डेली मन्ना
उपासना: शांतीसाठी किल्ली
Tuesday, 22nd of October 2024
17
15
262
Categories :
मानसिक आरोग्य
“याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू.” (स्तोत्र. 95:6)
जीवन हे नेहमी जबाबदारी, दबाव आणि अडथळ्यांचे चक्रव्यूह असल्यासारखे वाटते. या गोंधळाच्या मध्ये, आपल्यापैकी अनेक जण शांतता प्राप्त करण्यासाठी आतुर असतात-जी खरी टिकावू शांती जी तात्पुरत्या आरामाच्याही पलीकडील असते. परंतु आपण तिला कोठे शोधावे? त्वरित निराकरण आणि विचलित होण्याचे क्षणभंगुर क्षण देणाऱ्या जगात, बायबल आपल्याला काहीतरी गहन शिकवण देते : शांती ही उपासनेत आढळते. उपासना आपले लक्ष जगाच्या गोंगाटापेक्षा आपल्या देवाच्या महानतेच्या जगाकडे वळवते. ही ती उपासना आहे ज्याद्वारे आपल्या थकलेल्या आत्म्यासाठी आपल्याला विश्रांती मिळते.
उपासना ही गीत गाणे किंवा वचने बोलून दाखवणे नाही -तर ते आपल्या अंत:करणाच्या अवस्थेबद्दल आहे. उपासना ही शरण जाण्याचे कृत्य आहे, आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर देवाच्या सार्वभौमत्वाचा स्वीकार करणे आहे. जेव्हा आपण उपासना करतो, तेव्हा आपण घोषणा देतो की देव नियंत्रण ठेवून आहे, आणि तो पात्र असलेला आदर आणि सन्मान आपण त्यास देतो.
स्तोत्र 95:6मध्ये स्तोत्रकर्ता आपल्याला आमंत्रित करतो की आपण “ त्याला नमन करावे” आणि “आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे आपण गुडघे टेकावे.” नम्रतेची ही अवस्था महत्वाची आहे. ते आपल्याला आठवण करून देते की ते आपल्या सत्तेत नाही आणि आपल्या स्वतःहून आपल्याला आपल्या जीवनाचे ओझे घेऊन जाण्याची गरज नाही.
उपासनेत, आपण प्रत्येक समस्या सोडवण्याची किंवा प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची गरज सोडून देतो. त्याऐवजी, आपण त्या एकमेव देवासमोर नमन करतो जो संपूर्ण विश्वाला त्याच्या हातात धरून आहे. जेव्हा आपण हे करतो, तेव्हा काहीतरी अविश्वसनीय घडते-आपली अंत:करणे त्याच्या शांतीने भरून जातात.
उपासना जगाच्या गोंगाटाला शांत करते. जेव्हा आपण देवाच्या महानतेवर लक्ष देण्यासाठी वेळ काढतो, तेव्हा त्या तुलनेत आपल्या समस्या कमी होत जातात. अडथळे आणि चिंता ज्या कधी आपल्याला ग्रासून टाकत होत्या त्या धूसर होऊ लागतात. उपासना आपल्याला आपल्या परिस्थितीच्या भ्रमातून बाहेर काढते आणि आपल्याला सर्वशक्तिमान समोर आणते. हे मग या पवित्र ठिकाणीच आपण त्या शांतीचा अनुभव करतो जी सर्व समजेपलीकडील आहे.
परंतु उपासना ही केवळ चांगल्या वेळेसाठी नाही-ती त्या क्षणासाठी देखील आहे जेव्हा जीवन भारावून गेलेले असते. 2 इतिहास 20मध्ये, यहोशाफाट राजा अशक्य युद्धाला सामारे जात आहे याबद्दल आपण वाचतो. घाबरून जाणे किंवा त्याच्या स्वतःच्या शक्तीवर अवलंबून राहण्याऐवजी, यहोशाफाट त्याच्या लोकांना उपासना करण्यासाठी बोलावतो. युद्ध जिंकण्यापूर्वीच ते देवाची स्तुती करतात, आणि देव त्यांना चमत्कारिक मार्गाने सुटका करण्याने प्रत्युत्तर देतो. उपासना करण्याच्या त्यांच्या कृत्याने त्यांच्या परिस्थितीमध्ये देवाच्या शांतीला आणि शक्तीला आमंत्रित केले.
