डेली मन्ना
मृतामधून प्रथम जन्मलेला
Sunday, 25th of February 2024
26
16
972
Categories :
ख्रिस्ताची देवता
आणि'विश्वसनीय साक्षी', मेलेल्यांतून'प्रथम जन्मलेला' व'पृथ्वीवरील राजांचा अधिपती' येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांस कृपा व शांति असो. जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला 'पातकातून मुक्त केले'. (प्रकटीकरण १:५)
दुसरे शीर्षक आपण पाहतो जे प्रभूला दिले गेले ते: 'मेलेल्यांतून'प्रथम जन्मलेला' हे आहे.
प्रभु येशूला "मेलेल्यांतून'प्रथम जन्मलेला" असे का म्हटले आहे, जेव्हा लाजरस व इतरांना अगोदर उठविले गेले होते. उत्तर हे आहे की इतरांना जीवनासाठी उठविले गेले होते, परंतु ते पुन्हा मरण पावले.
"त्या अशा की, ख्रिस्ताने दु:ख सोसणारे व्हावे आणि त्यानेच मेलेल्यांतून उठणाऱ्यांपैकी पहिले होऊन आमच्या लोकांस व परराष्ट्रीयांसही प्रकास प्रगट करावा." (प्रेषित २६:२३)
लक्षात घ्या, ह्या वचनात सुद्धा हे म्हणते, "त्यानेच मेलेल्यांतून उठणाऱ्यांपैकी पहिले व्हावे" खरेच याचा काय अर्थ आहे की तो मृतामधून पुनरुत्थित होईल की सदासर्वकाळ साठी राहावे.
त्या अर्थाने, ख्रिस्त हा खरेच 'मेलेल्यांतून'प्रथम जन्मलेला' आहे.
ख्रिस्ताला"मेलेल्यांतून'प्रथम जन्मलेला" हासंदर्भकलस्सै १:१५ मधील गोंधळात टाकणाऱ्या वाक्याचे स्पष्टीकरण करतो: "तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे; तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे." येथे ख्रिस्ताला "सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे" असे संबोधिले आहे.
वरवर पाहिल्यास,हे असे दिसते की ख्रिस्त हा अस्तित्वात आला केवळ जेव्हा त्याने ह्या जगात जन्म घेतला किंवा दुसऱ्या शब्दात, तो सार्वकालिक नाही, तर केवळ इतर निर्मित सत्व सारखा आहे. यहोवा विटनेस ह्या वचनास वेगळे रूप देतात की त्यांच्या विचारांस चालना दयावी. मुद्दा हा आहे की येशू ख्रिस्त हा पहिला व्यक्ति आहे जो मृतामधून सदासर्वकाळ साठी जीवित झाला आहे.
"प्रथम जन्मलेला" ह्या शब्दाचा सरळ अर्थ हा ख्रिस्त हा "प्रथम फळ" (१ करिंथ १५:२०) झाला आहे त्या दीर्घ वंशावळीतील लोकांचा जे गौरवी, अमर शरीराने पुनरुत्थित होणार आहेत.
बायबल म्हणते की ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस, आपण गौरवी शरीरे प्राप्त करू.
आपली गौरवी शरीरे कशा समान असतील?
१ करिंथ १५:५३ म्हणते, "कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे."
वचन म्हणते की आपण बदलून जाऊ. आणि १ योहान ३:२ म्हणते, "........तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल." दुसऱ्या शब्दात, आपली गौरवी शरीरे ही ख्रिस्ताच्या गौरवी शरीरा प्रमाणे असतील.
ख्रिस्ताचे गौरवी शरीर कशा समान होते?
१. ते आध्यात्मिक होते- ते भौतिक नियमाच्या अधीन नव्हते. लूक २४ व योहान २० नुसार, येशूदृश्य किंवा अदृश्य होऊ शकत होता, आणि भिंत व बंद दरवाजातून जाऊ शकत होता.
२ ते शारीरिक होते- येशू मासा व मध खाऊ शकत होता. तो त्याचे हात व पायावरील जखमा शिष्यांना दाखवू शकत होता, आणि तो बोलू शकत होता व त्यास समजले जात होते.
३. ते सामर्थ्यशाली होते- प्रेषित १:९-११ मध्ये, येशू डोंगरावर उभा राहिला आणितसाच अवकाशात गेला.
४. ते गौरवी होते- जसे लूक २४:३१ दाखविते, येशू स्वतःला इतर स्तरात घेऊन जाऊ शकत होता.
५.ते अविनाशी होते- प्रेषित १:११ आपल्याला दाखविते की, येशू त्याच शरीरासह परत येणार आहे जसा तो जवळजवळ २००० वर्षापूर्वी आपल्याला सोडून गेला होता.
प्रार्थना
१. प्रेमळ पित्या, मी विश्वास ठेवतो व कबूल करतो की प्रभु येशू ख्रिस्त माझ्यासाठी आला व मरण पावला जेणेकरून त्यास स्वीकारण्याद्वारे मला क्षमा व सार्वकालिक जीवन मिळू शकेन.
२. परमेश्वरा, तुझ्या आत्म्या द्वारे, मला समर्थ की मला व माझ्या कुटुंबाला तुझ्या गौरवी येण्यासाठी तयार कर.
३. पित्या, मला तुझ्या आत्म्या द्वारे समर्थ कर की इतरांना साहाय्य करावे की तुझ्यामध्ये पश्चाताप करावा व विश्वास ठेवावा म्हणजे ते सुद्धा कदाचित त्याच्या गौरवी येण्याच्या वेळी तयार असावे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आत्म्याद्वारे मार्गदर्शित होणे याचा काय अर्थ आहे?● प्रीति-जिंकण्याची योजना -२
● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● रहस्य स्वीकारणे
● चिंता करीत वाट पाहणे
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
● वातावरणावर महत्वाची समज - १
टिप्पण्या