आता देवासमोर स्वतःला नम्र करा.
कदाचित एक नवीन वाटचाल विषयी विचार करीत नसाल, आणि तुम्हीत्याविषयी सैतानाला दोष देत असाल पण प्रत्यक्षात तेव्हा विरोध हा गर्वाच्या कारणामुळे देवा कडूनच येत असेल. काय तुम्ही कोणत्याही प्रकारे प्रभूचा प्रतिकार करीत आहात?
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, तुझे वचन न पाळण्याद्वारे तुझा प्रतिकार करण्यासाठी मला क्षमा कर. मला ते हृद्य दे जेतत्परतेने तुझे वचन पाळेल. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● उपासाचे जीवन-बदलणारे लाभ● दिवस २० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● कृपेचे दान
● वेदीवर अग्नी कसा प्राप्त करावा
● त्याच्या धार्मिकतेस परिधान करा
● जीवनाचे मोठे खडक ओळखणे आणि प्राथमिकता देणे
● याबेस ची प्रार्थना
टिप्पण्या