त्याचप्रमाणे, जेव्हा आपण आपल्या संकटाच्या मध्ये उपासना करतो, तेव्हा आपण देवाची शांती आपली अंत:करणे आणि मने यावर शासन करावी म्हणून तिला आमंत्रित करतो. देव कोण आहे, याबद्दल उपासना आपल्याला आठवण करून देते-तो आपला निर्माणकर्ता, आपला पालनकर्ता, आपला पुरवठा करणारा आहे. आपण कोणत्या आव्हानांना सामोरे जात आहोत याची पर्वा नाही, तो नेहमीच विश्वासू राहतो. उपासना आपला दृष्टीकोन आपल्याला कशाची कमतरता आहे यापासून आपण कोणाचे आहोत याचे स्मरण करण्याकडे बदलते.
उपासनेचे एक सर्वात सुंदर पैलू हा आहे की त्यास कोणत्याही विशेष परिस्थितीची आवश्यकता लागत नाही. तुम्हाला एक परिपूर्ण जीवनाची, समस्यारहित आठवडा, किंवा देवाची उपासना करण्यासाठी चांगले मन असावे याची गरज लागत नाही. वास्तवात, उपासना ही नेहमी सर्वात शक्तिशाली असते जेव्हा आपण आपली भग्नता त्याच्यासमोर आणतो. जेव्हा आपण गरजेच्या ठिकाणाहून उपासना करतो, तेव्हा आपण हे स्वीकारत असतो की देव हाच केवळ एकमेव आहे जो आपल्या अंत:करणाचे खरेच समाधान करू शकतो. आपण घोषित करत असतो की त्याची उपस्थिती हा आपला सर्वात मोठा खजिना आहे.
आज, काही क्षण घ्या की देवाची उपासना करावी, केवळ तुमच्या शब्दांनी नव्हे, तर तुमच्या अंत:करणापासून. जसे स्तोत्र 95:6 आपल्याला आमंत्रित करते, तुमच्या उत्पन्नकर्त्यासमोर नम्रतेने नमन करा. तुमच्या चिंता, तुमचे संघर्ष आणि तुमच्या योजना त्यास समर्पित करा. उपासनेच्या कृतीला तुमच्या समस्यांकडून तुमचे लक्ष देवाची शक्ती आणि विश्वासूपणाकडे वळू द्या. मग तुम्ही वादळाच्या मध्ये आहात किंवा विजयाच्या डोंगरवर उभे आहात, काहीही असो, उपासना ही तुमच्या शांतीसाठी किल्ली आहे.
जर जीवन भारदस्त झालेले आहे असे वाटत असले, तर ह्या साध्या आचरणाचा प्रयत्न करा : मोठा श्वास घ्या, तुमचे अंत:करण शांत करा, आणि उपासना करू लागा. ते चांगले सविस्तर असण्याची गरज नाही- फक्त देव कोण आहे यासाठी त्याचा धन्यवाद करण्यास सुरुवात करा. जेव्हा तुम्ही असे करता, तेव्हा तुमच्या आत्म्यावर देवाची शांती स्थिरावत आहे असे तुम्हाला आढळून येते, तुमच्या चिंता आणि भीतीला शांत करते.
उपासनेसाठी जरी ती काही मिनिटे असले तरी प्रत्येक दिवशी काही वेळ काढा. उपासनेच्या गीतांची यादी बनवा जे देवाची महानता आणि विश्वासुपणावर केंद्रित आहेत. जेव्हा तुम्ही ते ऐकता, तेव्हा शब्द आणि संगीताला तुमच्या अंत:करणाला शरण जाण्यासाठी मार्गदर्शन करू द्या. उपासना ही एखाद्या प्रसंगापेक्षा अधिक असली पाहिजे-ती एक जीवनशैली झाली पाहिजे जी तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात देवाच्या शांतीला आमंत्रित करते.
प्रार्थना
पित्या, मी उपासनेत तुझ्यासमोर येतो, तुझ्या वैभवासमोर मी नतमस्तक होतो. माझ्या समस्यांकडून तुझ्या महानतेकडे माझे लक्ष वळवण्यास मला मदत कर. तुझ्या शांतीने मला भरून काढ जेव्हा मी प्रत्येक चिंता आणि भीतीला तुझ्याजवळ समर्पित करतो. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● एक गोष्ट: ख्रिस्तामध्ये खरा खजिना शोधणे● चेतावणीकडे लक्ष दया
● यासाठी तयार राहा!
● दिवस २७:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● स्वप्न पाहण्याचे धाडस करा
● वातावरणावर महत्वाची समज-३
● प्रभू येशू : शांतीचा स्त्रोत
टिप्पण्या